Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:50 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

50 जे तुम्ही तलवारीपासून निभावला आहात ते तुम्ही निघून जा, थांबू नका! दुरून परमेश्वराचे स्मरण करा, यरुशलेम आपल्या मनात वागवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 जे तुम्ही तलवारीपासून वाचले आहात, दूर जा! थांबू नका. दुरून परमेश्वराचे स्मरण करा. यरूशलेमे तुमच्या मनात येवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

50 जे तुम्ही तलवारीपासून वाचला आहात, ते तुम्ही निघून जा, उगाच रेंगाळू नका! दूरवरील भूमीवर याहवेहचे स्मरण करा, आणि यरुशलेम तुमच्या स्मरणात येवो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:50
24 Iomraidhean Croise  

यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. “तुझ्यावर प्रीती करणार्‍यांचे कल्याण असो.


तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.”


परमेश्वराने उद्धरलेले जन परततील व जयजयकार करत सीयोनेस येतील; त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील; त्यांना आनंद व उल्लास प्राप्त होईल; दुःख व उसासे पळ काढतील.


अंगाची धूळ झाड; हे यरुशलेमे, उठून बस; सीयोनेच्या बंदिवान कन्ये, आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक.


वाटेवर आपल्यासाठी खुणा कर; खुणेचे खांब उभे कर; ज्या मार्गाने तू गेलीस त्या सडकेवर आपले चित्त ठेव; हे इस्राएलाच्या कुमारी, परत ये, तुझ्या ह्या नगरास परत ये.


तलवारीपासून निभावलेले असे अगदी थोडे लोक मिसर देशातून यहूदा देशात परत जातील; आणि जे यहूदाचे सर्व अवशिष्ट लोक मिसर देशात काही दिवस राहण्यास गेले आहेत त्यांना, माझा शब्द खरा ठरतो की त्यांचा खरा ठरतो, हे कळून येईल.


बाबेलातून पळून जा, खास्द्यांच्या देशातून निघून जा; कळपाच्या पुढे चालणार्‍या एडक्यांसारखे व्हा.


माझ्या लोकांनो, तुम्ही त्यांच्यातून निघून जा! परमेश्वराच्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा.


बाबेलातून पळून जा, तुम्ही आपापले जीव वाचवा; त्याच्या दुष्कर्मामुळे तुम्ही आपला नाश करून घेऊ नका; कारण हा परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे; त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे.


तुमच्यापैकी निभावलेले ज्या राष्ट्रांत पकडून नेले जातील त्यांत ते माझे स्मरण करतील; तेव्हा माझ्यापासून दूर झालेले त्यांचे दुराचारी हृदय आणि त्यांनी मूर्तीकडे लावलेले त्यांचे दुराचारी नेत्र मी वठणीस आणीन; त्यांनी आपल्या सर्व अमंगळ कृत्यांनी जे दुष्कर्म केले, त्यामुळे ते आपणांस निंद्य मानतील.


त्या वेळी ती माणसे जमावाने आली तेव्हा दानीएल आपल्या देवाची प्रार्थना व विनंती करत आहे असे त्यांना आढळून आले.


मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘माझ्या लोकांनो,’ तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हांला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून ‘तिच्यामधून निघा.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan