Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 52:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 रिब्लामध्ये बाबेलाच्या राजाने त्यांना हमाथ देशात रिब्ला येथे मार देऊन ठार केले. अशा तऱ्हेने यहूदा आपल्या देशातून हद्दपार झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 हमाथ देशातील रिब्लाह येथे बाबेलच्या राजाने त्यांचा वध केला. याप्रकारे यहूदीयाचे लोक आपल्या देशापासून दूर बंदिवासात गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 52:27
28 Iomraidhean Croise  

दाविदाने हददेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोई ह्याच्या कानावर गेले.


म्हणून परमेश्वराने इस्राएलाच्या सर्व वंशजांचा त्याग करून त्यांना पिडले, त्यांना लुटणार्‍यांच्या हाती दिले व शेवटी त्यांना आपल्या दृष्टीसमोरून घालवून दिले.


शेवटी परमेश्वराने आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांच्या द्वारे सांगितल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या दृष्टिआड केले. त्यांना स्वदेशातून काढून अश्शूरास नेण्यात आले; तेथेच ते आजवर राहत आहेत.


परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलास जसे आपल्या नजरेपुढून दूर केले तसेच यहूदासही दूर करीन; हे यरुशलेम नगर मी निवडले होते व ह्या मंदिरात माझ्या नावाचा निवास होईल असे मी म्हणालो होतो, त्याचाही मी त्याग करीन.”


पृथ्वी अगदी रिक्त होईल, तिची लूट होईल; कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे.


तटबंदीचे शहर उजाड आहे; ते रानासारखे सोडून दिलेले व टाकलेले वसतिस्थान झाले आहे; तेथे वासरे चरतात, बसतात व तेथल्या फांद्या खाऊन टाकतात.


म्हणून मी पवित्र अधिपतींना अपवित्र ठरवले, याकोबाला शापवश व इस्राएलास निंदावश केले आहे.


दक्षिणेतील नगरे बंद पडली आहेत ती उघडायला कोणी नाही; यहूदाला सर्वस्वी बंदिवान करून नेले आहे, तो पूर्णपणे बंदिवान झाला आहे.


परमेश्वर म्हणतो, पाहा, तू स्वत:ला व तुझ्या सर्व इष्टमित्रांना दहशत होशील, असे मी करीन; ते आपल्या शत्रूंच्या तलवारीने पडतील, हे तुझे डोळे पाहतील; बाबेलच्या राजाच्या हाती मी सर्व यहूदा देईन; तो त्यांना बंदिवान करून बाबेलास नेईल व तलवारीने वधील.


परमेश्वर म्हणतो, मग यहूदाचा राजा सिद्कीया, त्याचे चाकर व त्याच्या प्रजेतले जे कोणी मरी, तलवार व दुष्काळ ह्यांतून वाचून ह्या नगरात राहतील त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, व जे त्यांचा जीव घेण्यास टपत आहेत त्यांच्या हाती देईन; तो त्यांना तलवारीने मारून टाकील; तो त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही.’


तथापि जे लोक लाचार असून ज्यांच्याजवळ काहीएक नव्हते अशांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने यहूदा देशात राहू दिले; त्याच वेळेस त्याने त्यांना द्राक्षांचे मळे व शेते दिली.


तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने नगरात अवशिष्ट राहिलेले लोक आणि जे फितून त्याच्याकडे गेले होते ते आणि जे कोणी लोक शेष राहिले होते ते, अशा सर्वांना कैद करून बाबेलास नेले.


मग त्यांनी राजाला पकडून हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले; त्याने त्याची शिक्षा ठरवली.


मी हा देश ओसाडी व विस्मय ह्यांचा विषय करीन, त्यांच्या सामर्थ्याचा गर्व जिरेल; इस्राएलाचे पर्वत वैराण होतील, कोणी त्या वाटेने जाणार नाही.


हे सीयोनकन्ये, तुला कापरे भरू दे; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे तुला वेदना होऊ दे; कारण तू आता शहराबाहेर जाशील, शेतात वस्ती करशील व बाबेलपर्यंतही जाशील, तेथे तुझी सुटका होईल. तेथे परमेश्वर तुला तुझ्या वैर्‍यांच्या हातून सोडवील.


तुला अथवा तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा एका राष्ट्राकडे परमेश्वर तुला व तू आपल्यावर नेमलेल्या राजाला नेईल, आणि तेथे तू काष्ठपाषाणाच्या अन्य देवांची सेवा करशील;


पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत, सर्व राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुमची पांगापांग करील, आणि तेथे तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना अपरिचित अशा काष्ठपाषाणमय म्हणजे अन्य देवांची सेवा तुम्ही कराल.


तर आज आकाश व पृथ्वी ह्यांना तुमच्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी सांगतो की, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल; तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan