Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 9:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 हे सांग, “परमेश्वर असे म्हणतो, ‘शेतात खत पडते, कापणार्‍याच्या मागे पेंढी गळून पडते, कोणी उचलत नाही, तशी माणसांची प्रेते पडतील.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 असे सांग: परमेश्वर असे म्हणतो, जसे उघड्यावर खत पडते आणि कापणाऱ्या मागे पेंढीतून गळण पडते, तशी मनुष्याची प्रेते पडतील, आणि ती कोणी गोळा करणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्यांना सांग, “याहवेह असे म्हणतात: “ ‘मृतदेह उघड्या जागांवर विष्ठेप्रमाणे पसरली जातील; कापणार्‍यांच्या मागे पेंढ्या पडाव्यात तशी ती दिसतील, आणि कोणी मनुष्य त्यांना मूठमाती देणार नाही.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 9:22
17 Iomraidhean Croise  

तेव्हा हिज्कीयाने जासुदांचे ऐकून आपले सर्व भांडार त्यांना दाखवले; आपले रुपे, सोने, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सर्व शस्त्रागार व त्याच्या भांडारात होते नव्हते ते सर्व त्याने दाखवले; हिज्कीयाने दाखवले नाही असे त्याच्या घरात व राज्यात काही नव्हते.


मग त्याने विचारले, “त्यांनी तुझ्या घरात काय काय पाहिले?” हिज्कीया म्हणाला, “माझ्या घरातले सर्वकाही त्यांनी पाहिले; माझ्या भांडारातले मी त्यांना दाखवले नाही असे काहीच नाही.”


ईजबेलीचे शव इज्रेलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील, ही ईजबेल आहे असे कोणी ओळखणार नाही.”’


तो शहाण्यांस त्यांच्याच धूर्ततेने धरतो; कुटिलांच्या मसलतीचा तो त्वरित शेवट करतो.


कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करता येत नाही; किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही.


ते एन-दोर येथे नाश पावले; ते शेताला खत झाले.


धनवानाचे धन त्याचे बळकट नगर आहे, त्याच्या मते ते उंच तटासारखे आहे.


धनवान होण्यासाठी धडपड करू नकोस; आपले चातुर्य एकीकडे ठेव.


ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


तीव्र यातना होऊन ती मरतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही व त्यांना कोणी पुरणार नाही; ती भूमीला खत होतील; त्यांचा तलवारीने व दुष्काळाने संहार होईल; त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य होतील.


त्या दिवशी परमेश्वराने वध केलेले, पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही, त्यांना कोणी उचलणार नाही, पुरणार नाही; ते भूमीला खत होतील.


ह्याकरता परमेश्वर म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांच्या वाटेत अडथळे ठेवीन, बाप व लेक दोघेही त्यांवर ठोकर खाऊन पडतील; शेजारी आणि त्याचा मित्र हे नाश पावतील.”’


ह्या लोकांची प्रेते आकाशातल्या पाखरांना व पृथ्वीवरील पशूंना खाद्य होतील, त्यांना कोणी हाकून लावणार नाही.


त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण ह्यांपुढे पसरतील; त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्यामागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले; त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील.


शेवटी सोसाट्याचा वारा येऊन ते उडून जातील, स्वपराक्रम हाच ज्यांचा देव त्यांच्यावर दोष येईल.


मी माणसांवर संकट आणीन, ते आंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे; त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील.


तसेच ‘हे धन माझ्याच सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळवले आहे’ असे तू मनात म्हणू नकोस;


Lean sinn:

Sanasan


Sanasan