Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 नदीचे उतार हस्तगत झाले आहेत, लढवय्ये फजीत झाले आहेत, असे ते सांगत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 नदीचे उतार जप्त झाले आहेत. शत्रू किल्ले जाळत आहेत आणि बाबेलाचे लढणारी माणसे गोंधळून गेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 नदीवरील पूल जप्त करण्यात आले आहेत, दलदली जळत आहेत, सैन्य भयभीत झाले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:32
7 Iomraidhean Croise  

मी खोल पाण्याच्या डोहास म्हणतो, ‘कोरडा हो, मी तुझे प्रवाह आटवीन;’


पाहा, ते धसकटासारखे झाले आहेत, अग्नीने त्यांना भस्म केले आहे; ज्वालेच्या तडाख्यातून त्यांना स्वत:चा बचाव करता येईना. हा शेकत बसण्याचा विस्तव नव्हे, भोवती बसण्याच्या शेगडीचा अग्नी नव्हे.


बाबेलचे वीर लढाई करायचे थांबले आहेत, ते आपल्या दुर्गात बसून राहिले आहेत; त्यांचे बल खुंटले आहे. ते केवळ स्त्रिया बनले आहेत; त्याच्या वस्तीस आग लावली आहे; त्याचे अडसर मोडले आहेत.


बाबेलच्या राजाचे नगर सर्वस्वी हस्तगत झाले हे त्याला कळवण्यास एकामागे एक हलकारे, एकामागे एक निरोपे धावत आहेत.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, धान्य मळण्याच्या वेळी खळे असते तशी बाबेलकन्या आहे; अजून थोडा अवधी आहे म्हणजे मग तिचा हंगाम येईल.


मग नगराच्या तटास एक खिंड पाडण्यात आली; आणि दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेनजीक होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे त्यांनी अराबाचा रस्ता धरला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan