Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तरीपण त्यांनी ऐकले नाही, आपला कान दिला नाही, ते आपल्या संकल्पाप्रमाणे, आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे चालले, ते मागे गेले, पुढे आले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. ते त्यांच्या दुष्ट अंतःकरणाच्या, त्यांच्या स्वतःच्या हट्टी योजनांनुसार जगले. म्हणून ते पुढे येण्याऐवजी मागे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट, स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टी व दुष्ट विचारांना अनुसरले. ते पुढे जाण्याऐवजी त्यांची माघारच झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:24
37 Iomraidhean Croise  

त्यांना पुन्हा नियमशास्त्राप्रत आणावे म्हणून तू त्यांना बजावून सांगितले तरी त्यांनी उन्मत्त होऊन तुझ्या आज्ञांचा अवमान केला आणि जे निर्णय पाळल्याने मनुष्य जिवंत राहतो ते न जुमानता त्यांनी पाप केले; त्यांनी आपला खांदा जुवाखालून काढून घेतला, मान ताठ केली व ते ऐकतनासे झाले.


माझे लोक माझे ऐकतील, इस्राएल माझ्या मार्गांनी चालेल, तर बरे होईल!


ते दुष्ट लोक माझी वचने ऐकत नाहीत, ते आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात आणि अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांना भजण्यास त्यांच्यामागे जातात म्हणून त्यांची गती ह्या निरुपयोगी झालेल्या कमरबंदाप्रमाणे होईल.


इस्राएलाचे सर्व घराणे व यहूदाचे सर्व घराणे ह्यांनी माझी प्रजा व्हावे, आणि माझे नाम, स्तुती व भूषण ह्यांना कारण व्हावे म्हणून, कमरबंद जसा मनुष्याच्या कंबरेस लगटलेला असतो तसे त्यांनी मला लगटून राहावे असे मी केले, तरी त्यांनी मानले नाही, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर म्हणतो, तू माझा त्याग केला आहेस; तू मागे फिरली आहेस, म्हणून मी आपला हात तुझ्यावर उगारून तुझा नाश करीन; मी अनुताप करून कंटाळलो आहे.


तुम्ही तर तुमच्या पूर्वजांच्यापेक्षा जास्त दुष्कर्म केले आहे; कारण पाहा, तुम्ही सगळे आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे वागत असून माझे ऐकत नाही.


पण त्यांनी ऐकले नाही, त्यांनी आपला कान दिला नाही; ऐकू नये व शिक्षण घेऊ नये म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.


हृदय सर्वांत कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?


तरीपण माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्याने माझे वचन पाळले नाही, तर त्याचे मी हित करीन म्हणून बोललो त्याविषयी मला अनुताप होईल.


तरी ते म्हणतात, ‘काय उपयोग? आम्ही आपल्या मनसुब्यांप्रमाणे चालणार; आम्ही सर्व आपापल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे करणार.’


ते काष्ठास म्हणतात, ‘तू माझा बाप;’ पाषाणास म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास;’ त्यांनी माझ्याकडे मुख नव्हे तर पाठ फिरवली; तरी संकटसमयी ते म्हणतील, ‘ऊठ; आमचा बचाव कर.’


तुझी सुखसोय असता मी तुझ्याबरोबर बोललो, तेव्हा तू म्हणालीस, ‘मी ऐकणार नाही.’ माझे म्हणणे ऐकू नये ही लहानपणापासून तुला खोड आहे.


मला तुच्छ मानणार्‍यांना ते म्हणत राहतात की, ‘परमेश्वर बोलला आहे : तुम्हांला शांती प्राप्त होईल;’ आपल्या अंत:करणाच्या हट्टाप्रमाणे चालणार्‍या सर्वांस ते म्हणतात की, ‘तुमच्यावर काही अरिष्ट येणार नाही.’


तू आपला देव परमेश्वर ह्याच्यापासून पतन पावून इकडे तिकडे प्रत्येक हिरव्या झाडाखालून परक्याबरोबर भटकलीस व माझा शब्द ऐकला नाहीस, हा आपला दोष मात्र पदरी घे, असे परमेश्वर म्हणतो.


त्या काळी यरुशलेमेस परमेश्वराचे सिंहासन म्हणतील, त्याच्याकडे सर्व राष्ट्रे जमा होतील. कारण परमेश्वराचे नाम यरुशलेमेत आहे; ह्यापुढे ती आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणार नाहीत.


त्यांनी येऊन त्याचा ताबा घेतला, परंतु त्यांनी तुझी वाणी ऐकली नाही व तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे ते चालले नाहीत; तू त्यांना आज्ञापिले त्याप्रमाणे त्यांनी मुळीच केले नाही, म्हणून तू त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणलेस.


त्यांनी माझ्याकडे तोंड नव्हे तर पाठ फिरवली; मी त्यांना बोध केला, मोठ्या निकडीने मी त्यांना शिकवत गेलो तरी ते बोधाकडे कान देईनात.


मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही.


परमेश्वर म्हणतो, “चवाठ्यावर उभे राहून पाहा आणि पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा; सन्मार्गाने चाला; अशाने तुमच्या जिवास विश्रांती मिळेल;” पण ते म्हणाले, ‘आम्ही चालणार नाही.’


पण त्यांनी माझे ऐकले नाही, आपला कान दिला नाही, त्यांनी आपली मान ताठ केली व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक वाईट केले.


मग हे यरुशलेमकर एकसारखे का बहकत राहिले आहेत? ते कपटाला चिकटून राहिले आहेत, ते वळण्यास कबूल होत नाहीत.


तर ते आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले त्यांच्या पूर्वजांनी त्यांना शिकवल्याप्रमाणे ते बआलमूर्तींच्या मागे लागले.


तरीपण रानात इस्राएल घराणे मला फितूर झाले. ज्यांच्या पालनाने मनुष्य वाचतो, त्या माझ्या नियमांप्रमाणे ते चालले नाहीत, माझे निर्णय त्यांनी टाकून दिले व माझे शब्बाथ फार भ्रष्ट केले; तेव्हा रानात त्यांच्यावर आपल्या क्रोधाची वृष्टी करून त्यांचा नाश करावा असे मी म्हटले.


कारण त्यांचे अंतःकरण त्यांच्या मूर्तींशी जडल्यामुळे त्यांनी माझे निर्णय टाकून दिले, ते माझ्या नियमांप्रमाणे चालले नाहीत, व त्यांनी माझे शब्बाथ भ्रष्ट केले.


तरीपण ते वंशजही मला फितूर झाले; जे पाळल्याने मनुष्य वाचतो त्या माझ्या नियमांप्रमाणे ते चालले नाहीत; ते माझे निर्णय त्यांनी टाकून दिले; माझे शब्बाथ त्यांनी भ्रष्ट केले; तेव्हा रानात त्यांच्यावर आपल्या क्रोधाची वृष्टी करून त्यांच्यावर माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले.


तरीपण ते माझ्याशी फितूर झाले व माझे ऐकेनात; त्यांच्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू त्यांच्यातील कोणी फेकून दिल्या नाहीत; मिसर देशाच्या मूर्तीही सोडून दिल्या नाहीत; तेव्हा मिसर देशात त्यांच्यावर माझ्या क्रोधाची वृष्टी करावी, त्यांच्यावर माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले.


तुझे सेवक जे संदेष्टे त्यांनी तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार, वडील व देशाचे सर्व लोक ह्यांना सांगितले तेही आम्ही ऐकले नाही.


यारेब राजासाठी भेट म्हणून ते अश्शूरास नेतील; एफ्राईम लज्जेने व्याप्त होईल, इस्राएलास आपल्या स्वतःच्या मसलतीची लाज वाटेल;


कारण इस्राएल हट्टी कालवडीसारखा हट्ट करीत आहे; आता परमेश्वर विस्तीर्ण कुरणात कोकराप्रमाणे त्यांना चारील.


अम्रीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, व त्यांच्या तत्त्वांप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल, त्याच्या रहिवाशांची निर्भर्त्सना होईल असे मी करीन; माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हांला सोसावी लागेल.”


पण ते ऐकेनात, त्यांनी मान ताठ केली व ऐकू नये म्हणून कान बंद केले.


‘जरी मी आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो तरी माझे कुशलच होईल’ असे तो आपल्या मनाचे समाधान करून घेईल, पण त्यामुळे सुक्याबरोबर ओलेही जळून जाईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan