Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 ह्यामुळे परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, मी तुझ्या पक्षाने लढेन, तुझ्याकरता सूड उगवीन; मी त्याचा सागर आटवीन, त्याचा झरा सुकवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 म्हणून परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी तुझ्या दाव्याविषयी बाजू मांडीन आणि तुझ्यासाठी सूड घेईन. कारण मी बाबेलाचे समुद्र आटवीन आणि तिचे झरे सुकवून टाकीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 म्हणून याहवेह असे म्हणतात: “मी तुमची बाजू मांडेन मी तुमचा सूड उगवेन; मी तिचे समुद्र आटवून टाकेन आणि तिचे झरे शुष्क करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:36
24 Iomraidhean Croise  

तो नद्यांचे रान करतो, पाण्याच्या झर्‍यांच्या जागी शुष्क भूमी करतो.


परमेश्वर दीनाच्या पक्षाचे, दरिद्र्यांच्या वादाचे समर्थन करील, हे मला ठाऊक आहे.


कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल. आणि त्यांना नागवणार्‍यांचा जीव नागवील.


कारण त्यांचा कैवारी समर्थ आहे; तो त्यांचा कैवार घेऊन तुझ्याविरुद्ध होईल.


समुद्राचे पाणी आटून जाईल, नदी आटून कोरडी होईल.


परमेश्वर, तुमचा उद्धार करणारा, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे म्हणतो, “तुमच्यासाठी मी बाबेलास निरोप पाठवला आहे; मी तेथील सर्व खास्द्यांना त्यांच्या अभिमानास्पद जहाजात बसून पळायला लावीन.


मी खोल पाण्याच्या डोहास म्हणतो, ‘कोरडा हो, मी तुझे प्रवाह आटवीन;’


त्याच्या जलप्रवाहांना झळ लागेल व ते सुकून जातील; कारण तो देश कोरीव मूर्तींचा आहे, त्यातील लोकांना मूर्तींचे वेड लागले आहे.


बाण पाजवा! ढाली धारण करा! परमेश्वराने मेद्यांच्या राजांना स्फूर्ती दिली आहे, नाश करावा अशी त्याच्याविरुद्ध त्याची योजना आहे; कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याच्या मंदिराविषयीचा सूड आहे.


बाबेलातून पळून जा, तुम्ही आपापले जीव वाचवा; त्याच्या दुष्कर्मामुळे तुम्ही आपला नाश करून घेऊ नका; कारण हा परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे; त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे.


मी आपले लोक इस्राएल ह्यांच्या हातून अदोमाचा सूड घेईन; माझ्या आवेशयुक्त क्रोधानुसार ते अदोमाची वाट लावतील; त्यांना माझ्या सुडाचा अनुभव येईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तो जरी आपल्या भाऊबंदांत फलद्रूप आहे तरी पूर्वेचा वारा, रानातून परमेश्वराचा वारा येईल आणि त्याची विहीर आटेल, त्याचा झरा सुकून जाईल; तो त्याच्या निधींतील सर्व मनोरम वस्तू हरण करील.


प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,” असे प्रभू म्हणतो.


सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे; त्यांचे पाय घसरतील तेव्हा हे घडेल; कारण त्यांचा संकटकाळ जवळ आला आहे, त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकर येत आहेत.’


राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेचा जयजयकार करा; कारण तो आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा बदला घेईल, तो आपल्या विरोधकांचा सूड उगवील, तो आपला देश व आपली प्रजा ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करील.”


सहाव्याने आपली वाटी ‘फरात महानदावर’ ओतली तेव्हा ‘सूर्याच्या उगवतीपासून’ येणार्‍या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे ‘पाणी आटून गेले.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan