Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 जो तो आपल्या शेजार्‍याला फसवतो; ते सत्य म्हणून बोलत नाहीत; त्यांनी आपल्या जिभेस खोटे बोलण्यास शिकवले आहे, ते कुटिलाचार करण्यासाठी स्वतःस शिणवतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याची थट्टा करतो आणि सत्य बोलत नाही. त्यांची जीभ खोटे बोलते. दुष्टाई करण्यासाठी ते आपणाला दमवतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मित्र मित्रास फसवितो, आणि कोणीही सत्य बोलत नाही. त्यांनी त्यांच्या जिभेला खोटे बोलणे शिकविले आहे; अगदी दमून जाईपर्यंत ते पाप करीत राहतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 9:5
32 Iomraidhean Croise  

आणि घराच्या दाराशी जी लहानथोर माणसे जमली होती त्यांना त्यांनी आंधळे करून टाकले; मग ती घर शोधून शोधून थकली.


तुझ्या वटवटीने लोकांची तोंडे बंद होतील काय? तू निंदा करीत असता तुला कोणी फजीत करणार नाही काय?


तुझा अधर्म तुझ्या तोंडाला बोलण्यास शिकवतो; तुला धूर्ताप्रमाणे बोलणे आवडते.


ते आपली जीभ सर्पासारखी तिखट करतात त्यांच्या ओठाखाली नागांचे विष आहे. (सेला)


तू आपले तोंड दुष्टपणासाठी मोकळे सोडले आहेस, तुझी जीभ कपटाची योजना करते.


तुला बर्‍यापेक्षा वाइटाची, सत्य बोलण्यापेक्षा असत्याची आवड आहे. (सेला)


त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी पाजळली आहे; सात्त्विकाला एकान्तात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपल्या कटु शब्दांचा नेम धरला आहे.


पाहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वेणा देतो; उपद्रवाची गर्भधारणा करतो व असत्याला प्रसवतो.


नीतिमानांचे विचार यथान्याय असतात; दुर्जनांच्या मसलती कपटाच्या असतात.


कारण दुष्कर्म केल्यावाचून त्यांना झोप येत नाही; कोणाला पाडले नाही, तर त्यांची झोप उडते.


जे दुष्टतेच्या दोर्‍यांनी दुष्कर्माला, जसे काय गाडीच्या दोराने पापिष्ठपणाला ओढून आणतात, त्यांना धिक्कार असो;


दूरच्या पल्ल्यामुळे तू थकलीस, तरी “आपण आता हात टेकले” असे तू म्हणाली नाहीस; तुला नवा दम आला म्हणून तुला ग्लानी आली नाही.


त्यांनी गहू पेरला आणि कापणी काटेर्‍याची केली; त्यांनी कष्ट केले पण काही फायदा झाला नाही; परमेश्वराच्या तीव्र कोपामुळे तुमची आपल्या उपजा-संबंधाने फजिती होईल.”


कारण तुझे भाऊबंद व तुझ्या बापाचे घराणे हीदेखील तुझ्याशी बेइमानपणे वागली आहेत; त्यांनीदेखील तुझ्यावर शब्दांचा भडिमार केला आहे; ती तुझ्याशी गोड बोलली तरी त्यांचा विश्वास धरू नकोस.”


कूशी माणसाला आपली कातडी, चित्त्याला आपले ठिपके पालटता येतील काय? असे घडेल तरच दुष्टतेला सवकलेल्या तुम्हांला चांगले आचरण करता येईल.


“कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत; ती निर्बुद्ध, असमंजस अशी मुले आहेत; वाईट करण्यात ती हुशार आहेत, पण बरे करण्याचे त्यांना ज्ञान नाही.”


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, बाबेलचे रुंद तट समूळ पाडतील, त्याच्या उंच वेशी अग्नीने भस्म होतील; अशी राष्ट्रांच्या श्रमाची फलप्राप्ती शून्यवत होईल, राष्ट्रांचे श्रमफळ हे अग्नीला भक्ष्य होईल, ते व्यर्थ शिणतील.”


असे करून म्हण की, ‘ह्याच प्रकारे मी बाबेलवर जे अरिष्ट आणणार त्यामुळे तो बुडेल, वर येणार नाही; ते व्यर्थ शिणतील.”’ येथवर यिर्मयाची वचने आहेत.


त्यांना असे सांग, ‘आपला देव परमेश्वर ह्याचा शब्द ऐकत नाही व शिक्षेला मान्य होत नाही ते हेच राष्ट्र आहे; सत्य नष्ट झाले आहे, ते त्यांच्या मुखांतून नाहीसे झाले आहे.


खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवतात; ते देशात प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे; ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात; मला ते ओळखत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


त्यांची जीभ प्राणहारक बाण आहे; ते असत्य बोलतात; ते तोंडाने शेजार्‍याशी सलोख्याचे भाषण करतात, पण अंतर्यामी त्याच्यावर टपून असतात.


ती श्रम करून करून भागली तरी तिच्यावर दाट बसलेला गंज निघून गेला नाही; गंजासहित तिला आगीत टाका.


तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत, तेथील रहिवासी खोटे बोलतात; त्यांची जीभ त्यांच्या मुखात साक्षात कपटरूप आहे;


“हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळवले? मला उत्तर दे.


पाहा, लोकांच्या श्रमाची फलप्राप्ती अग्नीला भक्ष्य होते, राष्ट्रे व्यर्थ शिणतात, हे सेनाधीश परमेश्वर ह्याच्याकडून नव्हे काय?


आम्हा सर्वांचा एकच पिता नाही काय? एकाच देवाने आम्हांला उत्पन्न केले नाही काय? असे असताना आम्ही आपापल्या बंधूचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो बरे?


म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजार्‍याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत.


ज्या माणसांची सदसद्विवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणार्‍या माणसांच्या ढोंगाने ते फुसलावणार्‍या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील;


ती सर्व पिढी पूर्वजांस मिळाल्यानंतर जी नवी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्याची ओळख राहिली नव्हती. इस्राएलांची नीतिभ्रष्टता व शास्त्यांचा अंमल


Lean sinn:

Sanasan


Sanasan