Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 देशात ऐकलेल्या अफवेने तुम्ही आपले मन खचू देऊन घाबरू नका; एक अफवा एका वर्षी व दुसरी दुसर्‍या वर्षी पसरेल; देशात जुलूम होईल, अधिपती अधिपतीवर उठेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 देशातील जे वर्तमान ऐकण्यात येईल त्यांने भिऊ नका अथवा आपले हृदय खचू देऊ नका. कारण एका वर्षात वर्तमान येईल. यानंतर पुढच्या वर्षात वर्तमान येईल, आणि देशात हिंसाचार होईल. राज्यकर्ते राज्यकर्त्याविरूद्ध होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 जेव्हा तुम्हाला देशात अफवा ऐकिवात येतील तेव्हा तुमचे अंतःकरण खचू देऊ नका किंवा भयभीत होऊ नका; देशात आणि एका राजाने दुसऱ्या राजाविरुद्ध केलेल्या हिंसाचारांच्या अफवा ऐकू येतील, एक अफवा या वर्षी येते तर दुसरी पुढील वर्षी येते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:46
16 Iomraidhean Croise  

पाहा, मी त्याच्या ठायी अशी काही प्रेरणा करीन की तो काही अफवा ऐकून आपल्या देशाला परत जाईल व त्याच्याच देशात तो तलवारीने पडेल असे मी करीन.”’


अम्मोनी व मवाबी सेईर पहाडातल्या लोकांची अगदी कत्तल करून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्यांच्यावर उठले; सेइरनिवाशांचा निःपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले.


देवाने माझे मन उदास केले आहे; सर्वसमर्थाने मला हैराण केले आहे.


संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय.


मी मिसर्‍यांवर मिसरी उठवीन; प्रत्येक आपल्या भावाबरोबर व प्रत्येक आपल्या शेजार्‍याबरोबर, नगर नगराशी, राज्य राज्याशी लढेल.


भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी तुझा वंश उगवतीकडून आणीन; मावळतीकडून तुला मी एकत्र करीन.


हे माझ्या सेवका, याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; पाहा, मी तुला दूर देशातून वाचवून आणीन, तुझ्या संततीला बंदिवासातून मुक्त करीन; याकोब परत येईल, निर्भयपणे विश्रांती पावेल, त्याला कोणी धाक घालणार नाही.


परमेश्वर म्हणतो, माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; कारण मी तुझ्याबरोबर आहे; ज्या राष्ट्रांत मी तुला हाकून दिले आहे, त्या सर्वांचा मी सर्वस्वी नाश करीन, पण तुझा सर्वस्वी नाश करणार नाही; तरी मी तुझे योग्य शासन करीन, तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.”


ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.”


त्यांनी ती तीनशे रणशिंगे फुंकली तेव्हा परमेश्वराने प्रत्येक माणसाची तलवार त्याच्या सोबत्यांवर व सर्व सेनेवर चालवली; तेव्हा ती सेना सरेराजवळच्या बेथ-शिट्टापर्यंत व टब्बाथाजवळच्या आबेल-महोलाच्या सीमेपर्यंत पळून गेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan