यिर्मया 9:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तर ते आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले त्यांच्या पूर्वजांनी त्यांना शिकवल्याप्रमाणे ते बआलमूर्तींच्या मागे लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 हे असे झाले कारण ते आपल्या दुराग्रही हृदयाच्या मर्जी प्रमाणे वागले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवल्या प्रमाणे, बालदेवास अनुसरले.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 याउलट ते हट्टीपणाने मनाला येईल तसे वागले, आणि त्यांच्या पूर्वजांनी शिकविल्याप्रमाणे त्यांनी बआलच्या मूर्तीचे अनुसरण केले.” Faic an caibideil |
आम्ही पूर्वी जसे केले, म्हणजे आम्ही, आमच्या पूर्वजांनी, आमच्या राजांनी व आमच्या सरदारांनी यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या आळ्यांत जसे केले त्याप्रमाणे आकाशराणीस धूप जाळण्याविषयी व तिला पेयार्पणे अर्पण करण्याविषयी आमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द आम्ही खरा करून दाखवू; कारण तेव्हा आम्हांला अन्नाची चंगळ असे, आमची आबादानी असे व आम्ही काही अनिष्ट पाहत नसू.