Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 8:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वर म्हणतो, त्या काळात यहूदाच्या राजांच्या अस्थी, त्यांच्या सरदारांच्या अस्थी, याजकांच्या अस्थी, संदेष्ट्यांच्या अस्थी व यरुशलेमकरांच्या अस्थी त्यांच्या कबरांतून बाहेर काढतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर असे म्हणतो: त्यावेळी, ते यहूदातील राजांची प्रमुख नेत्यांची, याजकांची, संदेष्ट्यांची आणि यरूशलेममधील सर्व लोकांची हाडे कबरीतून बाहेर काढतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “ ‘याहवेह असे म्हणतात, यहूदीयाच्या राजांची आणि अधिपतींची हाडे, याजकांची हाडे व संदेष्ट्यांची हाडे व यरुशलेमच्या लोकांची हाडे त्यांच्या कबरांतून बाहेर काढली जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 8:1
12 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या आज्ञेवरून त्याने त्या वेदीविरुद्ध हे शब्द उच्चारले : “हे वेदी, हे वेदी, परमेश्वर म्हणतो, पाहा, दाविदाच्या घराण्यात योशीया नावाचा एक पुत्र जन्मेल; जे उच्च स्थानांचे याजक तुझ्यावर होमहवन करतात त्यांचा तो तुझ्यावर यज्ञ करील, मानवांच्या अस्थी तुझ्यावर जाळील.”


योशीयाने वळून पाहिले तर डोंगरावरील कबरा त्याच्या दृष्टीस पडल्या; त्याने माणसे पाठवून कबरांतून हाडे बाहेर काढून आणवली आणि ती त्या वेदीवर जाळून ती भ्रष्ट केली. ह्या गोष्टी विदित करणार्‍या देवाच्या माणसाने देवाचे जे वचन कळवले होते त्याप्रमाणे हे घडले.


तेथल्या उच्च स्थानांचे याजक होते तितक्यांना त्याने त्या वेद्यांवर बली दिले व त्यांच्यावर माणसांची हाडे जाळली. मग तो यरुशलेमेस परत गेला.


ईजबेलीचे शव इज्रेलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील, ही ईजबेल आहे असे कोणी ओळखणार नाही.”’


पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भेदरले आहेत; कारण तुझ्याविरुद्ध छावणी देऊन बसणार्‍यांची हाडे देवाने विखरली आहेत; तू त्यांची फजिती केली आहेस, कारण देवाने त्यांचा धिक्कार केला आहे.


आणि ज्या लोकांना ते संदेश देतात तेही दुष्काळाने व तलवारीने मरतील व त्यांना यरुशलेमेच्या रस्त्यांनी पकडून देतील; त्यांना, त्यांच्या स्त्रियांना, त्यांच्या पुत्रांना व त्यांच्या कन्यांना कोणी पुरणार नाही; मी त्यांची दुष्टता त्यांच्यावर लोटीन.


परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला; आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोर्‍यात नेऊन ठेवले, तेथे अस्थीच अस्थी होत्या.


तुमच्या वेद्या ओसाड होतील; तुमच्या सूर्यमूर्ती फोडून टाकण्यात येतील; तुमचे वध पावलेले लोक तुमच्या मूर्तींपुढे पडतील असे मी करीन.


मी इस्राएल वंशजांची प्रेते त्यांच्या मूर्तींपुढे टाकीन, तुमच्या वेद्यांभोवती तुमची हाडे विखरीन.


परमेश्वर म्हणतो, “मवाबाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्याने अदोमाच्या राजाची हाडे भाजून त्यांचा चुना केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan