Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 6:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 परमेश्वर असे म्हणतो की : “पाहा, उत्तर देशाहून एक राष्ट्र येत आहे; पृथ्वीच्या दिगंतापासून एक मोठे राष्ट्र उठत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 परमेश्वर पुढे असे म्हणतो: “उत्तरेकडून लोक येत आहे. पृथ्वीवरच्या अतीदूरच्या ठिकाणाहून मोठे राष्ट्र येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 याहवेह असे म्हणतात: “पाहा, उत्तरेकडील देशातून सैन्य येत आहे; पृथ्वीच्या शेवटापासून एक मोठे राष्ट्र भडकविले जात आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 6:22
18 Iomraidhean Croise  

पण तुम्ही माझ्याकडे वळलात व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चाललात तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यांना एकत्र करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन.’


ऐका! अवई ऐका! पाहा, ती येत आहे, उत्तरदेशातून मोठी गर्दी येत आहे. ती यहूदाची नगरे वैराण, कोल्ह्यांची राहण्याची जागा अशी करून सोडील.


“उत्तरेकडून जे येत आहेत त्यांच्याकडे नजर वर करून पाहा! तुला दिलेला कळप, तुझा रम्य कळप कोठे आहे?


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, राष्ट्राराष्ट्रांतून अरिष्ट फिरत आहे, पृथ्वीच्या अति दूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्भवेल.


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


“परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही म्हणता आम्ही थरकाप झालेल्यांचा शब्द ऐकला आहे, दहशत आहे, शांती नाही.


ती राष्ट्रांना सांगा, पाहा, ती यरुशलेमेस जाहीर करा; “दूर देशातून वेढा घालणारे येत आहेत, यहूदाच्या नगरांसमोर ते ललकारत आहेत.


सीयोनेच्या दिशेकडे ध्वजा उभारा; आश्रयासाठी पळा, थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट, मोठा नाश आणत आहे.


“परमेश्वर म्हणतो, पाहा, उत्तरेकडून पाणी चढत आहे, त्याचा मोठा लोंढा बनत आहे; देश व त्यातील सर्वकाही, नगर व त्यातले रहिवासी ह्या सर्वांना तो तुडवील; लोक आक्रोश करतील, देशातले सर्व रहिवासी हायहाय करतील.


परमेश्वर म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुमच्यावर दुरून एक राष्ट्र आणतो; ते बळकट व प्राचीन राष्ट्र आहे; तुला त्यांची भाषा माहीत नाही, तुला त्यांचे बोलणे समजणार नाही.


त्यांचा भाता उघडी कबर आहे; ते सर्व पराक्रमी वीर आहेत.


बन्यामीनवंशजहो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा, तकोवात रणशिंग फुंका, बेथ-हक्करेमावर ध्वज उभारा; कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे.


मी आपल्या कोपाचा वर्षाव तुझ्यावर करीन, माझ्या कोपाग्नीचा मी तुझ्यावर फुंकर घालीन आणि राक्षसी व नाश करण्यात कुशल अशा मनुष्यांच्या हाती मी तुला देईन.


ह्यामुळे अगे अहलीबे, प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, ज्या तुझ्या जारांवरून तुझे मन उडाले आहे त्यांना मी तुझ्याविरुद्ध उठवीन त्यांना तुझ्यावरून चोहोकडून आणीन;


कारण, पाहा, मी खास्द्यांची उठावणी करतो; ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे; जी स्थले त्यांची नाहीत त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीवर फिरत असतात.


दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणील; त्याची भाषा तुला समजणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan