Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 शेशख1 कसे हस्तगत झाले आहे! सर्व जगाच्या प्रशंसेचा विषय परहाती कसा गेला आहे! राष्ट्रांना बाबेल कसा विस्मयावह झाला आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 शेशख कसे काबीज झाले आहे! सर्व जगाचा प्रशंसा असा कसा धरला गेला आहे. राष्ट्रांत बाबेल कशी उध्वस्त जागा झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 “शेशाक कसे हस्तगत केल्या जाईल, संपूर्ण पृथ्वीचे अभिमान पात्र जप्त केल्या जाईल! सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन किती ओसाड होईल!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:41
15 Iomraidhean Croise  

आणि हे मंदिर उच्च स्थानी राहील तरी ह्याच्याजवळून जाणारेयेणारे चकित होऊन म्हणतील, ‘परमेश्वराने ह्या देशाचे व ह्या मंदिराचे असे का केले?’


तेव्हा राष्ट्रांचा मुकुटमणी, खास्दी लोकांच्या ऐश्वर्याचे भूषण असा जो बाबेल त्याची, सदोम व गमोरा ह्यांचा देवाने सत्यानाश केला तेव्हाच्यासारखी स्थिती होईल.


त्या दिवशी असे होईल की बाबेलच्या राजासंबंधाने हे कवन तू म्हणशील : “पिडणारा कसा नाहीसा झाला! पिळून काढणारी नगरी कशी नष्ट झाली आहे!


परस्परांपासून दूर व जवळ असलेले उत्तरेकडचे सर्व राजे व ह्या भूतलावर असलेली पृथ्वीवरची सर्व राज्ये, ह्यांना तो पेला पाजला. ह्यांच्यामागून शेशखचा1 राजाही तो पिईल.


प्रशंसनीय नगरी, माझ्या आवडीची नगरी लोक का सोडून गेले नाहीत?


हा सर्व जगाचा हातोडा कसा मोडूनतोडून टाकला आहे! बाबेल सर्व राष्ट्रांमध्ये कसा ओसाड झाला आहे!


बाबेल घेण्याच्या वेळी झालेल्या आवाजाने पृथ्वी कापत आहे, तिचा आवाज राष्ट्रांमध्ये ऐकू येत आहे.”


बाबेल नासाडीचा ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान, विस्मय, व उपहास ह्यांचा विषय आणि निर्जन स्थळ असा होईल.


द्वीपांतले सर्व लोक तुला पाहून विस्मित झाले आहेत; त्यांचे राजे थरथर कापत आहेत; त्यांची तोंडे काळवंडली आहेत.


आणि जेथे जेथे मनुष्यजातीचा निवास आहे तेथील वनपशू व अंतराळातील पक्षी त्याने आपल्या अधीन केले आहेत, त्या सर्वांवर आपणास सत्ता चालवण्यास दिली आहे; सुवर्णाचे शीर आपणच आहात.


महाराज, तो वृक्ष आपणच आहात; आपण वाढून बलवान झाला आहात; आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहचली आहे.


त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”


आणि ज्या ज्या राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुला नेईल त्या त्या सर्वांना तू आश्‍चर्याचा, म्हणीचा व थट्टेचा विषय होशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan