Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 कारण यहूदावंशाने माझ्या दृष्टीने जे वाईट ते केले आहे; माझे नाम ज्या मंदिरास दिले आहे ते भ्रष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या अमंगळ वस्तू त्यात ठेवल्या आहेत, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 कारण परमेश्वर असे म्हणतो, यहूदाच्या लोकांस पापे करताना मी पाहिले आहे.” त्यांनी वापरण्यात नसलेल्या गोष्टी, ज्या घराला माझे नाव आहे, ते भ्रष्ट करायला ठेवल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 “ ‘याहवेह म्हणतात, यहूदीयाच्या लोकांनी माझ्या दृष्टीत पाप केले आहे. ज्या मंदिराने माझे नाव धारण केले आहे त्यामध्ये त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्ती ठेवून, ते मंदिर भ्रष्ट केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:30
20 Iomraidhean Croise  

त्याचा बाप हिज्कीया ह्याने उच्च स्थाने उद्ध्वस्त केली होती ती त्याने पुन्हा बांधली; इस्राएलाचा राजा आहाब ह्याच्याप्रमाणे बआलमूर्तीसाठी वेदी बांधून त्याने एक अशेरामूर्ती केली; त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करत असे.


परमेश्वराने ज्या आपल्या मंदिराविषयी म्हटले होते की, “यरुशलेमेत मी आपले नाव ठेवीन” त्यात त्याने वेद्या बांधल्या.


आपण केलेली अशेरामूर्ती त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेवली; ह्या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्यांना परमेश्वर म्हणाला होता की, “हे मंदिर आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतून निवडून घेतलेले यरुशलेम ह्यात मी आपले नाम निरंतर ठेवीन;


आहाजाच्या माडीच्या धाब्यावर ज्या वेद्या यहूदाच्या राजांनी केल्या होत्या आणि मनश्शेने परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत ज्या वेद्या केल्या होत्या, त्या राजाने मोडूनतोडून टाकल्या आणि त्यांची धूळमाती त्याने किद्रोन ओहोळात फेकून दिली.


मग त्याने अन्य देव व मूर्ती परमेश्वराच्या मंदिरातून काढून आणि परमेश्वराच्या मंदिराच्या पर्वतावर व यरुशलेमेत केलेल्या सर्व वेद्या काढून नगराबाहेर फेकून दिल्या.


त्याचा बाप हिज्कीया ह्याने उच्च स्थाने काढून टाकली होती ती त्याने पुन्हा बांधली; बआल मूर्तींसाठी वेद्या बांधून त्याने अशेरा मूर्ती केल्या; त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करत असे.


आपण केलेली कोरीव मूर्ती त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेवली; ह्या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्यांना परमेश्वर म्हणाला होता की, “हे मंदिर आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतून निवडून घेतलेले यरुशलेम ह्यांत मी आपले नाम निरंतर ठेवीन;


त्या अर्थी मी त्यांच्यासाठी दुर्दशा पसंत करीन, ज्याची त्यांना भीती वाटते ते त्यांच्यावर आणीन; कारण मी हाक मारली तेव्हा कोणी उत्तर दिले नाही, मी बोललो तेव्हा त्यांनी माझे ऐकले नाही, तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले, मला जे नापसंत ते त्यांनी पसंत केले.”


प्रथमत: त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप ह्यांचे दुप्पट प्रतिफळ मी त्यांना देईन; कारण त्यांनी आपल्या प्रेतवत व अमंगळ मूर्तींनी माझा देश भ्रष्ट केला आहे. त्यांनी आपल्या किळसवाण्या वस्तूंनी माझे वतन भरले आहे.”


“कारण संदेष्टा व याजक हे दोघेही भ्रष्ट आहेत; माझ्या मंदिरातदेखील मला त्यांचे दुष्कर्म दिसून आले आहे, असे परमेश्वर म्हणतो.


तर ज्या मंदिराला माझे नाम दिले आहे ते भ्रष्ट करण्यासाठी त्यात त्यांनी आपल्या अमंगल वस्तू स्थापल्या.


यहूदाला पापास प्रवृत्त करण्यासाठी मोलखाच्या मूर्तीला आपले पुत्र व कन्या होम करून अर्पाव्यात म्हणून बेन-हिन्नोमाच्या खोर्‍यात त्यांनी बालमूर्तीची उच्च स्थाने बांधली; हे मी त्यांना आज्ञापिले नव्हते; ते असले घोर कृत्य करतील हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते.


त्यांनी त्यांची केलेली भूषणे दिमाख दाखवण्यासाठी वापरली; त्यांनी त्याच्या अमंगळ मूर्ती व तिरस्करणीय वस्तू आपणांसाठी बनवल्या; म्हणून ते त्यांना अमंगळ वस्तूसमान वाटावे असे मी केले आहे.


त्याने हाताच्या आकृतीचे काही पुढे करून माझ्या डोक्यावरील एक बट धरली आणि आत्म्याने आकाश व पृथ्वी ह्यांच्या दरम्यान मला उचलून नेऊन दिव्यदृष्टीने यरुशलेम येथे उत्तरेस असलेल्या आतल्या अंगणाच्या दरवाजाजवळ आणले; तेथे ईर्ष्येस पेटवणार्‍या मूर्तीचे आसन होते.


त्याच्या पक्षाचे सैनिक उठावणी करतील; ते पवित्रस्थान, तो दुर्ग, ते भ्रष्ट करतील, नित्याचे बलिहवन ते बंद करतील आणि विध्वंसमूलक अमंगलाची ते स्थापना करतील.


तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा पक्का करार करील; अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील; उद्ध्वस्त करणारा अमंगलांच्या पंखांवर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणार्‍यावर कोपाचा वर्षाव होईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan