Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 हर्षाचा व आनंदाचा शब्द, वराचा व वधूचा शब्द, यहूदाच्या नगरांतून व यरुशलेमेच्या रस्त्यांतून बंद पडेल असे मी करीन; कारण भूमी वैराण होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 यहूदाच्या गावांतील व यरूशलेमेच्या रस्त्यांवरील उल्हासाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. वधू वरांचा शब्द उमटणार नाही, कारण भूमी ओसाड होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 तेव्हा मी हर्षगीते व आनंदाचे गायन आणि वर-वधू यांचे आनंदी बोल यहूदीया नगरात व यरुशलेमच्या रस्त्यावरून संपविणार आहे, कारण संपूर्ण भूमी उजाड अशी होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:34
23 Iomraidhean Croise  

पाहा! ती रात्र निष्फळ असो; तिच्यात आनंदघोषाचा प्रवेश न होवो.


अग्नीने त्यांचे कुमार खाऊन टाकले; त्यांच्या कुमारींना लग्नगीते लाभली नाहीत.


तुमचा देश ओसाड आहे; तुमची नगरे अग्नीने जळाली आहेत; तुमची शेते परके लोक तुमच्यादेखत खाऊन टाकत आहेत; परक्यांनी उद्ध्वस्त केल्याप्रमाणे ती ओसाड झाली आहेत.


तेव्हा तिच्या वेशी आकांत करतील, शोकाकुल होतील व ती एकटी1 होऊन भुईवर बसेल.


मी म्हणालो, “हे प्रभू, असे कोठवर?” तो म्हणाला, “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल,


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, तुमच्या हयातीत, तुमच्या डोळ्यांपुढे ह्या ठिकाणातून खुशालीचा व आनंदाचा शब्द, नवर्‍याचा व नवरीचा शब्द नाहीसा होईल असे मी करीन.


कारण यहूदाच्या राजघराण्याविषयी परमेश्वर म्हणतो : तू मला गिलाद, लबानोनाचे शिखर असे आहेस; मी तुला खातरीने ओसाड भूमीसारखे, निर्जन नगरासारखे करीन.


त्यांमधून आनंदाचा व उल्लासाचा शब्द, नवर्‍याचा व नवरीचा शब्द, जात्याची घरघर व दिव्याचा प्रकाश ही नाहीतशी करीन.


त्यांचे ऐकू नका; बाबेलच्या राजाची सेवा करून आपला जीव वाचवा; ह्या नगराची नासाडी का व्हावी?


परमेश्वर म्हणतो, ह्या स्थलाविषयी तुम्ही म्हणता की, ‘हे ओसाड आहे, ह्यात माणसे व पशू ह्यांचा मागमूस नाही; यहूदाची नगरे व यरुशलेमेचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांत माणसे, रहिवासी व पशू ह्यांचे नाव नाही;’


त्यांत आनंद व हर्ष ह्यांचा ध्वनी होईल, नवर्‍याची व नवरीची वाणी ऐकू येईल; ‘सेनाधीश परमेश्वराची स्तुती असो, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सर्वकाळची आहे,’ असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतात त्यांचा शब्द पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास उलटवून आरंभी होते तसे सर्वकाही करीन, असे परमेश्वर म्हणतो.


मी पाहिले तर पाहा, बागाईत वैराण झाली आहे व परमेश्वरासमक्ष, त्याच्या तीव्र कोपाने तेथील सर्व नगरे नष्ट झाली आहेत.


परमेश्वर म्हणतो, “सर्व देश उजाड होईल; पण मी त्याचा पुरा अंत करणार नाही.


ह्यामुळे माझा संताप व क्रोध ह्यांचा वर्षाव झाला, तो यहूदाची नगरे व यरुशलेमेच्या आळ्या ह्यांत पेटला; ती ओसाड व वैराण झाली आहेत हे आज दिसत आहे.


वेशीत वडील जन दिसत नाहीत, तरुण आपल्या गायनवादनास अंतरले आहेत.


मी तुझ्या गीतांचा ध्वनी बंद पाडीन, तुझ्या वीणांचा सूर पुन्हा ऐकू येणार नाही.


बलात्कार हा शासनदंड होऊन बसला आहे; त्या लोकांतला कोणीही, त्यांच्या समूहापैकी कोणीही, त्यांच्या धनातले काहीही उरणार नाही; त्यांची काही प्रतिष्ठा राहणार नाही.


तिचे सर्व उत्सव, तिच्या यात्रा, तिची चंद्रदर्शने, तिचे शब्बाथ व तिचे सर्व नेमलेले सण मी बंद करीन.


बआलमूर्तींच्या दिवसांत ती त्यांच्यापुढे धूप जाळत असे, ती नथ व अलंकार ह्यांनी नटून आपल्या वल्लभांच्या मागे जात असे; ती मला विसरली, त्या दिवसांचे प्रतिफळ मी तिला देईन, असे परमेश्वर म्हणतो.


परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन; तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील.


तथापि देश, आपल्या रहिवाशांमुळे, त्यांच्या कृत्यांच्या फळामुळे वैराण होईल.


‘दिव्याचा उजेड’ तुझ्यात ह्यापुढे दिसणारच नाही; ‘आणि नवरानवरीचा शब्द’ तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणारच नाही; तुझे ‘व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक’ होते; आणि सर्व राष्ट्रे ‘तुझ्या चेटकाने’ ठकवली गेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan