Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारात उभा राहा व हे वचन जाहीर कर : यहूदाचे सर्व लोकहो, परमेश्वराचे भजनपूजन करण्यासाठी ह्या द्वारांनी आत जाता ते तुम्ही सर्व परमेश्वराचे वचन ऐका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दारात उभा राहा आणि हे वचन घोषीत कर! “हे यहूदातील लोकहो, जे तुम्ही सर्व परमेश्वराची उपासना करायला या दारातून आत जाता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहा आणि तिथे हा संदेश जाहीर कर: “ ‘यहूदीयातील सर्व लोक जे या प्रवेशद्वारातून याहवेहची उपासना करण्यासाठी आत येतात ते लोकहो, याहवेहचे हे वचन ऐका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:2
38 Iomraidhean Croise  

मीखाया म्हणाला, “तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक : परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले.


हे यरुशलेमे, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत.


सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका; गमोर्‍याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे कान द्या.


हे इस्राएलाच्या घराण्या, परमेश्वर तुम्हांला जे वचन सांगतो, ते ऐका;


परमेश्वर मला म्हणाला, “यहूदाच्या नगरात व यरुशलेमेच्या रस्त्यात ही सर्व वचने पुकारून सांग : ह्या कराराची वचने ऐका व त्याप्रमाणे वागा.


मग परमेश्वराने यिर्मयाला तोफेत येथे जाऊन संदेश देण्यास पाठवले; तेथून तो आला व परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहून सर्व लोकांना म्हणाला,


“जा, हे पुकारून यरुशलेमेच्या कानी पाड : परमेश्वर असे म्हणतो की, तुझे तारुण्यातले प्रेम, वाङ्निश्‍चयाच्या वेळचा तुझा अनुराग व रानात पडीत स्थळी तुझे माझ्यामागून येणे ह्यांचे मला स्मरण आहे.


हे याकोबाच्या घराण्या, इस्राएल घराण्यातील सर्व गोत्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका.


“परमेश्वर म्हणतो : परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहा, व यहूदाच्या सर्व नगरांतून जे परमेश्वराच्या मंदिरात भजनपूजन करण्यास येतात त्यांना जे शब्द बोलण्याची मी तुला आज्ञा केली आहे ते सर्व त्यांना सांग, एकही शब्द गाळू नकोस.


तेव्हा जे याजक व जे सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते त्यांच्यासमक्ष यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याला म्हणाला,


तथापि हे सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक; परमेश्वर तुझ्याविषयी असे म्हणतो की, ‘तू तलवारीने मरणार नाहीस,


परमेश्वराच्या नवीन द्वाराच्या देवडीजवळ वरच्या चौकातील शाफानाचा पुत्र गमर्‍या लेखक ह्याच्या दिवाणखान्यात बारुखाने परमेश्वराच्या मंदिरात, ग्रंथात लिहिलेली यिर्मयाची वचने सर्व लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखवली.


म्हणून तू जा व माझ्या तोंडची जी परमेश्वराची वचने तू पटावर लिहिली ती उपवासाच्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखव; तसेच यहूदाच्या नगरांतून येणार्‍या सर्वांच्या कानी पडतील अशी ती वाचून दाखव.


यिर्मया त्या सर्व लोकांना व सर्व स्त्रियांना म्हणाला, “यहूदातले जे तुम्ही सगळे लोक मिसर देशात आहात ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.


यिर्मयाला परमेश्वरापासून वचन प्राप्त झाले ते हे :


परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला; आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोर्‍यात नेऊन ठेवले, तेथे अस्थीच अस्थी होत्या.


याजकांनो, ऐका; हे इस्राएलाच्या घराण्या, लक्ष दे; हे राजघराण्या, कान दे; कारण तुम्हांला शासन होणार; तुम्ही मिस्पा येथे पाश, ताबोरावर पसरलेले जाळे असे झाला आहात.


तर परमेश्वराचे वचन ऐक; तू म्हणतोस ‘इस्राएलाविरुद्ध संदेश सांगू नकोस, इसहाकाच्या घराण्याविरुद्ध शब्द काढू नकोस.”’


सर्व राष्ट्रांनो, तुम्ही ऐका; अगे पृथ्वी तू व तुझ्यावरील सर्व वस्तुजात ह्यांनी कान द्यावा; प्रभू परमेश्वर, आपल्या पवित्र मंदिरातून प्रभू, तुमच्याविरुद्ध साक्ष देतो,


मी म्हणालो, याकोबाच्या प्रमुखांनो, इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका, न्यायाची जाणीव तुम्हांला नसावी काय?


याकोब घराण्यातील प्रमुखहो, इस्राएल घराण्याचे सरदारहो, जे तुम्ही न्यायाचा अव्हेर करता व नीट आहे त्यास वाकवता ते तुम्ही हे ऐका.


ज्याला कान आहेत तो ऐको.”


येशूने त्याला उत्तर दिले, “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानांत व मंदिरात सर्व यहूदी जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले, गुप्तपणे काही बोललो नाही.


“जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा.”


आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही.


आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला दुसर्‍या मरणाची बाधा होणारच नाही.


आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त ‘राखलेल्या मान्न्यातून मी देईन’ आणि त्याला मी पांढरा खडा देईन; त्या खड्यावर ‘नवे नाव’ लिहिलेले असेल, ते तो खडा घेणार्‍याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही.


आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.


आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला, ‘देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड’ आहे, ‘त्यावरचे’ फळ मी ‘खाण्यास देईन.’


आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.


आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.”


आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.


Lean sinn:

Sanasan


Sanasan