Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 यरुशलेमे, शुद्धीवर ये, नाहीतर तुझ्यावरचा माझा जीव उडेल, मी तुला ओसाड व निर्जन भूमी करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 यरूशलेम, धोक्याचा इशारा ऐक. जर तू ऐकले नाहीस तर मी तुझ्याकडे पाठ फिरवीन, आणि तुला ओसाड असे करीन, जेथे कोणीही राहू शकणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 हे यरुशलेम, तुला हा इशारा आहे. नाही तर मी तुझ्यापासून दूर होईन आणि मी तुझ्या देशाला उजाड करेन जिथे कोणीही मनुष्य राहणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 6:8
23 Iomraidhean Croise  

राजांनो, आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या.


तू तर शिस्तीचा द्वेष करतोस, माझी वचने मागे झुगारून देतोस.


हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस तो धन्य;


सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील.


तू शिक्षण दृढ धरून ठेव; सोडू नकोस; ते जवळ राख; कारण ते तुझे जीवन आहे,


पण त्यांनी ऐकले नाही, त्यांनी आपला कान दिला नाही; ऐकू नये व शिक्षण घेऊ नये म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.


तरुण सिंहांनी त्याच्यावर गर्जना केली आहे, त्यांनी महानाद केला आहे; त्यांनी त्याचा देश उजाड केला आहे, त्याची नगरे जाळून-पोळून निर्जन केली आहेत.


मी वळल्यावर पश्‍चात्ताप केला; मला बोधप्राप्ती घडल्यावर मी ऊर1 बडवू लागलो; माझ्या तारुण्यातील अपकीर्तीच्या भारामुळे मी लज्जित व फजीत झालो आहे.’


त्यांनी माझ्याकडे तोंड नव्हे तर पाठ फिरवली; मी त्यांना बोध केला, मोठ्या निकडीने मी त्यांना शिकवत गेलो तरी ते बोधाकडे कान देईनात.


हे यरुशलेमे, तू आपल्या अंत:करणाची दुष्टता धुऊन टाक, म्हणजे वाचशील. तुझे वाईट विचार तुझ्यामध्ये कोठवर वसणार?


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझा क्रोध व माझा संताप ह्या स्थळावर, मानवांवर, पशूंवर, शेतातल्या झाडांवर व भूमीच्या उपजावर वर्षेल, तो पेटत राहील, विझणार नाही.”


त्यांना असे सांग, ‘आपला देव परमेश्वर ह्याचा शब्द ऐकत नाही व शिक्षेला मान्य होत नाही ते हेच राष्ट्र आहे; सत्य नष्ट झाले आहे, ते त्यांच्या मुखांतून नाहीसे झाले आहे.


हर्षाचा व आनंदाचा शब्द, वराचा व वधूचा शब्द, यहूदाच्या नगरांतून व यरुशलेमेच्या रस्त्यांतून बंद पडेल असे मी करीन; कारण भूमी वैराण होईल.


यरुशलेम ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान असे मी करीन; यहूदाची नगरे ओसाड, निर्जन करीन.”


असा तिने आपला व्यभिचार मांडला व आपली काया उघडी केली; तेव्हा जसे तिच्या बहिणीवरून माझे मन उडाले होते तसे तिच्यावरूनही उडाले.


त्यांच्या आईने जारकर्म केले आहे, त्यांचे गर्भधारण करणारीने निर्लज्जपणाचे प्रकार केले आहेत. ती म्हणाली, ‘मला अन्न, पाणी, लोकर, ताग, तेल व पेरे पुरवणार्‍या माझ्या वल्लभांमागे मी लागेन.’


त्यांनी मुले लहानाची मोठी केली, तरी एकही मनुष्य उरणार नाही असे मी त्यांना अपत्यहीन करीन; मी त्यांच्यापासून निघून जाईन तेव्हा त्यांना धिक्कार असो!


जितके दिवस देश ओस पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात राहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगत राहील; तेव्हा देशाला विसावा मिळून तो आपले शब्बाथ उपभोगत राहील.


मी म्हणालो, ‘तिने माझे भय मात्र धरावे, बोध घ्यावा, म्हणजे तिच्यासंबंधाने मी जे काही ठरवले आहे त्यानुसार तिची वस्ती नष्ट होणार नाही.’ पण त्यांनी आपली सर्व दुष्कर्मे नेटाने चालवली.”


ते शहाणे असते, त्यांना हे समजले असते, व आपल्या अंतकाळाचा विचार त्यांनी केला असता तर किती बरे झाले असते!


Lean sinn:

Sanasan


Sanasan