Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 परमेश्वर म्हणतो, मी त्यांचा अगदी नायनाट करीन; द्राक्षलतेवर द्राक्षे, अंजिराच्या झाडावर अंजीर नसतील; पानेही वाळून जातील; म्हणून जे काही मी त्यांना दिले आहे ते त्यांच्यापासून निघून जाईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 परमेश्वर असे म्हणतो, मी त्यांना पुर्णपणे काढून टाकीन, द्राक्षवेलीवंर एकही द्राक्ष नसेल, आणि अंजिराच्या झाडांवर एकही अंजिर नसेल, पाने सुकतील आणि जे काही त्यांना दिले आहे, ते त्यांच्यापासून निघून जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “ ‘मी त्यांचे पीक काढून घेईन, याहवेह घोषित करतात द्राक्षलतेला द्राक्ष नसतील, झाडांवर अंजीर फळ दिसणार नाही, त्यांची पाने सुद्धा वाळून जातील. मी त्यांना जे काही दिले आहे त्यांच्यापासून परत घेतले जाईल.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 8:13
25 Iomraidhean Croise  

दहा बिघे द्राक्षमळा दहा शेर रस देईल; एक मण बी एक पायली धान्य देईल.”


ते उपोषण करतील तेव्हा मी त्यांची आरोळी ऐकणार नाही; ते होमार्पण व अन्नार्पण मला आणतील ती मी स्वीकारणार नाही; मी तलवारीने, दुष्काळाने व मरीने त्यांचा संहार करीन.”


ह्यास्तव ज्या संदेष्ट्यांना मी पाठवले नाही व जे माझ्या नामाने संदेश देतात व म्हणतात, ह्या देशावर तलवार व दुष्काळ येणार नाही, त्यांच्यासंबंधाने परमेश्वर म्हणतो, हे संदेष्टे तलवारीने व दुष्काळाने नष्ट होतील;


तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदीकिनारी पसरील; उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील; अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही.”


ते तुझे पीक, तुझ्या मुलाबाळांचे अन्न खाऊन टाकतील; ते तुझी शेरडेमेंढरे, तुझी गुरेढोरे, खाऊन टाकतील; तुझ्या द्राक्षलता व अंजिरांची झाडे फस्त करतील; ज्या तटबंदीच्या नगरांवर तुझी भिस्त आहे त्यांना ते तलवारीने उद्ध्वस्त करतील.”


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझा क्रोध व माझा संताप ह्या स्थळावर, मानवांवर, पशूंवर, शेतातल्या झाडांवर व भूमीच्या उपजावर वर्षेल, तो पेटत राहील, विझणार नाही.”


ह्यामुळे त्यांच्यावर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन; मी आपल्या कोपाग्नीने त्यांना भस्म करीन, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी आणीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


ज्या आपल्या द्राक्षालतांविषयी व अंजिराच्या झाडांविषयी ती म्हणत असे की, ‘ही माझ्या वल्लभांनी दिलेली माझी वेतने आहेत.’ ती मी उद्ध्वस्त करीन; मी त्यांचे रान बनवीन, आणि ती वनपशू खाऊन टाकतील.


त्यांनी माझ्या द्राक्षवेलांची नासधूस केली आहे; माझ्या अंजिराच्या झाडाच्या ढलप्या काढल्या आहेत; सोलून सोलून त्यांनी त्याची साल काढून टाकली आहे; आणि त्याच्या फांद्या पांढर्‍या झाल्या आहेत.


तुमची मेहनत व्यर्थ जाईल, कारण तुमची भूमी उपज द्यायची नाही व देशातील झाडे फळे देणार नाहीत.


अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली,


मी देशावर अवर्षण बोलावले आहे; पर्वतांवर, पिकांवर, द्राक्षारसावर, तेलावर, भूमीच्या उपजावर, माणसांवर, पशूंवर व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर अवर्षण बोलावले आहे.”


मी तुमच्यावर, तुमच्या हातच्या सर्व कामांवर तांबेरा, भेरड व गारा ह्यांचा मारा केला; तरी तुमच्यातला एकही माझ्याकडे वळला नाही, असे परमेश्वर म्हणतो.


तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणार्‍यास मी तुमच्यासाठी धमकावीन; तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याच्याजवळ गेला; पण पानांशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, “ह्यापुढे तुला कधीही फळ न येवो.” आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले.


सूर्य तीव्र तेजाने उगवला व त्याने ‘गवत कोमेजवले, मग त्याचे फूल गळाले,’ आणि त्याच्या रूपाची शोभा गेली; ह्याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जाईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan