Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 6:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आणि शांती नसता, शांती, शांती, असे म्हणून त्यांनी माझ्या लोकांची जखम वरवर बरी केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 माझ्या लोकांच्या घावावर ते असा उपचार करतात की जणू ते फारसे गंभीर नाही. ‘शांती, शांती आहे’ असे ते म्हणतात, परंतु शांती कुठेही नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 6:14
21 Iomraidhean Croise  

आणि मी सर्व लोकांना तुझ्याकडे परत आणीन; ज्याच्यामागे तू लागला आहेस त्याचा अंत झाला म्हणजे सर्व लोक तुझ्याकडे फिरलेच म्हणायचे; ह्या प्रकारे सर्व लोक स्वस्थचित्त होतील.”


पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही; जखमा, चेंचरलेले व पुवळलेले घाय आहेत; ते कोणी पिळून काढत नाही, त्यांवर कोणी पट्टी बांधत नाही, कोणी तेलाने नरम करीत नाही.


ते द्रष्ट्यांना म्हणतात, “दृष्टान्त पाहून नका”; संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्हांला यथार्थ गोष्टींचा संदेश सांगू नका, आम्हांला गोडगोड गोष्टी सांगा, कपटवचने सांगा;


ज्या दिवशी परमेश्वर आपल्या लोकांचे घाव बांधील, त्यांच्या प्रहाराच्या जखमा बर्‍या करील, त्या दिवशी चंद्रप्रकाश सूर्यप्रकाशासारखा आणि सूर्यप्रकाश सात दिवसांच्या प्रकाशाएवढा सातपट होईल.


मग मी म्हणालो, “हे प्रभू परमेश्वरा, पाहा, संदेष्टे त्यांना म्हणत आहेत, ‘तुम्ही तलवार पाहणार नाही, तुम्हांला दुष्काळ गाठणार नाही; तर ह्या स्थळी मी तुम्हांला खरी शांती देईन.”’


तू त्यांना हे वचन सांग, ‘माझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रुधारा वाहोत, त्या न थांबोत; कारण माझ्या लोकांची कुंवार कन्या भयंकर जखम लागून अति छिन्नभिन्न झाली आहे.


मला तुच्छ मानणार्‍यांना ते म्हणत राहतात की, ‘परमेश्वर बोलला आहे : तुम्हांला शांती प्राप्त होईल;’ आपल्या अंत:करणाच्या हट्टाप्रमाणे चालणार्‍या सर्वांस ते म्हणतात की, ‘तुमच्यावर काही अरिष्ट येणार नाही.’


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने परमेश्वराच्या मंदिरातली जी पात्रे ह्या स्थलातून घेऊन बाबेलास नेली ती सर्व दोन वर्षांच्या आत मी ह्या स्थळी परत आणीन.


तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, ‘तुमचे कुशल होईल’ असे म्हणून तू ह्या लोकांना व यरुशलेमेस खरोखर फारच चढवले आहेस; इकडे तर तलवार जिवाला जाऊन भिडली आहे.”


ते परमेश्वराला अवमानून म्हणतात, ‘तो नाहीच; आमच्यावर अरिष्ट म्हणून येणार नाही, आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही.


तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टान्त पाहिला; तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही; तर त्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टान्त पाहिले.


ह्याचे कारण हेच की त्यांनी माझ्या लोकांना बहकवले आहे, शांती नसता ‘शांती आहे’ असे त्यांनी म्हटले आहे आणि माझे लोक तट बांधत असता, पाहा, त्याला ते कच्चा चुना लिंपीत आहेत.


ज्या संदेष्ट्यांनी यरुशलेमेविषयी संदेश दिला व शांती नसता शांती आहे असा दृष्टान्त सांगितला ते तुम्ही नष्ट झाला आहात, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


कारण ज्या नीतिमानास मी दुखवले नाही त्याचे मन तुम्ही खोटे बोलून दुखवता, आणि दुष्टाने आपल्या कुमार्गापासून वळू नये, आपला जीव वाचू नये असे तुम्ही त्याच्या हाताला बळ देता;


जर कोणी संदेष्टा भ्रमात पडून संदेश देत असला तर समजावे की मीच त्याला भ्रमात पाडले आहे; मी आपला हात त्याच्यावर उगारीन व माझे लोक जे इस्राएल त्यांतून त्याचा उच्छेद करीन.


वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, “द्राक्षारस व मद्य ह्यांचे मी भाकीत करीन,” तर तो ह्या लोकांचा संदेष्टा होईल.


जे संदेष्टे माझ्या लोकांना बहकवतात, काही चावण्यास मिळाले तर ‘कल्याण असो,’ असे जे म्हणतात व ज्याच्यापासून त्यांना चावण्यास मिळत नाही त्याच्याबरोबर लढण्याची जे तयारी करतात, त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो.


“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.


तर (आपल्या) लोकांतही खोटे संदेष्टे होते तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील; ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील; ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील, आणि आपणांवर आकस्मिक नाश ओढवून घेतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan