Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 52:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने देशातले अगदी कंगाल लोक, नगरात उरलेले अवशिष्ट लोक, फितूर होऊन बाबेलच्या राजाच्या पक्षास मिळालेले लोक व अवशिष्ट राहिलेले कारागीर ह्या सर्वांना बंदिवान करून नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 सेनापती नबूजरदानाने यरूशलेम नगरामध्ये अजूनही राहत असलेल्या सर्व लोकांस कैदी म्हणून नेले. बाबेलाच्या राजाला आधीच शरण आलेल्यांनाही तो घेऊन गेला. यरूशलेममध्ये मागे राहिलेले कुशल कारागीरही त्याने बरोबर नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 नंतर रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने काही अगदी गरीब लोक, शहराच्या विध्वंसातून वाचलेले लोक, आणि जे बाबेलच्या राजाला शरण गेले होते त्यांना व बाकीचे कारागीर यांना बंदिवासात नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 52:15
7 Iomraidhean Croise  

शहरात राहिलेले अवशिष्ट लोक, बाबेलच्या राजाकडे फितून गेलेले लोक आणि उरलेले साधारण लोक ह्यांना गारद्यांचा नायक नबुजरदान ह्याने कैद करून नेले.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी पाचव्या महिन्याच्या सप्तमीस नबुजरदान यरुशलेमेला आला; हा बाबेलच्या राजाचा सेवक असून गारद्यांचा नायक होता.


तसेच यहूदाचा राजा योशीयापुत्र यहोयाकीम ह्याच्या काळापासून यहूदाचा राजा योशीयापुत्र सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे पाचव्या महिन्यात यरुशलेमकरांना बंदिवान करून नेले तेथवर ते वचन आले.


तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने नगरात अवशिष्ट राहिलेले लोक आणि जे फितून त्याच्याकडे गेले होते ते आणि जे कोणी लोक शेष राहिले होते ते, अशा सर्वांना कैद करून बाबेलास नेले.


असे म्हण की, ‘मी तुम्हांला चिन्हवत आहे; मी त्यांना करून दाखवले तसेच त्यांना घडेल; ते हद्दपार होतील, बंदिवासात जातील.”’


यरुशलेमेबरोबर लढण्यास चढाई करून यावे म्हणून मी सर्व राष्ट्रांना जमा करीन. ते नगर हस्तगत करतील, घरे लुटतील, स्त्रियांना भ्रष्ट करतील; अर्धे नगर बंदिवासात जाईल, तरी अवशिष्ट लोक नगरातून नाहीतसे होणार नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan