Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 52:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग त्यांनी राजाला पकडून हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले; त्याने त्याची शिक्षा ठरवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्यांनी राजाला पकडले व त्यास हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे वर नेले. तेथे त्याने त्यास शिक्षा ठरवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आणि तो पकडला गेला. त्याला बाबिलोनी राजासमोर हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 52:9
15 Iomraidhean Croise  

शलमोनाने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएल लोकांनी त्या वेळी महोत्सव केला, हमाथाच्या घाटापासून मिसर देशाच्या नाल्यापर्यंत सर्व इस्राएल लोकांचा मोठा जमाव एक सप्तक व आणखी एक सप्तक म्हणजे एकंदर चौदा दिवस आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर उत्सव करीत राहिला.


यरुशलेमेत त्याला राज्य करता येऊ नये म्हणून फारो-नखो ह्याने हमाथ देशातले रिब्ला येथे त्याला बेड्या घालून ठेवले आणि त्याच्या देशावर शंभर किक्कार1 चांदी व एक किक्कार सोने एवढी खंडणी बसवली.


ते राजाला पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे घेऊन गेले; त्यांनी त्याची शिक्षा ठरवली.


ह्यास्तव परमेश्वराने त्यांच्यावर अश्शूरच्या राजाचे सेनानायक पाठवले. त्यांनी मनश्शेस आकड्यांनी पकडून व बेड्या घालून बाबेलास नेले.


मग शलमोनाने हमाथ-सोबा नगरावर चाल करून ते हस्तगत केले.


परमेश्वर म्हणतो, मग यहूदाचा राजा सिद्कीया, त्याचे चाकर व त्याच्या प्रजेतले जे कोणी मरी, तलवार व दुष्काळ ह्यांतून वाचून ह्या नगरात राहतील त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, व जे त्यांचा जीव घेण्यास टपत आहेत त्यांच्या हाती देईन; तो त्यांना तलवारीने मारून टाकील; तो त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही.’


खास्द्यांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग करून यरीहोच्या मैदानात सिद्कियाला गाठले; त्यांनी त्याला पकडून हमाथ प्रांतातले रिब्ला येथे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्यापुढे आणले; त्याने त्याची शिक्षा ठरवली.


परमेश्वराचे अभिषिक्त जे आम्ही त्या आमच्या नाकपुड्यांचा श्वास, त्यांच्या गर्तेत अडकला; त्यांच्यासंबंधाने आम्हांला वाटले होते की त्याच्या छायेखाली आम्ही राष्ट्रांमध्ये जीवित कंठू.


तुम्ही तलवारीने पडाल; इस्राएलसीमेवर मी तुमचा न्याय करीन तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


ते शस्त्रे, रथ, चाकांची वाहने, निरनिराळ्या लोकांचा दळभार घेऊन तुझ्यावर येतील; ते कवचे, ढाली व शिरस्त्राणे धारण करून तुला चोहोंकडून घेरतील; मी न्याय करण्याचे काम त्यांना सोपवून देईन, म्हणजे ते आपल्या कायद्यांना अनुसरून न्याय करतील.


मग त्यांनी जाऊन सीन रानापासून हमाथाच्या वाटेवरील रहोबापर्यंत देश हेरला.


व ती शफामापासून अईनाच्या पूर्वेस रिब्ला आहे तेथपर्यंत उतरत उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनार्‍याच्या उतरणीपर्यंत जावी.


आणि गिबल्यांचा देश व हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बाल-गादापासून हमाथाच्या खिंडीपर्यंतचा पूर्वेकडील सर्व लबानोन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan