यिर्मया 52:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 योद्ध्यांवर नेमलेल्या एका खोजास त्याने नगरातून पकडून नेले; राजाच्या हुजुरास असणारे सात पुरुष त्याला शहरात आढळले त्यांना त्याने नेले; त्याप्रमाणेच लोकांची सैन्यात भरती करणारा सेनापतींचा चिटणीस आणि नगरात सापडलेल्या लोकांपैकी साठ असामी त्यांनाही त्याने नेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 सैनिकांवर जो अधिकारी नेमला होता त्यास आणि जे सात माणसे राजाला सल्ला देत, ते अजूनपर्यंत नगरातच होते. त्याप्रमाणेच मनुष्यांची सैन्यात भरती करणारा जबाबदार सेनापतीचा चिटणीस, त्यांच्याबरोबर देशातील नगरात असलेले साठ महत्वाची माणसे यांना नगरातून पकडून नेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 जे अजूनही शहरात होते त्यांच्याकडून त्याने योद्ध्यांचा एक अधिकारी आणि सात राजकीय सल्लागार घेतले. लोकांची सैन्यात भरती करण्यासाठी मुख्य अधिकारी असलेल्या सचिवाला आणि शहरात सापडलेल्या साठ माणसांनाही त्याने काढून नेले. Faic an caibideil |