Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:56 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

56 कारण त्याच्यावर म्हणजे बाबेलवर विध्वंस करणारे आले आहेत, त्याचे वीर कैद झाले आहेत; त्यांची धनुष्ये भंग पावली आहेत; कारण परमेश्वर सूड घेणारा देव आहे, तो खातरीने प्रतिफळ देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

56 कारण तिच्यावर, म्हणजे बाबेलाविरूद्ध नाश करणारा आला आहे, आणि तिचे योद्धे पकडले गेले आहेत. त्यांचे धनुष्ये मोडली आहेत, कारण परमेश्वर सूड घेणारा देव आहे. तो खचित प्रतिफल भरून देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

56 बाबेलांच्या विरुद्ध विनाशक येईल; तिचे योद्धे बंदी बनविले जातील, आणि त्यांचे धनुष्य मोडून टाकण्यात येतील. कारण याहवेह परतफेड करणारे परमेश्वर आहेत; ते पुरेपूर परतफेड करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:56
32 Iomraidhean Croise  

तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले; याकोबाचा समर्थ देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक ह्याच्या नावाने त्याचे भुज स्फुरण पावले.


हे बाबेलच्या कन्ये, तू ओसाड पडणार आहेस; तू आमच्याशी केलेल्या वर्तनांबद्दल जो तुझे पारिपत्य करील तो धन्य!


त्यांची तलवार त्यांच्याच उरात शिरेल, आणि त्यांच्या धनुष्यांचा चुराडा होईल.


तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो; तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो; रथ अग्नीत जाळून टाकतो.


तेथे धनुष्याचे बाण, ढाल, तरवार व युद्धसामग्री त्याने मोडून टाकली. (सेला)


मला कष्टप्रद दृष्टान्त झाला आहे; लुटारू लुटत आहे, ठक ठकबाजी करीत आहे. हे एलामा, चढाई कर; हे मादया, वेढा घाल; त्याच्यामुळे लोक टाकत असलेले सर्व उसासे मी थांबवतो.


सीयोनेला न्याय मिळावा म्हणून सूड घेण्याचा हा परमेश्वराचा दिवस, प्रतिफळ देण्याचे हे वर्ष होय.


घाबर्‍या मनाच्यांस म्हणा, “धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घेण्यास, अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल;” तो येईल व तुमचा उद्धार करील.


ज्याच्या-त्याच्या कर्माप्रमाणे तो प्रतिफळ देईल, म्हणजे आपल्या शत्रूंना संताप आणील, आपल्या वैर्‍यांना शासन करील, द्वीपांचे उसने फेडील.


“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, त्यांच्या बलाचा मुख्य आधार जे एलामाचे धनुष्य ते मी मोडून टाकीन.


ते खास्द्यांचा देश लुटतील; त्याला लुटणारे सर्व तृप्त होतील असे परमेश्वर म्हणतो.


वाचाळांवर तलवार उपसली आहे; ते वेडे बनतील, त्याच्या वीरांवर तलवार उपसली आहे; ते फजीत होतील.


बाबेल व खास्दी देशाचे सर्व रहिवासी ह्यांनी तुमच्यादेखत जो सर्व अनर्थ सीयोनेत केला आहे त्यांचे मी उसने फेडीन, असे परमेश्वर म्हणतो.


बाबेलचे वीर लढाई करायचे थांबले आहेत, ते आपल्या दुर्गात बसून राहिले आहेत; त्यांचे बल खुंटले आहे. ते केवळ स्त्रिया बनले आहेत; त्याच्या वस्तीस आग लावली आहे; त्याचे अडसर मोडले आहेत.


आकाश व पृथ्वी आणि त्यांतील सर्वकाही बाबेलवर जयजयकार करतील; कारण त्याचा विध्वंस करणारे उत्तरेकडून येत आहेत असे परमेश्वर म्हणतो.


बाबेल गगनापर्यंत उन्नत झाला असला, त्याने आपल्या उंच गढ्या अजिंक्य केल्या असल्या तरी माझ्याकडून त्याचा नाश करणारे येतील, असे परमेश्वर म्हणतो.


बाबेलातून पळून जा, तुम्ही आपापले जीव वाचवा; त्याच्या दुष्कर्मामुळे तुम्ही आपला नाश करून घेऊ नका; कारण हा परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे; त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे.


हे परमेश्वरा, त्यांच्या हातच्या कर्माप्रमाणे तू त्यांना प्रतिफळ देशील.


मी तुझ्या डाव्या हातातले धनुष्य उडवून देईन; तुझ्या उजव्या हातातले बाण खाली पाडीन.


तेव्हा इस्राएलच्या नगरांतले रहिवासी बाहेर निघून ढाली व कवचे, धनुष्ये व बाण, गदा व भाले इत्यादी शस्त्रांना आग लावून जाळतील; त्यांचे त्यांना सात वर्षे सरपण होईल;


धनुर्धार्‍याला उभे राहता येणार नाही; चपळ पायांच्या इसमाला आपला बचाव करता येणार नाही; घोडेस्वाराला आपला जीव वाचवता येणार नाही.


कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्रांना समीप येऊन ठेपला आहे; तू केलेस तसे तुला करतील; तुझी करणी तुझ्याच डोक्यावर उलटेल.


तू पुष्कळ राष्ट्रांना लुटले म्हणून सर्व अवशिष्ट लोक तुला लुटतील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम, ह्यामुळे असे होईल.


सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे; त्यांचे पाय घसरतील तेव्हा हे घडेल; कारण त्यांचा संकटकाळ जवळ आला आहे, त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकर येत आहेत.’


तुमच्यावर संकट आणणार्‍या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणार्‍या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे,


जी दहा शिंगे व जे श्वापद तू पाहिलेस ते कलावंतिणीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.


‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी ‘आनंद करा;’ कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे.”’


कारण ‘त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे’ व ‘नीतीचे’ आहेत; ज्या मोठ्या कलावंतिणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे, आणि आपल्या ‘दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.”’


शूर वीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत; जे लटपटत होते त्यांच्या कंबरेस बलरूप कमरबंद चढवला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan