Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 म्हणून ज्याला माझे नाम दिले आहे व ज्यावर तुमची श्रद्धा आहे त्या ह्या मंदिराचे आणि तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना मी दिलेल्या ह्या स्थळाचे, शिलोचे केले तसे करीन;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 म्हणून, शिलोचे जसे मी केले, त्याचप्रकारे ज्या घरास माझे नाव आहे आणि ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे ठिकाण मी तुम्हास व तुमच्या पूर्वजांना दिले तसे करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 म्हणून माझे नाव धारण केलेले मंदिर, ज्याच्यावर तुम्ही भरवसा ठेवता, जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले होते, आता त्या मंदिराचे, मी शिलोहचे केले तसेच करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:14
28 Iomraidhean Croise  

त्याने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा जाळून टाकला, तशीच यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली.


आणि हे मंदिर उच्च स्थानी राहील तरी ह्याच्याजवळून जाणारेयेणारे चकित होऊन म्हणतील, ‘परमेश्वराने ह्या देशाचे व ह्या मंदिराचे असे का केले?’


त्याने शिलो येथील निवासमंडप म्हणजे मानवामध्ये उभारलेला आपला डेरा सोडून दिला;


आमचे पूर्वज ज्या आमच्या पवित्र व सुशोभित मंदिरात तुला स्तवीत, ते अग्नीचे भक्ष्य झाले आहे, आणि आमच्या सगळ्या मनोरम वस्तू नष्ट झाल्या आहेत.


“मी आपल्या घराचा त्याग केला आहे, मी आपले वतन टाकून दिले आहे; मी आपल्या प्राणप्रियेस तिच्या शत्रूंच्या हाती दिले आहे.


त्या अर्थी पाहा, मी तुम्हांला अगदी विसरेन, मी तुम्हांला आणि जे नगर तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिले त्याला माझ्या नजरेसमोरून झुगारून देईन;


“यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या दिवसांत मीखा1 मोरष्टकर ह्याने संदेश दिला; तो यहूदाच्या सर्व लोकांना म्हणाला, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम ढिगार होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.’


त्यांना सांग की, ‘परमेश्वर असे म्हणतो : तुम्ही माझे ऐकणार नाही, मी तुमच्यापुढे ठेवलेल्या नियमांप्रमाणे तुम्ही चालणार नाही,


आणि मग येऊन ज्या मंदिराला मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगळ कृत्ये करण्यास आम्हांला हरकत नाही, असे मनात म्हणता.


तर ज्या स्थळी माझे नाम राहावे असे मी प्रथम योजले होते त्या शिलोस जा व माझे लोक इस्राएल ह्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचे काय केले ते पाहा.


‘हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर’ असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका.


परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे, त्याला आपल्या पवित्रस्थानाचा वीट आला आहे; त्याने त्याच्या वाड्यांच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत; पर्वणीच्या दिवशी होतो तसा त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात गोंगाट केला आहे.


सोने कसे निस्तेज झाले आहे! अति शुद्ध सोने कसे बदलले आहे! पवित्रस्थानाचे पाषाण हरएक रस्त्याच्या चवाठ्यावर विखरले आहेत.


तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस म्हणून मी तिच्याप्रमाणे तुझ्याही हाती पेला देईन.


‘इस्राएलाच्या घराण्यास असे सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो : पाहा, तुमच्या बळाचा आधार, तुमच्या नेत्रांना प्रिय, तुमच्या जिवाचा जिव्हाळा, असे जे माझे पवित्रस्थान ते मी भ्रष्ट करीन आणि तुम्ही मागे ठेवलेले तुमचे कन्यापुत्र तलवारीने पडतील.


पण तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाची स्थापना करण्यासाठी तुमच्या सर्व वंशांच्या वतनातून जे स्थान निवडून घेईल तेथे त्याच्या निवासस्थानी तुम्ही त्याला शरण जा व तेथेच जात जा;


तुझ्या देशातील सर्व उंच व मजबूत तट, ज्यांवर तू भिस्त ठेवशील ते पाडून टाकीपर्यंत तुला तुझ्या सर्व नगरांच्या आत ते कोंडतील, आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशातील सर्व नगरांच्या आत तुला ते वेढतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan