Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, “तुमच्या यज्ञबलींत आपल्या होमबलींची भर घाला व मांस खात जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, तुम्ही आपली होमार्पणे आपल्या यज्ञास जोडा आणि मांस खा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 “ ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: जा पुढाकार घ्या, तुमची होमार्पणे इतर अर्पणात टाका व ते मांस तुम्हीच खा!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:21
9 Iomraidhean Croise  

तुझ्या यज्ञासंबंधाने तर मी तुला बोल लावत नाही; तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच.


तू मला होमार्पण करण्यासाठी मेंढरे आणली नाहीत; आणि मला यज्ञ करून माझे गौरव केले नाही. मी तुझ्यावर अन्नार्पणांसाठी सक्ती केली नाही, धूपासाठी तुला त्रास दिला नाही.


ते उपोषण करतील तेव्हा मी त्यांची आरोळी ऐकणार नाही; ते होमार्पण व अन्नार्पण मला आणतील ती मी स्वीकारणार नाही; मी तलवारीने, दुष्काळाने व मरीने त्यांचा संहार करीन.”


शबाहून ऊद व दूर देशाहून अगरू माझ्याकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुमच्या होमबलींनी मला संतोष नाही, तुमचे यज्ञबली मला पसंत नाहीत.


ह्यास्तव त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो की : तुम्ही रक्तासहित मांस खाता, आपल्या मूर्तींकडे डोळे लावता आणि रक्तपात करता; असे जे तुम्ही त्या तुम्हांला ह्या देशाचे वतन मिळेल काय?


त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय; पण ती परमेश्वर स्वीकारत नाही; आता तो त्यांचा अधर्म स्मरेल व त्यांच्या पापाचे शासन करील; ते मिसरास परत जातील.


आणि तेथे आपले होमबली, म्हणजे मांस व रक्त, आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर अर्पावेस. आपल्या यज्ञांचे रक्त आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर ओतावेस आणि मग त्यांचे मांस तू खावेस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan