Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 परमेश्वर म्हणतो, तुम्ही ही सर्व कृत्ये केली, मी तुमच्याशी मोठ्या निकडीने बोलत असता तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हांला हाक मारीत असता तुम्ही उत्तर दिले नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 इस्राएलाच्या लोकांनो, तुम्हीही सर्व दुष्कृत्ये करीत होता.” परमेश्वर असे म्हणतो! मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हास बोलाविले, पण तुम्ही उत्तर दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 याहवेह म्हणाले, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत असताना, मी तुमच्याशी वारंवार बोललो, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हाला हाक मारली, पण मला उत्तर दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:13
27 Iomraidhean Croise  

मी हाक मारली पण तुम्ही आला नाहीत; मी आपला हात पुढे केला, पण कोणी लक्ष दिले नाही;


मी आलो तेव्हा कोणी नव्हता; मी हाक मारली तेव्हा जबाब द्यायला कोणी नव्हता, ते का? मुक्त करवत नाही इतका माझा हात तोकडा झाला आहे काय? माझ्या ठायी सोडवण्याचे सामर्थ्य नाही काय? पाहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो, नद्यांचे रान करतो; पाणी नसल्यामुळे त्यातील मासे कुजून त्यांची घाण येते, ते पाण्यावाचून मरतात.


त्या तुम्हांला तलवार नेमली आहे; तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल; कारण मी हाक मारली तरी तुम्ही उत्तर दिले नाही; मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही; माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले.”


त्या अर्थी मी त्यांच्यासाठी दुर्दशा पसंत करीन, ज्याची त्यांना भीती वाटते ते त्यांच्यावर आणीन; कारण मी हाक मारली तेव्हा कोणी उत्तर दिले नाही, मी बोललो तेव्हा त्यांनी माझे ऐकले नाही, तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले, मला जे नापसंत ते त्यांनी पसंत केले.”


मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजवर मी त्यांना बजावून सांगत आलो आहे; नित्य मोठ्या निकडीने बजावत आलो आहे की माझा शब्द ऐका;


पण ते ऐकेनात, आपला कान लावीनात, तर आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे ते चालत गेले; मी त्यांना ह्या कराराची वचने पाळण्यास सांगितले असून त्यांनी ती पाळली नाहीत, म्हणून त्या करारात सांगितलेले सर्व मी त्यांच्यावर आणले.”


ते दुष्ट लोक माझी वचने ऐकत नाहीत, ते आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात आणि अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांना भजण्यास त्यांच्यामागे जातात म्हणून त्यांची गती ह्या निरुपयोगी झालेल्या कमरबंदाप्रमाणे होईल.


इस्राएलाचे सर्व घराणे व यहूदाचे सर्व घराणे ह्यांनी माझी प्रजा व्हावे, आणि माझे नाम, स्तुती व भूषण ह्यांना कारण व्हावे म्हणून, कमरबंद जसा मनुष्याच्या कंबरेस लगटलेला असतो तसे त्यांनी मला लगटून राहावे असे मी केले, तरी त्यांनी मानले नाही, असे परमेश्वर म्हणतो.


“यहूदाचा राजा आमोनाचा पुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून आजवर तेवीस वर्षे परमेश्वराचे वचन मला प्राप्त होत असून ते मी तुम्हांला सांगत आलो, मोठ्या निकडीने सांगत आलो; तरी तुम्ही ते ऐकले नाही.


माझे सेवक जे संदेष्टे त्यांना मी मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवले असता त्यांचे तुम्ही ऐकले नाही, त्यांची वचने आता तुम्ही ऐकणार नाही;


परमेश्वर म्हणतो, माझे सेवक जे संदेष्टे त्यांना माझी वचने देऊन मी मोठ्या निकडीने त्यांच्याकडे पाठवत आलो तरी त्यांनी ती ऐकली नाहीत; आणि तुम्हीही ती ऐकत नाही, असे परमेश्वर म्हणतो.


त्यांनी माझ्याकडे तोंड नव्हे तर पाठ फिरवली; मी त्यांना बोध केला, मोठ्या निकडीने मी त्यांना शिकवत गेलो तरी ते बोधाकडे कान देईनात.


रेखाबाचा पुत्र योनादाब ह्याने आपल्या वंशजांना द्राक्षारस न पिण्याविषयी आज्ञा केली, त्याप्रमाणे त्यांच्याकडून वागणूक होत आहे; त्यांनी आजवर द्राक्षारसाचे सेवन केले नाही; आपल्या पूर्वजांची आज्ञा त्यांनी मानली; पण मी मोठ्या निकडीने तुम्हांला सांगत आलो तरी तुम्ही माझे ऐकले नाही.


मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही.


ह्यास्तव परमेश्वर सेनाधीश देव, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी यहूदा व सर्व यरुशलेमकर ह्यांच्यावर जे सर्व अरिष्ट आणीन म्हणून बोललो ते आणीन; कारण मी त्यांच्याबरोबर बोललो असता त्यांनी ते ऐकले नाही, मी त्यांना हाक मारली असता त्यांनी उत्तर दिले नाही.”


तुम्ही धूप जाळला, परमेश्वराविरुद्ध पाप केले, परमेश्वराची वाणी ऐकली नाही, त्याचे नियमशास्त्र, त्याचे विधी व त्याचे निर्बंध ह्यांनी तुम्ही चालला नाहीत; म्हणून तुमच्यावर हे अरिष्ट आले आहे हे आज दिसतच आहे.”


मी तर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना तुमच्याकडे पाठवत आलो; मोठ्या निकडीने त्यांना तुमच्याकडे पाठवून सांगत असे की, ‘ह्या अमंगळ कर्माचा मला वीट आहे; ती करू नका’.


“मूर्ख, बुद्धिहीन लोकहो, हे आता ऐका; तुम्हांला डोळे असून दिसत नाही. तुम्हांला कान असून ऐकू येत नाही.


मी हे कोणाला सांगून पटवू म्हणजे ते ऐकतील? पाहा, त्यांचा कान बेसुनत आहे, त्यांना ऐकू येत नाही; पाहा, परमेश्वराचे वचन त्यांना निंदास्पद झाले आहे, त्यात त्यांना काही संतोष वाटत नाही.


तुमचे पूर्वज मिसर देशातून निघाले तेव्हापासून आजवर माझे सर्व सेवक जे संदेष्टे तुमच्याकडे मी पाठवत आलो, त्यांना मोठ्या निकडीने पाठवत आलो;


जो जो मी बोलावी, तो तो ते माझ्यापासून दूर जात; ते बआलमूर्तींना बली अर्पण करत, कोरीव मूर्तीपुढे धूप जाळत.


माझ्या लोकांचा माझ्यापासून मागे फिरण्याकडे कल आहे, आणि त्यांना बोलावले असता कोणी उठून दृष्टी वर करीत नाहीत.


माझा देव त्यांचा त्याग करील, कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही, ते राष्ट्राराष्ट्रांतून भटकणारे असे होतील.


तेव्हा असे झाले की, “मी हाक मारीत असता त्यांनी ऐकले नाही, म्हणून ते हाक मारतील तरी मी ऐकणार नाही,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!


Lean sinn:

Sanasan


Sanasan