Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तुझ्या द्वारे मी रथ व सारथी ह्यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे मी नरनारींचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे मी वृद्ध व तरुण ह्यांचे तुकडे तुकडे करीन आणि तुझ्या द्वारे मी तरुण व तरुणी ह्यांचे तुकडे तुकडे करीन;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तुझ्याबरोबर मी प्रत्येक पुरुष आणि स्त्रिया यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्याबरोबर मी वृद्ध आणि तरुण यांचे तुकडे तुकडे करीन. तुझ्याबरोबर मी तरुण पुरुष आणि कुमारी मुलगी यांचे तुकडे तुकडे करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तुझ्याद्वारे मी पुरुष व स्त्रीचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी वृद्धाचा व तरुणाचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी तरुण व तरुणींचा संपूर्ण नाश करेन,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:22
14 Iomraidhean Croise  

त्याने त्यांच्यावर खास्द्यांच्या राजाची स्वारी आणली; त्याने त्यांच्या तरुण पुरुषांना त्यांच्याच पवित्रस्थानाच्या घरात तलवारीने वधले; त्याने तरुणांवर व कुमारींवर, वृद्धांवर किंवा वयातीतांवर दया केली नाही; परमेश्वराने सर्वांना त्याच्या हाती दिले.


जो कोणी सापडेल त्याला भोसकतील; ज्या कोणाला पकडतील तो तलवारीने पडेल.


त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची तान्ही बाळे ते आपटून मारतील; त्यांची घरे लुटतील; त्यांच्या स्त्रिया भ्रष्ट करतील.


त्यांची धनुष्ये तरुणांना पाडतील; ते पोटच्या फळावर दया करणार नाहीत; त्यांचे नेत्र मुलांची कीव करणार नाहीत.


तसा अश्शूर देशाचा राजा मिसरातील बंदिवान व कूशाचे हद्दपार केलेले तरुण व म्हातारे ह्यांना उघडे, अनवाणी व उघड्या कुल्ल्यांनी, मिसर देश फजीत व्हावा म्हणून घेऊन जाईल.


ह्यास्तव आता सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो : तुम्ही आपल्या हातच्या कर्मांनी मला चिडवावे आणि यहूदातले तुमचे पुरुष, स्त्रिया, बालके व तान्ही ह्यांचा उच्छेद होऊन तुमच्यातला कोणी शिल्लक राहू नये, असे आपल्या जिवावर का अरिष्ट आणता?


त्याच्या घोड्यांवर, त्याच्या रथांवर व त्यांच्यात राहणार्‍या सर्व मिश्र जातींवर तलवार उपसली आहे, ते स्त्रिया बनतील! त्याच्या निधींवर तलवार उपसली आहे, ते लुटीस जातील!


तुझ्या द्वारे मी मेंढपाळ व त्याचा कळप ह्यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे शेतकरी व त्याच्या बैलांची जोडी ह्यांचे तुकडे तुकडे करीन; आणि तुझ्या द्वारे मी अधिपतींचे व नायब अधिपतींचे तुकडे तुकडे करीन.


ह्याकरता मी परमेश्वराच्या संतापाने भरलो आहे; तो दाबून ठेवता ठेवता मी थकलो आहे; “रस्त्यातल्या पोरांवर, तरुणांच्या जमावावर तो सोड; नवरा व बायको, वृद्ध व पुर्‍या वयाचे ह्या सर्वांना तो गाठील.


माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत, माझ्या आतड्यांना पीळ पडत आहेत; माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून भूमीवर पडले आहे; कारण बालके व तान्ही नगराच्या आळ्यांत मूर्च्छित होऊन पडली आहेत.


तरुण व वृद्ध रस्त्यांत जमिनीवर पडले आहेत; माझ्या कुमारी व माझे तरुण तलवारीने पडले आहेत; तू आपल्या क्रोधदिनी त्यांचा वध केला आहे; तू त्यांना वधले, गय केली नाहीस.


वृद्ध, तरुण व कुमारी, मुले व स्त्रिया ह्यांची निखालस कत्तल करा; पण ज्यांच्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका; माझ्या पवित्रस्थानापासून आरंभ करा.” तेव्हा मंदिरापुढे असलेल्या वडिलांपासून त्यांनी आरंभ केला.


बाहेर तलवार व घरात दहशत ह्या त्यांचे प्राण हरण करतील, मग तो कुमार असो की कुमारी असो, तान्हे बाळ असो की पिकल्या केसांचा म्हातारा असो.


तर आता जाऊन अमालेकास मार दे; त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नकोस; पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे ह्या सर्वांचा संहार कर.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan