यिर्मया 51:58 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)58 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, बाबेलचे रुंद तट समूळ पाडतील, त्याच्या उंच वेशी अग्नीने भस्म होतील; अशी राष्ट्रांच्या श्रमाची फलप्राप्ती शून्यवत होईल, राष्ट्रांचे श्रमफळ हे अग्नीला भक्ष्य होईल, ते व्यर्थ शिणतील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी58 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “बाबेलाची जाड तटबंदी जमीनदोस्त केली जाईल, आणि तिची उंच प्रवेशद्वारे जाळली जातील. मग तिच्या मदतीला येणाऱ्या लोकांची मेहनत निरुपयोगी होईल. जी प्रत्येकगोष्ट राष्ट्र तिच्यासाठी करण्याचा प्रयत्न करेल ती जाळण्यात येईल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती58 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “बाबेलची दुर्गम तटबंदी भुईसपाट होईल आणि तिच्या उंच वेशी अग्नीने भस्म करण्यात येतील; लोकांचे कष्ट व्यर्थ ठरतील, देशाने केलेले श्रम अग्नीचे जळण होईल.” Faic an caibideil |