Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 बाबेलच्या राजाचे नगर सर्वस्वी हस्तगत झाले हे त्याला कळवण्यास एकामागे एक हलकारे, एकामागे एक निरोपे धावत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 बाबेलाच्या राजाला त्याचे नगर सर्वस्वी काबीज झाले आहे हे सांगण्यासाठी एका दूतामागून दुसरा दूत आणि एक जासूद दुसऱ्या जासूदाला सांगण्यास धावत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 बाबेलच्या राजाला वर्तमान सांगण्यासाठी, की त्याचे संपूर्ण नगर हस्तगत करण्यात आले आहे, संदेशवाहक एका पाठोपाठ धावत आहेत निरोपे एका पाठोपाठ येत आहेत,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:31
16 Iomraidhean Croise  

मग राजा व त्याचे सरदार ह्यांच्याकडून पत्रे घेऊन जासूद राजाज्ञेप्रमाणे सर्व यहूदा प्रांतात फिरले; ते लोकांना सांगत गेले की, “इस्राएल लोकहो, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांचा देव जो परमेश्वर त्याच्याकडे वळा म्हणजे अश्शूरी राजाच्या हातून वाचून तुमचे जे लोक उरले आहेत त्यांच्याकडे तो वळेल.


मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्रे लिहून त्यांवर राजाची मोहर करून ती वेगवान सरकारी घोडे, खेचरे व सांडणी ह्यांच्या स्वारांबरोबर डाकेने रवाना केली.


डाकेच्या स्वारांनी सरकारी वेगवान घोड्यांवर स्वार होऊन राजाज्ञेप्रमाणे त्वरेने दौड केली; हा हुकूम शूशन राजवाड्यातून सोडण्यात आला.


माझे दिवस जासुदाहून त्वरित जात आहेत; ते पळत आहेत, त्यांत काही कल्याण दिसत नाही.


नाशावर नाश पुकारला आहे; कारण सर्व देश लुटला आहे; माझे डेरे अकस्मात माझ्या कनाती क्षणात लुटल्या आहेत.


“राष्ट्रांमध्ये हे विदित करा व प्रसिद्ध करा, ध्वज उभारा; प्रसिद्ध करा, लपवून ठेवू नका आणि म्हणा : ‘बाबेल घेतला आहे, बेल फजीत झाला आहे, मरोदख भग्न झाला आहे; त्याच्या मूर्तींची फजिती झाली आहे, त्याचे पुतळे भग्न झाले आहेत.’


हे बाबेला, मी तुझ्यासाठी सापळा मांडला व तू सापडला आहेस, पण तुला कळले नाही; तू सापडलास व तुला पकडलेही, कारण तू परमेश्वराविरुद्ध भांडलास.


त्यांचा लौकिक बाबेलच्या राजाने ऐकला आहे, त्याचे हात गळाले आहेत; प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे क्लेश आणि कळा त्याला लागल्या आहेत.


नदीचे उतार हस्तगत झाले आहेत, लढवय्ये फजीत झाले आहेत, असे ते सांगत आहेत.


त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan