Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 6:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 मैदानात जाऊ नकोस, कारण शत्रूची तलवार व भीती चोहोकडे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 बाहेर शेतात जाऊ नका आणि रस्त्यावर चालू नका. कारण शत्रूची तलवारी आणि धोका सगळीकडे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 शेतातून बाहेर जाऊ नका, किंवा रस्त्यांवरून प्रवास करू नका, कारण शत्रूकडे तलवार आहे, आणि प्रत्येक बाजूला आतंक पसरलेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 6:25
20 Iomraidhean Croise  

त्या काळी बाहेर जाणारे व आत येणारे ह्यांपैकी कोणासही शांती नसे; देशाच्या सर्व रहिवाशांना फारच संकटे प्राप्त होत असत.


त्याला दहशत चोहोकडून घाबरे करते; ती त्याचा पिच्छा पुरवते.


कारण पुष्कळांच्या तोंडून माझी बेअब्रू झालेली मी ऐकली आहे; पाहावे तिकडे भयच भय! माझ्याविरुद्ध मनसुबा करून त्यांनी माझा जीव घेण्याची योजना केली.


तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हांला खाऊन टाकील; कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे.”


मी वनात जातो तर पाहा, तेथे तलवारीने वधलेले आहेत! शहरात येतो तर दुष्काळाने पिडलेले मला आढळतात; कारण संदेष्टे व याजक हे अज्ञात देशात भटकत आहेत.”’


कारण मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्याविरुद्ध गिल्ला करा, आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू; कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू.”


“परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही म्हणता आम्ही थरकाप झालेल्यांचा शब्द ऐकला आहे, दहशत आहे, शांती नाही.


तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, ‘तुमचे कुशल होईल’ असे म्हणून तू ह्या लोकांना व यरुशलेमेस खरोखर फारच चढवले आहेस; इकडे तर तलवार जिवाला जाऊन भिडली आहे.”


यहूदात पुकारा, यरुशलेमेत जाहीर करा, आणि म्हणा की, “देशात रणशिंग फुंका; जोराने ओरडून म्हणा, ‘एकत्र व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात जाऊ.’


माझ्या दृष्टीस हे का पडत आहे? ते दहशत बसली म्हणून मागे फिरले आहेत. त्यांचे वीर पराभूत झाले आहेत, ते पळ काढत आहेत, मागे पाहत नाहीत; चोहोकडे भीतीच भीती आहे, असे परमेश्वर म्हणतो.


ते त्यांचे तंबू व कळप नेतील; त्यांच्या कनाती, त्यांची सर्व पात्रे, व त्यांचे उंट ते आपल्यासाठी घेऊन जातील; ‘चोहोकडे दहशत आहे’ असे ते त्यांना सांगतील.


प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, तुझ्या आसपास जे कोणी आहेत त्यांच्यातून मी तुझ्यावर दहशत आणतो; तुमच्यातील एकूणएकास हाकून लावतील, भटकणार्‍यांना एकत्र करायला कोणी राहणार नाही.


आपण स्वस्थ का बसलो आहोत? जमा व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात शिरू व तेथे नष्ट होऊ; कारण आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे म्हणून आम्ही नाश पावावे असे परमेश्वर आमचा देव ह्याने ठरवले आहे व विषाचे पाणी आम्हांला प्यायला दिले आहे.


आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण काही हित होत नाही; घाय बरा होण्याची वाट पाहतो, पण पाहा, दहशतच उभी.


तू पर्वणीच्या दिवसाप्रमाणे दहशतीच्या बाबी माझ्याकडे चोहोकडून बोलावल्या; परमेश्वराच्या क्रोधदिनी कोणी पळून जाऊन किंवा निभावून राहिला नाही; ज्यांचे मी लालनपालन केले, त्यांचा माझ्या शत्रूने फडशा उडवला आहे.”


मीही टाळी वाजवून आपल्या क्रोधाची पूर्तता करीन; मी परमेश्वर हे म्हणतो.”


ते कंबरेला गोणपाट गुंडाळतील, दरारा त्यांना व्यापील; त्या सर्वांच्या मुखावर लज्जा असेल व सर्वांची डोकी भादरण्यात येतील.


कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील,


Lean sinn:

Sanasan


Sanasan