Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 52:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 पात्रे, फावडी, चिमटे, वाटगे धूपदाने आणि सेवेची सर्व पितळेची उपकरणे त्यांनी नेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 पात्रे, फावडी, दिव्याची कात्री, वाट्या, आणि मंदिरातील सेवा ज्या पितळी उपकरणाने याजक करीत ती सर्व खास्द्यांनी नेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्यांनी भांडी, फावडे, चिमटे, शिंपडण्याची भांडी आणि मंदिरात उपासनेसाठी वापरण्यात येणारी कास्याची सर्व भांडी सोबत नेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 52:18
27 Iomraidhean Croise  

तसेच हीरामाने गंगाळे, फावडी व कटोरी ही बनवली. ह्या प्रकारे हीरामाने शलमोन राजासाठी परमेश्वराच्या मंदिराचे जे काम करायचे होते ते संपवले ते असे :


तशीच पात्रे, फावडी व कटोरे ही बनवली होती; परमेश्वराच्या मंदिरातील ही जी पात्रे हीरामाने शलमोन राजासाठी बनवली होती ती सर्व उजळ पितळेची होती.


पेले, कातरी, कटोरे, चमचे व धुपाटणी ही शुद्ध सोन्याची करवली होती; तसेच मंदिराचा अंतर्भाग म्हणजे परमपवित्रस्थान ह्याच्या दारांची व मंदिराच्या म्हणजे पवित्रस्थानाच्या दारांची बिजागरे सोन्याची करवली होती.


शुद्ध सोन्याचे काटे, कटोरे व प्याले व सोन्याच्या प्रत्येक सुरईसाठी सोने, त्याप्रमाणेच चांदीच्या प्रत्येक सुरईसाठी चांदी तोलून दिली.


हूरामाने हंडे, फावडी व कटोरे केले. ह्या प्रकारे हूरामाने शलमोन राजासाठी देवमंदिराचे जे काम करायचे होते ते संपवले.


हंडे, फावडी, काटे, इत्यादी सर्व सामान हूरामाने शलमोन राजासाठी परमेश्वराच्या मंदिराकरिता उजळ पितळेचे केले.


त्याप्रमाणेच शुद्ध सोन्याच्या कातरी, कटोरे, चमचे व धुपाटणीही बनवली; मग प्रवेशासाठी परमपवित्र-स्थानाच्या आतील कवाडे आणि मंदिराची कवाडे ही सोन्याची बनवली.


तशीच त्याने दहा मेजे करून उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी मंदिरात ठेवली. त्याने सोन्याचे शंभर कटोरे केले.


सोन्याचे तीस कटोरे, चांदीचे दुसर्‍या प्रकारचे चारशे दहा कटोरे व इतर पात्रे एक हजार.


त्यावरची तबके, धूपपात्रे, सुरया आणि पेयार्पणे ओतण्याकरता वाट्या बनव; ही शुद्ध सोन्याची बनवावीत.


त्याचे चिमटे आणि त्याच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत.


तिच्यातील राख उचलून नेण्यासाठी हंड्या, त्याप्रमाणेच तिच्यासाठी फावडी, कटोरे, काटे आणि अग्निपात्रे बनवावीत, तिची सर्व उपकरणे पितळेची असावीत.


आणि त्याने मेजावरली पात्रे म्हणजे तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्याकरता कटोरे ही सर्व शुद्ध सोन्याची बनवली.


त्याने त्या दीपवृक्षाचे सात दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या.


आणि त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनवली.


आणि वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्निपात्रे, काटे, फावडी, कटोरे आदिकरून वेदीचे सर्व सामान तिच्यावर ठेवावे, त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि तिचे दांडे बसवावेत.


समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरून त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे प्याले ठेवावेत; निरंतरची भाकरही त्यावर ठेवावी;


धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;


धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;


धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;


धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;


धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;


धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;


Lean sinn:

Sanasan


Sanasan