Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 ह्यास्तव पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी बाबेलच्या कोरीव मूर्तींचा समाचार घेईन; त्याचा सर्व प्रदेश लज्जित होईल, त्याचे सर्व लोक त्याच्यात ठार होऊन पडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 यास्तव, पाहा, दिवस येत आहेत की, जेव्हा मी बाबेलाच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करील. तेव्हा तिचा संपूर्ण देश लज्जित होईल, आणि तिचे सर्व वधलेले तिच्यामध्ये पडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 असा समय निश्चित येईल जेव्हा मी बाबेलच्या मूर्तींना शिक्षा करेन; तिच्या संपूर्ण देशाची अप्रतिष्ठा होईल वध केलेल्यांचे शव तिच्या भूमीवर पडलेले दिसतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:47
13 Iomraidhean Croise  

तर पाहा, पायदळ, जोडीजोडीने चालणारे घोडेस्वार येत आहेत; ते उच्च स्वराने म्हणतात, बाबेल पडला हो पडला; त्याच्या देवांच्या सर्व मूर्ती जमिनीवर आपटून फोडल्या.”


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, त्यांना मी शिक्षा करीन; त्यांचे तरुण तलवारीने मरतील, त्यांचे पुत्र व कन्या दुष्काळाने फस्त होतील.


ज्यांचा स्नेह संपादन करण्याचा प्रयत्न तू केला त्यांना त्याने तुझ्या शिरावर ठेवले तर तू काय म्हणशील? प्रसववेदना लागलेल्या स्त्रीप्रमाणे तुला क्लेश होणार नाहीत काय?


कोणी संदेष्टा, याजक किंवा लोकांतला कोणी, ‘परमेश्वराचे भारी वचन’, हे शब्द उच्चारील तर मी त्या माणसाला व त्याच्या घराण्याला शिक्षा करीन.


तथापि सत्तर वर्षे भरल्यावर असे होईल की बाबेलचा राजा, तेथील लोक व खास्द्यांचा देश ह्यांना त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी देईन व तो देश कायमचा ओसाड करीन, असे परमेश्वर म्हणतो.


“राष्ट्रांमध्ये हे विदित करा व प्रसिद्ध करा, ध्वज उभारा; प्रसिद्ध करा, लपवून ठेवू नका आणि म्हणा : ‘बाबेल घेतला आहे, बेल फजीत झाला आहे, मरोदख भग्न झाला आहे; त्याच्या मूर्तींची फजिती झाली आहे, त्याचे पुतळे भग्न झाले आहेत.’


त्या शून्यरूप असून, उपहासाला पात्र अशा वस्तू होत; त्यांचा समाचार घेतेवेळी त्या नष्ट होतात.


बाबेल व खास्दी देशाचे सर्व रहिवासी ह्यांनी तुमच्यादेखत जो सर्व अनर्थ सीयोनेत केला आहे त्यांचे मी उसने फेडीन, असे परमेश्वर म्हणतो.


त्याची नगरे ओस पडली आहेत. त्यांतला प्रदेश निर्जल झाला आहे, तेथली भूमी रुक्ष झाली आहे, तेथे मनुष्यवस्ती नाही, व त्यातून कोणी मानवपुत्र येत-जात नाहीत.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी तिच्या कोरीव मूर्तीचा समाचार घेईन, तिच्या सर्व देशभर घायाळ झालेले कण्हत पडतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan