Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 पृथ्वीवर ध्वज उभारा, राष्ट्रांमध्ये रणशिंग वाजवा, त्याच्याविरुद्ध राष्ट्रे सिद्ध करा, अराराट, मिन्नी व आष्कनाज ह्या राज्यांना त्याच्यावर चढाई करण्यास बोलवा; त्याच्याविरुद्ध सेनापतींची नेमणूक करा; विक्राळ टोळांप्रमाणे घोडे येऊ द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 पृथ्वीवर निशाण उंच करा. राष्ट्रांमध्ये कर्णा फुंका. तिच्यावर हल्ला करण्यासाठी राष्ट्रांना नेमा. तिच्याविरूद्ध अरारात, मिन्नी, आष्कनाज या राज्यांना एकत्र बोलवा, तिच्याविरूद्ध हल्ला करण्यास सेनापतीची निवड करा. विक्राळ टोळांप्रमाणे घोडे येऊ द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 “या भूमीवर आपले ध्वज फडकवा! राष्ट्रांमध्ये रणशिंगे वाजवा! तिच्याशी युद्ध करण्यासाठी राष्ट्रांना सुसज्ज करा; या राष्ट्रांना तिच्याविरुद्ध पाचारण करा: अरारात, मिन्नी व आष्कनाज. तिच्याविरुद्ध सेनापतीची नेमणूक करा; टोळधाडी सारखा घोड्यांचा प्रचंड समुदाय पाठवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:27
24 Iomraidhean Croise  

गोमरचे मुलगे : आष्कनाज, रीपाथ व तोगार्मा.


सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी अरारात पर्वतावर तारू टेकले.


तेथे तो आपला देव निस्रोख ह्याच्या देवळात जाऊन पूजा करत असता त्याचे मुलगे अद्रम्मेलेक व शरेसर ह्यांनी त्याचा तलवारीने वध केला आणि ते अराराट देशात पळून गेले; मग एसर-हद्दोन त्याच्या जागी राजा झाला.


गोमराचे पुत्र : आष्कनाज, दीफाथ व तोगार्मा.


अहो भूतलवासी अखिल जनहो, पृथ्वीवरील रहिवाशांनो, पर्वतांवर ध्वज उभारण्यात येईल तेव्हा तुम्ही पाहा; तुतारी वाजवण्यात येईल तेव्हा ऐका.


तेव्हा असे झाले की तो आपले दैवत निस्रोख ह्याच्या देवळात पूजा करीत असता त्याचे पुत्र अद्रम्मेलेक व शरेसर ह्यांनी त्याला तलवारीने वधले व ते अरारात देशात पळून गेले. मग त्याच्या जागी त्याचा पुत्र एसर-हद्दोन राजा झाला.


त्यांच्याकडूनही अनेक राष्ट्रे व थोर राजे दास्य करवून घेतील; मी त्यांच्या कृतींप्रमाणे व त्यांच्या हातच्या कर्मांप्रमाणे त्यांना प्रतिफळ देईन.


परमेश्वर म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, त्या सैन्यांचा अंदाज करता येत नाही; ते टोळांहून असंख्य आहेत, ते अगणित आहेत.


“राष्ट्रांमध्ये हे विदित करा व प्रसिद्ध करा, ध्वज उभारा; प्रसिद्ध करा, लपवून ठेवू नका आणि म्हणा : ‘बाबेल घेतला आहे, बेल फजीत झाला आहे, मरोदख भग्न झाला आहे; त्याच्या मूर्तींची फजिती झाली आहे, त्याचे पुतळे भग्न झाले आहेत.’


कारण त्याच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र चढाई करून आले आहे; ते त्याचा देश ओसाड करील, त्यात एकही रहिवासी उरणार नाही; मनुष्यापासून पशूपर्यंत सर्व पळाले आहेत, निघून गेले आहेत.


कारण पाहा, मी उत्तर देशाहून मोठ्या राष्ट्रांचा जमाव उठवून बाबेलवर आणीन; ते त्याच्याविरुद्ध सज्ज होतील; त्याच दिशेकडून तो हस्तगत होईल; रिकामा परत येत नाही अशा चतुर वीराच्या बाणांप्रमाणे त्यांचे बाण आहेत.


बाबेलच्या कोटांसमोर ध्वज उभारा; पहारा मजबूत करा, पहारेकरी ठेवा; छापा घालण्याची तयारी करा; कारण परमेश्वर बाबेलच्या रहिवाशांविरुद्ध जे बोलला त्याची योजना करून ते त्याने सिद्धीसही नेले आहे.


सेनाधीश परमेश्वर आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणाला आहे, मी तुझ्यात टोळांप्रमाणे माणसे भरीन; ते तुझ्याविरुद्ध गर्जना करतील.


त्याच्याविरुद्ध राष्ट्रे सज्ज करा, मेद्यांचे राजे, त्यांचे अधिपती, त्यांचे सर्व नायब अधिपती व राजाच्या सत्तेतील सर्व देश सज्ज करा.


बन्यामीनवंशजहो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा, तकोवात रणशिंग फुंका, बेथ-हक्करेमावर ध्वज उभारा; कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे.


राष्ट्रांमध्ये हे जाहीर करा; यज्ञयाग करून लढाईची तयारी करा, वीरांची उठावणी करा; सर्व लढवय्यांना एकत्र होऊ द्या, आणि त्यांना चाल करू द्या.


नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरायचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय?


यरुशलेमेबरोबर लढण्यास चढाई करून यावे म्हणून मी सर्व राष्ट्रांना जमा करीन. ते नगर हस्तगत करतील, घरे लुटतील, स्त्रियांना भ्रष्ट करतील; अर्धे नगर बंदिवासात जाईल, तरी अवशिष्ट लोक नगरातून नाहीतसे होणार नाहीत.


कारण ते आपले पशू व डेरे घेऊन चढाई करत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत. ते व त्यांचे उंट अगणित होते; अशा प्रकारे ते देश उजाड करायला येत असत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan