Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तुमचे पूर्वज मिसर देशातून निघाले तेव्हापासून आजवर माझे सर्व सेवक जे संदेष्टे तुमच्याकडे मी पाठवत आलो, त्यांना मोठ्या निकडीने पाठवत आलो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तुमच्या पूर्वजांनी मिसर सोडला त्या दिवसापासून आजवर मी माझे सेवक तुमच्याकडे पाठवले आहेत. माझे सेवक संदेष्टे आहेत. मी पुन्हा पुन्हा त्यांना तुमच्याकडे पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 तुमच्या पूर्वजांनी इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून आजपर्यंत, दिवसेंदिवस, पुन्हापुन्हा मी माझे संदेष्टे पाठवित राहिलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:25
30 Iomraidhean Croise  

तरी त्यांना आपल्याकडे परत आणावे म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्टे पाठवले; त्यांनी त्यांचा निषेध केला, पण ते काही ऐकेनात.


त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर मोठ्या निकडीने आपल्या दूतांच्या हस्ते त्यांना आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती;


आमच्या पूर्वजांच्या काळापासून आजपर्यंत आम्ही अतिशय अपराधी आहोत; आणि आमच्या अधर्मामुळे आम्ही, आमचे राजे व आमचे याजक अनेक देशांच्या राजांच्या हाती सापडून तलवार, बंदिवास, लुटालूट व लोकलज्जा अशा विपत्तीत पडलो आहोत; आज आमची स्थिती अशीच आहे.


पण त्यांनी आज्ञाभंग करून तुझ्याविरुद्ध बंड केले; तुझे नियमशास्त्र त्यांनी पाठीमागे फेकून दिले; तुझ्याकडे त्यांनी पुन्हा वळावे असे ज्या तुझ्या संदेष्ट्यांनी निक्षून सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले आणि तुला संतप्त केले.


तू पुष्कळ वर्षे त्यांची गय केलीस व आपल्या आत्म्याने संदेष्ट्यांच्या द्वारे त्यांना बजावत आलास; पण त्यांनी कान दिला नाही म्हणून तू त्यांना अनेक देशांतील लोकांच्या हाती दिलेस.


माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी केले नाही असे अधिक काय करायचे राहिले? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली?


मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजवर मी त्यांना बजावून सांगत आलो आहे; नित्य मोठ्या निकडीने बजावत आलो आहे की माझा शब्द ऐका;


“यहूदाचा राजा आमोनाचा पुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून आजवर तेवीस वर्षे परमेश्वराचे वचन मला प्राप्त होत असून ते मी तुम्हांला सांगत आलो, मोठ्या निकडीने सांगत आलो; तरी तुम्ही ते ऐकले नाही.


परमेश्वर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना तुमच्याकडे पाठवत आला, मोठ्या निकडीने पाठवत आला, तरी तुम्ही ऐकले नाही, आपला कान लावला नाही.


परमेश्वर म्हणतो, माझे सेवक जे संदेष्टे त्यांना माझी वचने देऊन मी मोठ्या निकडीने त्यांच्याकडे पाठवत आलो तरी त्यांनी ती ऐकली नाहीत; आणि तुम्हीही ती ऐकत नाही, असे परमेश्वर म्हणतो.


रेखाबाचा पुत्र योनादाब ह्याने आपल्या वंशजांना द्राक्षारस न पिण्याविषयी आज्ञा केली, त्याप्रमाणे त्यांच्याकडून वागणूक होत आहे; त्यांनी आजवर द्राक्षारसाचे सेवन केले नाही; आपल्या पूर्वजांची आज्ञा त्यांनी मानली; पण मी मोठ्या निकडीने तुम्हांला सांगत आलो तरी तुम्ही माझे ऐकले नाही.


मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही.


मी तर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना तुमच्याकडे पाठवत आलो; मोठ्या निकडीने त्यांना तुमच्याकडे पाठवून सांगत असे की, ‘ह्या अमंगळ कर्माचा मला वीट आहे; ती करू नका’.


परमेश्वर म्हणतो, तुम्ही ही सर्व कृत्ये केली, मी तुमच्याशी मोठ्या निकडीने बोलत असता तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हांला हाक मारीत असता तुम्ही उत्तर दिले नाही;


तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल वंशजांकडे, माझ्याशी फितुरी केलेल्या त्या फितूर राष्ट्राकडे पाठवतो. त्यांनी व त्यांच्या वाडवडिलांनी आजपर्यंत माझ्याविरुद्ध वर्तन केले आहे.


माझ्या लोकांचा माझ्यापासून मागे फिरण्याकडे कल आहे, आणि त्यांना बोलावले असता कोणी उठून दृष्टी वर करीत नाहीत.


मी संदेष्ट्यांबरोबर बोललो आहे; मीच दिव्यदर्शनांची रेलचेल केली आहे आणि संदेष्ट्यांच्या द्वारे मी दृष्टान्त देऊन बोध केला आहे.


तुमच्या पुत्रांतील काहींना संदेष्टे होण्यासाठी व तुमच्या तरुणांतील काहींना नाजीर होण्यासाठी मी वाढवले, इस्राएल वंशजहो, असे नव्हे काय?” असे परमेश्वर म्हणतो.


तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून माझे विधी तुम्ही मोडले, ते पाळले नाहीत. माझ्याकडे वळा, म्हणजे मी तुमच्याकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत वळावे?’


ह्या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवीन, आणि त्यांच्यातील कित्येकांना ते जिवे मारतील व कित्येकांना छळतील;


रानात तू आपला देव परमेश्वर ह्याला संतापवलेस त्याची आठवण ठेव, विसरू नकोस; मिसर देशातून तुम्ही बाहेर निघालात तेव्हापासून ह्या ठिकाणी येऊन पोहचेपर्यंत तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडच करीत आला आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan