Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 9:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 कारण सीयोनेतून आक्रंदनाचा शब्द ऐकू येत आहे; ‘आम्हांला कसे नागवले आहे! आमची कशी फजिती उडाली आहे! आम्ही देश त्यागला आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडली आहेत.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 सियोनमधून विलापाचा आवाज ऐकायला येतो आहे. आम्ही कसे उद्ध्वस्त झालो आहोत, कारण आमची खरोखरच अप्रतिष्ठा झाली. आम्ही आपली भूमी सोडली आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडून टाकली आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 सीयोनातून आक्रंदन ऐकू येत आहे: ‘आमचा किती सत्यानाश झाला आहे! आमच्यावर घोर लज्जा आली आहे! आम्ही आमचा देश सोडून गेले पाहिजे कारण आमच्या घरांची पडझड झाली आहे.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 9:19
20 Iomraidhean Croise  

अहो सुखात राहणार्‍या स्त्रियांनो, उठा, माझी वाणी ऐका; अहो निश्‍चिंत कन्यांनो, माझ्या बोलण्याकडे कान द्या.


मग परमेश्वर मला म्हणाला, “मोशे व शमुवेल हे माझ्यापुढे उभे राहिले तरी माझे अंतःकरण ह्या लोकांकडे वळायचे नाही; त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालव, त्यांना निघून जाऊ दे.


इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मलेला दास आहे काय? तर तो लूट का झाला आहे?


पाहा, ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत; त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्ही हायहाय करणार, आमचे वाटोळे झाले आहे!


नाशावर नाश पुकारला आहे; कारण सर्व देश लुटला आहे; माझे डेरे अकस्मात माझ्या कनाती क्षणात लुटल्या आहेत.


आणि तुमचे सर्व भाऊबंद, एफ्राइमाचे सर्व संतान ह्यांना घालवून दिले, त्याप्रमाणे मी तुम्हांला माझ्यासमोरून घालवून देईन.


परमेश्वर म्हणतो, ते मला संताप आणतात? का स्वतःला संताप करून घेऊन आपले तोंड काळे करतात?


हे सीयोनकन्ये, आपला केशकलाप काढून फेकून दे, उजाड डोंगराच्या शिखरांवर विलाप कर, कारण आपल्या क्रोधास पात्र झालेल्या ह्या पिढीस परमेश्वराने धिक्कारले व टाकून दिले आहे.’


“दूर व्हा! अमंगळ लोकहो, दूर व्हा! दूर व्हा! शिवू नका!” असे त्यांनी त्यांना ओरडून म्हटले; ते पळून जाऊन भटकत राहिले तेव्हा राष्ट्रांतले लोक म्हणाले, “त्यांना आतापासून येथे वस्ती करायची नाही.”


आमचे वतन परक्यांकडे गेले आहे; आमची घरे परदेशीयांच्या हाती गेली आहेत.


“मानवपुत्रा, सोरेसंबंधाने विलाप कर;


त्यांचा देशही भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहिवाशांचा त्याग करीत आहे.1


तुमच्यापूर्वीच्या राष्ट्रांचा जसा ह्या देशाने त्याग केला2 तसा तुम्ही देश भ्रष्ट केल्यास तुमचाही त्याने त्याग करू नये.3


म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम मान्य करून पाळावेत म्हणजे ज्या देशात वसाहत करण्यासाठी मी तुम्हांला घेऊन जात आहे तो तुमचा त्याग करणार नाही.


उठा, चालते व्हा, हे तुमचे विश्रांतिस्थान नव्हे; कारण अशुद्धतेने नाश, समूळ नाश होईल.


त्या दिवसांत लोक तुम्हांला उद्देशून बोलतील, विव्हळून शोक करतील व म्हणतील, “आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे; तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे! आमचे क्षेत्र बंडखोरांना त्याने वाटून दिले आहे.”


आंधळा जसा चाचपडतो तसा तू भरदुपारी चाचपडत फिरशील; तुझे कोणतेही काम सफळ होणार नाही. तुझा एकसारखा छळ होईल व तुझी नागवणूक होईल; पण तुझा बचाव करणारा कोणी असणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan