Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 बाबेलचे वीर लढाई करायचे थांबले आहेत, ते आपल्या दुर्गात बसून राहिले आहेत; त्यांचे बल खुंटले आहे. ते केवळ स्त्रिया बनले आहेत; त्याच्या वस्तीस आग लावली आहे; त्याचे अडसर मोडले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 बाबेलात सैनिक लढाई करायचे थांबले आहेत. ते त्यांच्या बालेकिल्ल्यात राहत आहेत. त्यांची शक्ती संपली आहे; ते स्त्रिया असे झाले आहेत. तिची घरे पेटवली आहेत, तिच्या वेशीच्या दारांचे अडसर मोडले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 बाबिलोनचे योद्धे युद्ध करण्याचे थांबले आहेत; ते त्यांच्या गडात बसून आहेत. त्यांचे सामर्थ्य संपुष्टात आले आहे; ते दुर्बल झाले आहेत. तिचे आवास जळत आहेत; तिच्या प्रवेशद्वाराच्या सळया मोडल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:30
16 Iomraidhean Croise  

कारण त्याने पितळेची दारे फोडली व लोखंडाचे अडसर तोडून टाकले.


कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्या ठायी तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे.


कणखर मनाच्या पुरुषांची लूटमार झाली आहे; ते झोपी गेले आहेत; त्यांतील कोणाही बलवानाचे हात चालेनात.


त्या काळी मिसरी लोक बायकांसारखे होतील; सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर आपला हात उगारील त्यामुळे ते थरथर कापतील व भयभीत होतील.


पाहा, ते धसकटासारखे झाले आहेत, अग्नीने त्यांना भस्म केले आहे; ज्वालेच्या तडाख्यातून त्यांना स्वत:चा बचाव करता येईना. हा शेकत बसण्याचा विस्तव नव्हे, भोवती बसण्याच्या शेगडीचा अग्नी नव्हे.


करीयोथ हस्तगत झाले आहे, त्याचे दुर्ग सर केले आहेत; त्या दिवशी मवाबाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीच्या हृदयासारखे होईल.


त्याच्यावर चोहोकडून रणघोष करा, त्याने हार खाल्ली आहे; त्याची तटबंदी पडली आहे, त्याचे कोट पाडले आहेत. कारण हा परमेश्वराकडून सूड आहे : त्याच्यावर सूड उगवून घ्या, त्याने केले तसे त्याला करा.


नदीचे उतार हस्तगत झाले आहेत, लढवय्ये फजीत झाले आहेत, असे ते सांगत आहेत.


मी त्याचे सरदार, त्याचे ज्ञानी, त्याचे अधिपती व नायब अधिपती, आणि त्याचे वीर ह्यांना मस्त करीन; ते कायमचे निद्रावश होतील, ते उठायचे नाहीत, असे सेनाधीश परमेश्वर, हे नाम धारण करणारा राजेश्वर म्हणतो.


तिच्या वेशी जमिनीत खचल्या आहेत; त्याने तिचे अडसर मोडून नष्ट केले आहेत; तिचा राजा व तिचे सरदार नियमशास्त्र नसलेल्या राष्ट्रांत आहेत; तिच्या संदेष्ट्यांनाही परमेश्वरापासून काही दृष्टान्त होत नाही.


दिमिष्काचा अडसर मोडून टाकीन, आवेन खोर्‍यातील सिंहासनारूढ असलेला व बेथ-एदनाचा राजवेत्रधारी ह्यांचा निःपात करीन; अरामाच्या लोकांना पाडाव करून कीरास नेतील,” असे परमेश्वर म्हणतो.


पाहा, तुझ्यात राहणारे लोक केवळ स्त्रिया आहेत; तुझ्या देशाचे दरवाजे तुझ्या शत्रूंना खुले झाले आहेत; अग्नीने तुझे अडसर खाऊन टाकले आहेत.


ते म्हणतील, “अरेरे! ‘बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती!’ एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan