Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 9:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या तोंडचे शब्द तुमचे कान स्वीकारोत; तुम्ही आपल्या कन्यांना विलापगीत शिकवा. एकमेकींना शोकगीत शिकवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तर स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या मुखातील निघणाऱ्या संदेशाकडे चित्त लावा. नंतर तुमच्या मुलींना मोठ्याने विलाप करण्यास शिकव आणि शेजारील प्रत्येक स्त्रीला शोकगीत शिकवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 आता स्त्रियांनो, याहवेहचे शब्द ऐका! त्यांच्या मुखातील शब्द ऐकण्यासाठी तुमचे कान उघडा. तुमच्या कन्यांना विलाप करण्यास शिकवा; एकमेकींना आकांत करण्यास शिकवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 9:20
15 Iomraidhean Croise  

आता त्याच्या तोंडून नियमांचे शिक्षण घे, त्याची वचने आपल्या हृदयात साठव.


परमेश्वर असेही म्हणतो : सीयोनेच्या कन्या गर्विष्ठ आहेत, त्या मान ताठ करून व डोळे मारत चालतात, आपल्या पायांतील नूपुरांचा छमछम आवाज करीत ठुमकत चालतात;


मी मुलांना त्यांचे अधिपती करीन; त्यांच्यावर पोरकटपणाचा अंमल चालेल.


आणि ज्या लोकांना ते संदेश देतात तेही दुष्काळाने व तलवारीने मरतील व त्यांना यरुशलेमेच्या रस्त्यांनी पकडून देतील; त्यांना, त्यांच्या स्त्रियांना, त्यांच्या पुत्रांना व त्यांच्या कन्यांना कोणी पुरणार नाही; मी त्यांची दुष्टता त्यांच्यावर लोटीन.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्हांला संदेश देणार्‍या संदेष्ट्यांची वचने ऐकू नका, ते तुम्हांला फसवतात; ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टान्त सांगतात, परमेश्वराच्या मुखातला सांगत नाहीत.


कोणा संदेष्ट्याने स्वप्न पाहिले असेल तर ते तो कथन करो; माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगो. गव्हापुढे पेंढा तो काय? असे परमेश्वर म्हणतो.


ह्याकरता मी परमेश्वराच्या संतापाने भरलो आहे; तो दाबून ठेवता ठेवता मी थकलो आहे; “रस्त्यातल्या पोरांवर, तरुणांच्या जमावावर तो सोड; नवरा व बायको, वृद्ध व पुर्‍या वयाचे ह्या सर्वांना तो गाठील.


हे सीयोनकन्ये, आपला केशकलाप काढून फेकून दे, उजाड डोंगराच्या शिखरांवर विलाप कर, कारण आपल्या क्रोधास पात्र झालेल्या ह्या पिढीस परमेश्वराने धिक्कारले व टाकून दिले आहे.’


त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण ह्यांपुढे पसरतील; त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्यामागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले; त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील.


हे समजून घेईल असा शहाणा कोण आहे? परमेश्वराच्या मुखाने त्याला सांगितले असून ते इतरांना कळवील असा कोण आहे? देशाचा नाश का झाला? कोणी त्यातून येत नाही असा तो जळून वैराणासारखा का झाला?


ऊठ, रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर; प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत; तुझी बालके हरएक गल्लीच्या चवाठ्यावर भुकेने व्याकूळ झाली आहेत, त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्याच्याकडे हात पसर.


तरुण व वृद्ध रस्त्यांत जमिनीवर पडले आहेत; माझ्या कुमारी व माझे तरुण तलवारीने पडले आहेत; तू आपल्या क्रोधदिनी त्यांचा वध केला आहे; तू त्यांना वधले, गय केली नाहीस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan