Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 सीयोननिवासिनी म्हणो, ‘माझ्यावर व माझ्या शरीरावर केलेला जुलूम बाबेलवर उलटो;’ व यरुशलेम म्हणो, ‘माझ्या रक्तपाताचा दोष खास्दी देशाच्या रहिवाशांवर असो.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 मजवर व माझ्या कुटूंबावर केलेला जुलूम बाबेलाविरूद्ध उलटो, असे सियोनामध्ये राहणारे म्हणतील. “माझे रक्त पाडल्याचा दोष खास्द्यांच्या रहिवाश्याविरूद्ध फिरो.” असे यरूशलेम म्हणेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 सीयोनचे रहिवासी म्हणतात, आमच्या संतानांवर जसा अत्याचार केला, तसा बाबेलवर येवो,” यरुशलेम म्हणते, “आमचे रक्त सांडल्याचा सर्व दोष बाबेल्यांवर पडो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:35
20 Iomraidhean Croise  

तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्या अपमानाचा दोष तुमच्या माथी; मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली, पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे, परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो.”


परमेश्वर म्हणतो, “दीनांवरील जुलमामुळे व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे, ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे, त्यात मी त्याला सुरक्षित ठेवीन.”


कारण रक्तपाताचा सूड उगवणार्‍यास त्यांची आठवण आहे; तो दीनांचा आक्रोश विसरला नाही.


ते खास्द्यांचा देश लुटतील; त्याला लुटणारे सर्व तृप्त होतील असे परमेश्वर म्हणतो.


बाबेलवर तिरंदाज, सर्व धनुर्धारी ह्यांना जमवा; त्याच्या सभोवती तळ द्या; त्याचा काही निभाव लागू देऊ नका; त्याच्या कृतीप्रमाणे त्याला प्रतिफळ द्या; जे सर्व त्याने केले तसे त्याला करा; कारण त्याने परमेश्वराविरुद्ध, इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध तोरा मिरवला आहे.


बाबेल व खास्दी देशाचे सर्व रहिवासी ह्यांनी तुमच्यादेखत जो सर्व अनर्थ सीयोनेत केला आहे त्यांचे मी उसने फेडीन, असे परमेश्वर म्हणतो.


त्यांची सर्व दुष्टता तुझ्यापुढे येवो; तू माझ्या सर्व अपराधांमुळे माझे जसे केले तसे त्यांचे कर; कारण माझे उसासे बहुत आहेत व माझे हृदय म्लान आहे.”


लबानोनावर केलेला जुलूम तुला घेरील, जनावरांचा झालेला नाश तुला घाबरवील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यामुळे असे होईल.


जी राष्ट्रे स्वस्थ आहेत त्यांच्यावर माझा राग फार पेटला आहे; कारण मी थोडासा रागावलो होतो पण त्यांनी अरिष्ट वाढवले.


कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल.


कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळवते.


कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.”


‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी ‘आनंद करा;’ कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे.”’


‘जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे’ तिला दुप्पट द्या; तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी त्यात ओता.


ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहीस आणि पृथ्वीवर राहणार्‍या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहीस?”


नाहीतर अबीमलेखातून अग्नी निघून शखेम व बेथ-मिल्लो येथील लोकांना भस्म करो; आणि शखेम व बेथ-मिल्लो येथील लोकांतून अग्नी निघून अबीमलेखाला भस्म करो.”


यरुब्बालाच्या सत्तर मुलांचा घात करणारा त्यांचा भाऊ अबीमलेख आणि त्याच्या भावांची कत्तल करण्यास त्याला हातभार लावणारे शखेमकर ह्यांच्यावर दोष ठेवून ह्या खुनाचा बदला घ्यावा ह्या हेतूने देवाने असे केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan