Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 1:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 देवाला कोणीही कधीच पाहिले नाही; जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 देवाला कोणीही कधीहि पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्यास प्रकट केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 देवाला कोणी कधी पाहिले नाही. जो एकुलता एक पित्याच्या उराशी असतो त्याने पित्याला प्रकट केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परमेश्वराला कोणी कधीही पाहिलेले नाही, परंतु त्यांचा एकुलता एक पुत्र, जे स्वतः परमेश्वर आहेत आणि पित्याच्या निकट सहवासात राहतात, त्या पित्याने त्यांना प्रकट केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 1:18
41 Iomraidhean Croise  

तिच्याशी बोलणार्‍या परमेश्वराचे नाव तिने आत्ता-एल-रोई (तू पाहणारा देव) असे ठेवले; ती म्हणाली, “मला पाहणार्‍याला मी ह्याही ठिकाणी मागून पाहिले काय?”


मग अब्राहामाशी बोलणे संपवल्यावर परमेश्वर निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या ठिकाणी परत आला.


त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक; त्याची अवज्ञा करू नकोस, कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही, कारण त्याच्या ठायी माझे नाव आहे.


त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले; त्याच्या पायांखाली नीलकांत मण्यांच्या चबुतर्‍यासारखे काही होते आणि ते अगदी आकाशासारखे स्वच्छ होते.


तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागीर होते; मी त्याला नित्य आनंददायी होते; त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे;


मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणार्‍यांना सांभाळून नेईल.


घायाळ झालेल्यांप्रमाणे नगराच्या आळ्यांत मूर्च्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडला, तेव्हा ती आपल्या मातांना म्हणाली, “धान्य व द्राक्षारस कोठे आहेत?”


मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो; परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो; तर माझा सेवक मोशे ह्याच्याविरुद्ध बोलायला तुम्हांला भीती कशी नाही वाटली?”


माझ्या पित्याने माझ्या हाती सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.


माझ्या पित्याने सर्वकाही माझ्या स्वाधीन केले आहे; पुत्र कोण आहे हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही; आणि पिता कोण आहे हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रकट करायची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.”


शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.


यशयाने त्याचा गौरव पाहिला म्हणून तो असे म्हणाला आणि त्याच्याविषयी बोलला.


तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता;


येशूने त्याला म्हटले : “फिलिप्पा, मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हांला पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस?


मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन; ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”


जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले; ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस; आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे.


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, जे आम्हांला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो, आणि आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही.


पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही; जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे.


त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणार्‍या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.


तेव्हा परमेश्वराने त्या अग्नीमधून तुमच्याशी भाषण केले; तुम्ही बोलण्याचा आवाज ऐकला पण काही आकृती पाहिली नाही; वाणी मात्र ऐकली.


तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे;


जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा, असा एकच ज्ञानी देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन.


आणि कोणी पाहू शकत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाळी दाखवील; त्याला सन्मान व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन.


यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पाहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, “तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैर्‍यांच्या पक्षाचा?”


देवाला कोणी कधीही पाहिले नाही; आपण एकमेकांवर प्रीती करत असलो तर देव आपल्या ठायी राहतो, आणि त्याची प्रीती आपल्या ठायी पूर्णत्व पावली आहे.


“मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.


देवाने आपल्या एकुलत्या एक जन्मलेल्या पुत्राला जगात पाठवले आहे, ह्यासाठी की, त्याच्या द्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे; ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली.


आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan