Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:48 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

48 आकाश व पृथ्वी आणि त्यांतील सर्वकाही बाबेलवर जयजयकार करतील; कारण त्याचा विध्वंस करणारे उत्तरेकडून येत आहेत असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 मग आकाश व पृथ्वी आणि त्यामध्ये जे काही आहे ते सर्व बाबेलावर आनंद करतील. कारण तिचा नाश करणारा उत्तरेकडून येईल.” परमेश्वर असे म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

48 मग स्वर्गात व पृथ्वीवर व त्यामध्ये असलेले सर्व बाबेलवरील विजयोत्सवाच्या आनंदाने गर्जना करतील, कारण उत्तरेकडून विनाशक तिच्यावर हल्ला करतील.” असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:48
15 Iomraidhean Croise  

नीतिमानांचे कुशल असते तेव्हा नगर उल्लास पावते, दुर्जन नाश पावतात तेव्हा उत्साह होतो,


हे आकाशा, जयघोष कर, कारण परमेश्वराने हे केले आहे; अहो पृथ्वीच्या अधोभागांनो, हर्षनाद करा; अहो पर्वतांनो, हे वना, त्यातील प्रत्येक वृक्षा, तुम्ही जयजयकार करा; कारण परमेश्वराने याकोबाला उद्धरले आहे; तो इस्राएलाच्या ठायी आपला प्रताप प्रकट करतो.


तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.”


हे आकाशा जयजयकार कर; हे पृथ्वी, आनंद कर; अहो पर्वतांनो, जयघोष करा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, आपल्या पिडलेल्या लोकांवर दया केली आहे.


कारण त्याच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र चढाई करून आले आहे; ते त्याचा देश ओसाड करील, त्यात एकही रहिवासी उरणार नाही; मनुष्यापासून पशूपर्यंत सर्व पळाले आहेत, निघून गेले आहेत.


पाहा, उत्तरेकडून एक राष्ट्र, मोठे राष्ट्र येत आहे; पृथ्वीच्या दिगंतापासून बहुत राजे उठत आहेत.


कारण पाहा, मी उत्तर देशाहून मोठ्या राष्ट्रांचा जमाव उठवून बाबेलवर आणीन; ते त्याच्याविरुद्ध सज्ज होतील; त्याच दिशेकडून तो हस्तगत होईल; रिकामा परत येत नाही अशा चतुर वीराच्या बाणांप्रमाणे त्यांचे बाण आहेत.


कारण त्याच्यावर म्हणजे बाबेलवर विध्वंस करणारे आले आहेत, त्याचे वीर कैद झाले आहेत; त्यांची धनुष्ये भंग पावली आहेत; कारण परमेश्वर सूड घेणारा देव आहे, तो खातरीने प्रतिफळ देईल.


म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, सर्व पृथ्वी आनंद करीत असता मी तुला उजाड करीन.


‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी ‘आनंद करा;’ कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan