Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 52:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 गारद्यांच्या सरदाराने मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या व तीन द्वारपाळ ह्यांना पकडून नेले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 अंगरक्षकांच्या नायकाने बंदिवान प्रमुख याजक सराया व दुसरा याजक सफन्या यांच्याबरोबर आणि तीन द्वारपालांनाही एकत्रित नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 रक्षक दलाच्या अधिकार्‍याने प्रमुख याजक सेरायाह, दुसरा याजक सफन्याह आणि तीन द्वारपाल यांना बंदिवान म्हणून नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 52:24
19 Iomraidhean Croise  

मग राजाने हिल्कीया मुख्य याजक, दुसर्‍या प्रतीचे याजक आणि द्वारपाळ ह्यांना आज्ञा केली की बआल मूर्ती, अशेरामूर्ती व नक्षत्रगण ह्यांच्यासाठी जी पात्रे केली आहेत ती सर्व परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढा. त्याने ती सर्व पात्रे यरुशलेमेच्या बाहेर किद्रोनच्या मैदानात जाळून त्यांची राख बेथेल येथे पाठवली.


गारद्यांच्या सरदाराने मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या व तीन द्वारपाळ ह्यांना पकडून नेले.


अजर्‍यास सराया झाला, सरायास यहोसादाक झाला.


ह्यानंतर पारसाचा राजा अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीत एज्रा बिन सराया बिन अजर्‍या बिन हिल्कीया


खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे2 मला इष्ट वाटते.


परमेश्वर म्हणतो, पाहा, तू स्वत:ला व तुझ्या सर्व इष्टमित्रांना दहशत होशील, असे मी करीन; ते आपल्या शत्रूंच्या तलवारीने पडतील, हे तुझे डोळे पाहतील; बाबेलच्या राजाच्या हाती मी सर्व यहूदा देईन; तो त्यांना बंदिवान करून बाबेलास नेईल व तलवारीने वधील.


सिद्कीया राजाने मल्कीयाचा पुत्र पशहूर व मासेचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मयाकडे पाठवून सांगितले,


“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तू आपल्याच नावाने यरुशलेमेत असलेल्या सर्व लोकांना, मासेयाचा पुत्र सफन्या याजक ह्याला व सर्व याजकांना पत्रे पाठवून कळवले की,


हे पत्र सफन्या याजकाने यिर्मया संदेष्ट्याला वाचून दाखवले.


आणि यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार ह्यांना मी त्यांच्या वैर्‍यांच्या हाती देईन, त्यांच्या जिवांवर टपणार्‍यांच्या हाती देईन व बाबेलच्या राजाचे जे सैन्य तुमच्यापुढून निघून गेले आहे त्याच्या हाती देईन.


आणि मी त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणले; द्वारपाळ मासेया बिन शल्लूम ह्याच्या कोठडीच्या वर असलेल्या सरदारांच्या कोठडीच्या बाजूला देवाचा भक्त हानान बिन इग्दल्या ह्याच्या पुत्रांची कोठडी होती तिच्यात त्यांना नेले.


तेव्हा सिद्कीया राजाने शलेम्याचा पुत्र यहूकल व मासेयाचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मया संदेष्ट्याकडे सांगून पाठवले की, “आमच्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे प्रार्थना कर.”


पाचव्या महिन्याच्या दशमीस बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी बाबेलच्या राजाच्या तैनातीस असणारा गारद्यांचा नायक नबूजरदान यरुशलेमेस आला.


मग गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने देशातले अगदी कंगाल लोक, नगरात उरलेले अवशिष्ट लोक, फितूर होऊन बाबेलच्या राजाच्या पक्षास मिळालेले लोक व अवशिष्ट राहिलेले कारागीर ह्या सर्वांना बंदिवान करून नेले.


परमेश्वराच्या मुखाने त्यांना विखरले आहे; तो आता त्यांच्याकडे पाहत नाही; ते याजकाचा मान राखत नाहीत, वडिलांचा सन्मान करीत नाहीत.


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, तुम्ही ह्या नगरात ज्यांना वधून टाकले, ते मांस आहेत, व हे नगर कढई आहे; तुम्हांला तर त्यातून बाहेर नेतील.


कळपातून एक चांगले मेंढरू निवडून घे; हाडे शिजवण्यासाठी खाली लाकडांची रास कर; ते चांगले शिजू दे; त्यातील हाडेही चांगली शिजू दे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे, त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन; माझा कळप चारण्याची त्यांना मी बंदी करीन; त्यांना स्वतः चरायला मिळणार नाही; मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन म्हणजे ह्यापुढे ती त्यांना भक्षण करण्यास सापडणार नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan