Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 बाबेल एकाएकी पडून भंगला आहे; त्याबद्दल हायहाय करा; त्याच्या जखमेसाठी मलम घेऊन जा, त्याला गुण येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 बाबेल अकस्मात पडेल आणि नाश होईल. त्याची शकले पडतील. तिच्यासाठी शोक करा. तिच्या वेदनेसाठी तिला औषध द्या. कदाचित् ती बरी होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 बाबिलोनचे अचानक पतन होईल व ती मोडली जाईल. तिच्यासाठी विलाप करा! तिच्या वेदना जाण्यासाठी औषध आणा; कदाचित ती बरी होऊ शकेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:8
20 Iomraidhean Croise  

तर पाहा, पायदळ, जोडीजोडीने चालणारे घोडेस्वार येत आहेत; ते उच्च स्वराने म्हणतात, बाबेल पडला हो पडला; त्याच्या देवांच्या सर्व मूर्ती जमिनीवर आपटून फोडल्या.”


ह्यामुळे मंत्रतंत्रांनी निवारता येणार नाही अशी विपत्ती तुझ्यावर येईल; खंडणी देऊन टाळता येणार नाही असे अरिष्ट तुझ्यावर येईल; तुझ्या ध्यानीमनी नाही असा नाश तुला एकाएकी गाठील.


अपत्यहीनता व वैधव्य ही दोन्ही एकाच दिवशी, एकाच क्षणी तुला प्राप्त होतील; तुझे बहुविध मंत्रतंत्र व तुझी विपुल चेटके ह्यांना न जुमानता ती तुझ्यावर पूर्णपणे गुदरतील.


हे कुमारिके, मिसरकन्ये, चढून गिलादास जा, तेथे मलम घे! तू औषधोपचारांची व्यर्थ गर्दी केली आहेस; तुझ्या घावाला मलमपट्टी नाही.


मवाब फजीत झाला; हायहाय करा, रडा; मवाब ओसाड झाला आहे, हे आर्णोनात सांगा.


ह्यामुळे मी मवाबाविषयी हायहाय करीन; अवघ्या मवाबासाठी आक्रंदन करीन; कीर-हरेसच्या लोकांसाठी शोक करतील.


“राष्ट्रांमध्ये हे विदित करा व प्रसिद्ध करा, ध्वज उभारा; प्रसिद्ध करा, लपवून ठेवू नका आणि म्हणा : ‘बाबेल घेतला आहे, बेल फजीत झाला आहे, मरोदख भग्न झाला आहे; त्याच्या मूर्तींची फजिती झाली आहे, त्याचे पुतळे भग्न झाले आहेत.’


शेशख1 कसे हस्तगत झाले आहे! सर्व जगाच्या प्रशंसेचा विषय परहाती कसा गेला आहे! राष्ट्रांना बाबेल कसा विस्मयावह झाला आहे!


गिलादात मलम नाही काय? तेथे कोणी वैद्य नाही काय? माझ्या लोकांच्या कन्येचे घाय का बरे झाले नाहीत?


“मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, जळो तो दिवस, असा हाहाकार करा.


म्हणून त्याने ती हाताची बोटे पाठवली व हा लेख लिहिला.


आणि दारयावेश मेदी हा सुमारे बासष्ट वर्षांचा असता राजपदारूढ झाला.


तुझी जखम भरत नाही; तुझा घाय असाध्य आहे; तुझी बातमी ऐकणारे सर्व तुझ्याविषयी टाळ्या पिटतात; कारण ज्याला तुझी दुष्टता सतत जाचली नाही असा कोण आहे?


त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली, तिने आपल्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे.”’


तो जोरदार वाणीने म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली;’ ती ‘भुतांची वस्ती’ व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan