Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण ह्यांपुढे पसरतील; त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्यामागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले; त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आणि चंद्र, सूर्य, आकाशातले तारे, ज्यांना ते अनुसरले आणि सेवा केली, ज्यांच्या ते मागे चालले आणि पूजन केले, त्यांच्यापुढे पसरतील, ती गोळा केल्या जाणार नाही किंवा पुरल्या जाणार नाही, ती पृथ्वीवर पसरलेल्या शेणखतासारखी असतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आणि ती हाडे चंद्र, सूर्य व तारे यांच्यापुढे पसरील. हीच माझ्या लोकांची दैवते आहेत. यांच्यावरच त्यांचे प्रेम होते, यांना ते अनुसरत होते, यांचा ते सल्ला घेत, यांचीच ते उपासना करीत असत. ही हाडे पुन्हा कोणी गोळा करणार नाहीत वा पुरणार नाहीत. जमिनीवर पडलेल्या शेणाप्रमाणे ती विखुरली जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 8:2
32 Iomraidhean Croise  

त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा सोडून देऊन वासरांच्या दोन ओतीव मूर्ती तयार केल्या; त्यांनी अशेरामूर्ती केली, सर्व नक्षत्रगणांची पूजा केली, आणि बआलमूर्तीची उपासना केली.


त्याचा बाप हिज्कीया ह्याने उच्च स्थाने उद्ध्वस्त केली होती ती त्याने पुन्हा बांधली; इस्राएलाचा राजा आहाब ह्याच्याप्रमाणे बआलमूर्तीसाठी वेदी बांधून त्याने एक अशेरामूर्ती केली; त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करत असे.


परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत त्याने नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधल्या.


जितके पुजारी यहूदाच्या राजांनी यहूदी नगरांच्या उच्च स्थानी व यरुशलेमेच्या आसपासच्या उच्च स्थानी धूप जाळण्यासाठी नेमले होते ते आणि जे कोणी बआल, सूर्य, चंद्र, राशिचक्र व नक्षत्रगण ह्यांना धूप जाळत होते ते सर्व राजाने काढून टाकले.


पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भेदरले आहेत; कारण तुझ्याविरुद्ध छावणी देऊन बसणार्‍यांची हाडे देवाने विखरली आहेत; तू त्यांची फजिती केली आहेस, कारण देवाने त्यांचा धिक्कार केला आहे.


ते एन-दोर येथे नाश पावले; ते शेताला खत झाले.


ओरेब व जेब ह्यांच्यासारखे त्यांच्या सरदारांना कर. जेबह व सलमुन्ना ह्यांच्यासारखे त्यांच्या सर्व अमिरांना कर.


कोणा मनुष्याला शंभर मुले झाली व तो बहुत वर्षे जगला, त्याच्या आयुष्याची वर्षसंख्या मोठी असली, तरी त्याचा जीव सुखप्राप्तीने समाधान पावला नाही, त्याचे उत्तरकार्य झाले नाही, तर अशा मनुष्यापेक्षा मृतपिंड पुरवला, असे मी म्हणतो.


आणि ज्या लोकांना ते संदेश देतात तेही दुष्काळाने व तलवारीने मरतील व त्यांना यरुशलेमेच्या रस्त्यांनी पकडून देतील; त्यांना, त्यांच्या स्त्रियांना, त्यांच्या पुत्रांना व त्यांच्या कन्यांना कोणी पुरणार नाही; मी त्यांची दुष्टता त्यांच्यावर लोटीन.


तेव्हा तू त्यांना सांग, ‘परमेश्वर म्हणतो, कारण हेच की तुमच्या पूर्वजांनी माझा त्याग केला, ते अन्य देवांच्या मागे लागले, त्यांनी त्यांची सेवा व भजन केले, त्यांनी मला सोडले, माझे नियमशास्त्र पाळले नाही.


तीव्र यातना होऊन ती मरतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही व त्यांना कोणी पुरणार नाही; ती भूमीला खत होतील; त्यांचा तलवारीने व दुष्काळाने संहार होईल; त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य होतील.


ह्या देशातील लहानथोर मरतील; कोणी त्यांना पुरणार नाहीत, कोणी त्यांच्याकरता शोक करणार नाहीत, कोणी त्यांच्यामुळे आपल्या शरीरांना घाय करणार नाहीत, त्यांच्यामुळे आपली डोकी भादरणार नाहीत.


ज्या सर्व घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील सर्व सेनांना धूप जाळला व अन्य देवांना पेयार्पणे अर्पण केली ती यरुशलेमेतील घरे व यहूदाच्या राजांची घरे तोफेताच्या स्थळाप्रमाणे अशुद्ध होतील.”’


गाढवाच्या मूठमातीसारखी त्याची मूठमाती होईल; त्याचे शव यरुशलेमेच्या वेशींबाहेर ओढत नेऊन फेकून देतील.”


त्या दिवशी परमेश्वराने वध केलेले, पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही, त्यांना कोणी उचलणार नाही, पुरणार नाही; ते भूमीला खत होतील.


प्रेतांचे व राखेचे सर्व खोरे आणि किद्रोन ओहोळापर्यंत पूर्वेकडील घोडेवेशीच्या कोपर्‍यापर्यंत सर्व शेते परमेश्वराला पवित्र होतील; पुन्हा कधीही ती उपटण्यात येणार नाहीत किंवा मोडून टाकणार नाहीत.”


“ह्यास्तव यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, दाविदाच्या आसनावर बसण्यास कोणी राहणार नाही व त्याचे शव फेकण्यात येईल, ते दिवसाच्या उन्हात व रात्रीच्या हिवात पडून राहील.


स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या तोंडचे शब्द तुमचे कान स्वीकारोत; तुम्ही आपल्या कन्यांना विलापगीत शिकवा. एकमेकींना शोकगीत शिकवा.


कारण रस्त्यांतली मुले व चौकांतील तरुण नष्ट करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यांतून आत शिरला आहे, त्याने आमच्या वाड्यांत प्रवेश केला आहे.


हे सांग, “परमेश्वर असे म्हणतो, ‘शेतात खत पडते, कापणार्‍याच्या मागे पेंढी गळून पडते, कोणी उचलत नाही, तशी माणसांची प्रेते पडतील.”’


मी तुला व तुझ्या नद्यांतल्या सर्व माशांना सोडून देईन; तू उघड्या मैदानात पडून राहशील; तुला कोणी उचलून आणणार नाही किंवा तुझी कोणी जुळवाजुळव करणार नाही, तर तू वनपशूंना व आकाशातील पाखरांना खाद्य होशील असे मी करीन.


उघड्या मैदानात तू पडशील, कारण मी हे बोललो आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


मी इस्राएल वंशजांची प्रेते त्यांच्या मूर्तींपुढे टाकीन, तुमच्या वेद्यांभोवती तुमची हाडे विखरीन.


तेव्हा त्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या आतल्या अंगणात नेले, तो पाहा, परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारी देवडीच्या व वेदीच्या दरम्यान सुमारे पंचवीस इसम परमेश्वराच्या मंदिराकडे पाठ करून व पूर्वेकडे तोंड करून उभे होते; ते पूर्व दिशेस सूर्याची उपासना करीत होते.


मी माणसांवर संकट आणीन, ते आंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे; त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील.


जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिलकोम मूर्तीचीही1 शपथ वाहतात,


तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना ‘आकाशातील सेनागणाची’ पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहिले आहे : ‘हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केले काय?


म्हणजे माझ्या आज्ञांचे उल्लंघन करून अन्य देवांची अथवा सूर्य, चंद्र किंवा आकाशातील तारांगण ह्यांची सेवा व पूजा करू लागले,


अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये; हे तुमचा देव परमेश्वर ह्याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan