Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 9:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 कारण रस्त्यांतली मुले व चौकांतील तरुण नष्ट करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यांतून आत शिरला आहे, त्याने आमच्या वाड्यांत प्रवेश केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 कारण बाहेर असलेली मुले आणि चौकात तरुणांना नाहीसे करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यातून चढून आला आहे. तो आमच्या राजवाड्यांमध्ये शिरला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 कारण तुमच्या खिडक्यातून मरणाचा शिरकाव झाला आणि त्याने आमच्या गडात प्रवेश केला आहे; त्याने रस्त्यांवरून बालकांना आणि तुमच्या तरुणांना चौकातून काढून घेतले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 9:21
17 Iomraidhean Croise  

त्याने त्यांच्यावर खास्द्यांच्या राजाची स्वारी आणली; त्याने त्यांच्या तरुण पुरुषांना त्यांच्याच पवित्रस्थानाच्या घरात तलवारीने वधले; त्याने तरुणांवर व कुमारींवर, वृद्धांवर किंवा वयातीतांवर दया केली नाही; परमेश्वराने सर्वांना त्याच्या हाती दिले.


तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात;


मी त्यांना आपल्या देशाच्या वेशींवर सुपाने पाखडून टाकले, त्यांना अपत्यहीन केले; मी त्या लोकांचा विध्वंस केला, कारण ते आपल्या मार्गावरून मागे फिरले नाहीत.


ह्यामुळे त्यांचे पुत्र दुष्काळात सापडू दे; त्यांना तलवारीच्या तडाक्यात सापडू दे; त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होवोत, मृत्यू त्यांचे पुरुष ठार करो; त्यांचे तरुण लढाईत तलवारीने पडोत.


ह्यास्तव आता सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो : तुम्ही आपल्या हातच्या कर्मांनी मला चिडवावे आणि यहूदातले तुमचे पुरुष, स्त्रिया, बालके व तान्ही ह्यांचा उच्छेद होऊन तुमच्यातला कोणी शिल्लक राहू नये, असे आपल्या जिवावर का अरिष्ट आणता?


ह्यामुळे त्यांचे तरुण त्याच्या चवाठ्यावर पडतील, त्याचे सर्व वीर त्या दिवशी स्तब्ध होतील, असे परमेश्वर म्हणतो.


ह्याकरता मी परमेश्वराच्या संतापाने भरलो आहे; तो दाबून ठेवता ठेवता मी थकलो आहे; “रस्त्यातल्या पोरांवर, तरुणांच्या जमावावर तो सोड; नवरा व बायको, वृद्ध व पुर्‍या वयाचे ह्या सर्वांना तो गाठील.


ह्याकरता परमेश्वर म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांच्या वाटेत अडथळे ठेवीन, बाप व लेक दोघेही त्यांवर ठोकर खाऊन पडतील; शेजारी आणि त्याचा मित्र हे नाश पावतील.”’


ह्या लोकांची प्रेते आकाशातल्या पाखरांना व पृथ्वीवरील पशूंना खाद्य होतील, त्यांना कोणी हाकून लावणार नाही.


त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण ह्यांपुढे पसरतील; त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्यामागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले; त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील.


ते शहरातून इकडेतिकडे फिरतात, ते भिंतीवरून चालतात, ते चढून घरात शिरतात, चोरासारखे खिडक्यांतून प्रवेश करतात.


“इस्राएल-कुमारी पडली आहे; ती पुन्हा उठायची नाही; तिला आपल्या भूमीवर टाकून दिले आहे; तिला उठवणारा कोणी नाही.”


मग असे होईल की एका घरात दहा माणसे असली तरी ती मरतील.


मी माणसांवर संकट आणीन, ते आंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे; त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan