Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:51 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 ‘निंदा आमच्या कानी पडली म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत; परमेश्वराच्या मंदिरातल्या पवित्रस्थानात परके आले आहेत; म्हणून लज्जेने आमची मुखे व्याप्त झाली आहेत.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 “आम्ही अपमान ऐकला आहे, म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत. लाजेने आमची तोंडे झाकली आहेत, कारण परमेश्वराच्या घरातील पवित्र स्थानात परक्यांनी प्रवेश केला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 “आमची अप्रतिष्ठा झाली आहे, आमचा अपमान झाला आहे लज्जेने आमची मुखमंडले झाकली गेली आहेत, कारण परकीय लोकांनी याहवेहच्या भवनातील पवित्रस्थानी प्रवेश केला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:51
37 Iomraidhean Croise  

माझे विरोधी अपमानाने व्याप्त होतील. झग्याप्रमाणे ते लज्जा पांघरतील.


माझ्या जिवाला अपाय करणारे लज्जित होऊन नष्ट होवोत; माझे अनिष्ट करू पाहणारे निंदेने व अप्रतिष्ठेने व्याप्त होवोत.


हे देवा, तुझ्या वतनात परराष्ट्रे शिरली आहेत; त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे; त्यांनी यरुशलेमेचे ढिगारे केले आहेत.


हे प्रभू, आमच्या शेजार्‍यांनी केलेली तुझी निंदा उलट त्यांच्या पदरी सातपटीने घाल.


आम्ही आमच्या शेजार्‍यांना निंदास्पद आणि आमच्या सभोवतालच्या लोकांना तुच्छ व हास्यास्पद झालो आहोत.


हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्वकाळ लपून राहणार काय? तुझा संताप अग्नीसारखा कोठवर भडकत राहणार?


बाबेलविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला दृष्टान्तात प्राप्त झालेली देववाणी :


कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.


समुद्रालगतच्या रानाविषयीची देव वाणी : दक्षिणेकडून जशा वावटळी झपाट्याने येतात, तसे रानातून, भयानक देशातून अरिष्ट येते.


अगे बाबेलच्या कुमारिके, खाली उतरून धुळीत बस; खास्द्यांच्या कन्ये, सिंहासन सोडून भूमीवर बस, कारण तुला ह्यापुढे नाजूक व सुकुमार म्हणणार नाहीत.


त्यांच्यातले श्रेष्ठ जन आपल्या कनिष्ठांना पाण्यासाठी पाठवतात; ते विहिरीवर जातात पण त्यांना पाणी मिळत नाही, ते रिकाम्या घागरी घेऊन येतात; ते लज्जित व फजीत होऊन आपली डोकी झाकून घेतात.


परस्परांपासून दूर व जवळ असलेले उत्तरेकडचे सर्व राजे व ह्या भूतलावर असलेली पृथ्वीवरची सर्व राज्ये, ह्यांना तो पेला पाजला. ह्यांच्यामागून शेशखचा1 राजाही तो पिईल.


मी वळल्यावर पश्‍चात्ताप केला; मला बोधप्राप्ती घडल्यावर मी ऊर1 बडवू लागलो; माझ्या तारुण्यातील अपकीर्तीच्या भारामुळे मी लज्जित व फजीत झालो आहे.’


त्याने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली.


वैर्‍याने तिच्या सर्व रम्य वस्तूंवर आपला हात फिरवला आहे. विदेशी तिच्या पवित्रस्थानात आले हे तिने पाहिले आहे; त्यांनी तुझ्या समाजात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस.


हे परमेश्वरा, पाहा, हे तू कोणाला केले ह्याचा विचार कर! स्त्रियांनी आपल्या पोटचे फळ, हातावर खेळवलेली आपली बालके खावीत काय? याजक व संदेष्टा ह्यांना प्रभूच्या पवित्रस्थानात जिवे मारावे काय?


हे परमेश्वरा, आमच्यावर काय गुजरले ह्याचे स्मरण कर; आमच्या अप्रतिष्ठेकडे पाहा.


‘इस्राएलाच्या घराण्यास असे सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो : पाहा, तुमच्या बळाचा आधार, तुमच्या नेत्रांना प्रिय, तुमच्या जिवाचा जिव्हाळा, असे जे माझे पवित्रस्थान ते मी भ्रष्ट करीन आणि तुम्ही मागे ठेवलेले तुमचे कन्यापुत्र तलवारीने पडतील.


वृक्षांची फळे व शेतांचा उपज ह्यांची वृद्धी मी करीन, म्हणजे राष्ट्रांमध्ये तुम्हांला ह्यापुढे दुष्काळामुळे होणारी विटंबना भोगावी लागणार नाही.


ते कंबरेला गोणपाट गुंडाळतील, दरारा त्यांना व्यापील; त्या सर्वांच्या मुखावर लज्जा असेल व सर्वांची डोकी भादरण्यात येतील.


त्याने त्यांना म्हटले, “मंदिर भ्रष्ट करा; अंगणे वधलेल्यांनी भरून टाका; चला, निघा.” तेव्हा त्यांनी जाऊन नगरात संहार चालवला.


त्याच्या पक्षाचे सैनिक उठावणी करतील; ते पवित्रस्थान, तो दुर्ग, ते भ्रष्ट करतील, नित्याचे बलिहवन ते बंद करतील आणि विध्वंसमूलक अमंगलाची ते स्थापना करतील.


इसहाकाची उच्च स्थाने ओसाड होतील, इस्राएलाच्या पवित्र स्थानांची नासधूस होईल, आणि मी तलवार घेऊन यराबामाच्या घराण्यावर उठेन.”


अम्रीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, व त्यांच्या तत्त्वांप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल, त्याच्या रहिवाशांची निर्भर्त्सना होईल असे मी करीन; माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हांला सोसावी लागेल.”


जी मला म्हणाली होती की, “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” ती माझी वैरीण ते पाहील व ती लज्जेने व्याप्त होईल; माझे डोळे तिला पाहतील, तिला रस्त्यांतल्या चिखलासारखे तुडवतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan