Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आणि तुमचे सर्व भाऊबंद, एफ्राइमाचे सर्व संतान ह्यांना घालवून दिले, त्याप्रमाणे मी तुम्हांला माझ्यासमोरून घालवून देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 एफ्राईममधील तुमच्या भावांना मी माझ्यापासून जसे दूर केले, तसे मी तुम्हास माझ्यापासून दूर करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मी तुम्हाला माझ्या उपस्थितीतून दूर लोटेन, जसे तुमचे इस्राएली भाऊबंद, म्हणजे एफ्राईमच्या लोकांना केले तसे करेन.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:15
25 Iomraidhean Croise  

शेवटी परमेश्वराने आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांच्या द्वारे सांगितल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या दृष्टिआड केले. त्यांना स्वदेशातून काढून अश्शूरास नेण्यात आले; तेथेच ते आजवर राहत आहेत.


परमेश्वराच्या कोपामुळे यरुशलेम व यहूदा ह्यांची अशी दशा झाली की शेवटी त्याने त्यांना आपल्या दृष्टीआड केले. आणि सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.


त्याने सर्व यहूदी व बन्यामिनी लोकांना व त्यांच्याबरोबर राहणार्‍या एफ्राईम, मनश्शे व शिमोन ह्या प्रांतांतल्या लोकांना एकत्र केले; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा इस्राएलातले पुष्कळ लोक त्याच्या बाजूचे झाले.


तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस; आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस.


कारण वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्या मुलाला समजू लागण्यापूर्वी ज्या दोन राजांच्या भीतीने तू घाबरला आहेस त्यांचा देश उजाड होईल.


मग परमेश्वर मला म्हणाला, “मोशे व शमुवेल हे माझ्यापुढे उभे राहिले तरी माझे अंतःकरण ह्या लोकांकडे वळायचे नाही; त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालव, त्यांना निघून जाऊ दे.


जेव्हा हे लोक किंवा एखादा संदेष्टा किंवा याजक तुला विचारील की, ‘परमेश्वराचे भारी वचन काय आहे?’ तेव्हा त्यांना म्हण, ‘तुम्ही भारी आहात आणि मीच तुम्हांला टाकून देईन,’ असे परमेश्वर म्हणतो.


त्या अर्थी पाहा, मी तुम्हांला अगदी विसरेन, मी तुम्हांला आणि जे नगर तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिले त्याला माझ्या नजरेसमोरून झुगारून देईन;


आणि तिला जरी असे दिसून आले की मला सोडून जाणारी इस्राएल हिला जारकर्म केल्यामुळे मी टाकून सूटपत्र दिले, तरी तिची बेइमान बहीण यहूदा हिला बिलकूल भीती वाटली नाही; तीही जाऊन व्यभिचार करू लागली.


परमेश्वराच्या कोपामुळे यरुशलेम व यहूदा ह्यांची अशी दशा झाली की शेवटी त्याने त्यांना आपल्या दृष्टिआड केले; सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.


कारण सीयोनेतून आक्रंदनाचा शब्द ऐकू येत आहे; ‘आम्हांला कसे नागवले आहे! आमची कशी फजिती उडाली आहे! आम्ही देश त्यागला आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडली आहेत.”’


तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस म्हणून मी तिच्याप्रमाणे तुझ्याही हाती पेला देईन.


ह्यास्तव त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो की : तुम्ही रक्तासहित मांस खाता, आपल्या मूर्तींकडे डोळे लावता आणि रक्तपात करता; असे जे तुम्ही त्या तुम्हांला ह्या देशाचे वतन मिळेल काय?


तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, “ह्याचे नाव इज्रेल ठेव; कारण थोडा काळ लोटल्यावर मी इज्रेल येथील रक्तपाताचा सूड येहूच्या राजघराण्यावर उगवीन व इस्राएल घराण्याच्या राज्याचा अंत करीन.


एफ्राईम वायूची जोपासना करतो, पूर्वेच्या वार्‍याच्या मागे लागतो; दिवसभर तो लबाडी व नाश ह्यांची वृद्धी करतो; ते अश्शूराबरोबर करार करतात, मिसर देशात तेल नेतात.


शोमरोनास प्रायश्‍चित्त मिळेल कारण तो आपल्या देवापासून फितूर झाला आहे; ते तलवारीने पडतील, त्यांची अर्भके आपटून मारतील, त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकतील.


त्यांना धिक्कार असो, कारण ते माझ्यापासून बहकले आहेत; त्यांचा समूळ नाश होणार, कारण त्यांनी माझ्याबरोबर फितुरी केली आहे; त्यांना उद्धरावे अशी माझी इच्छा होती; ते माझ्याविषयी खोटेनाटे बोलले आहेत.


एफ्राईम आपल्या मुलांना बळी देणार्‍या मनुष्यासारखा2 मला दिसला; तो आपल्या मुलांना वध करणार्‍याकडे घेऊन येईल.


ते परमेश्वराच्या देशात राहायचे नाहीत; एफ्राईम मिसर देशास परत जाईल; ते अश्शूरच्या देशात अमंगल पदार्थ भक्षण करतील.


गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखा त्यांनी अति भ्रष्टाचार केला आहे; तो त्यांचा अधर्म स्मरतो; तो त्यांच्या पापांचे प्रतिफळ देतो.


मी म्हणालो, ‘तुझ्या दृष्टिवेगळे मला फेकून दिले आहे; तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन.’


योसेफपुत्रांपैकी एफ्राईम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan