Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तू माझा परशू आहेस, तू माझी युद्धशस्त्रे आहेस; तुझ्या द्वारे मी राष्ट्रे मोडून त्यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे राज्ये नष्ट करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तू माझा लढाईचा हातोडा आहेस, माझे लढाईचे हत्यार आहेस. तुझ्याबरोबर मी राष्ट्रांना मोडून तुकडे तुकडे करीन आणि राज्यांचा नाश करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 “तू माझ्या युद्धाचा सोटा आहेस. माझे युध्दशस्त्र— तुझ्याद्वारे मी राष्ट्रांना डळमळीत करेन, तुझ्याद्वारे मी राज्ये नष्ट करेन,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:20
20 Iomraidhean Croise  

कुर्‍हाडीने तोडणार्‍यापुढे कुर्‍हाड घमेंड करील काय? करवत आपणास चालवणार्‍यापुढे आढ्यता मिरवील काय?सोट्याने आपणास हाती धरणार्‍यास गरगर फिरवावे, काष्ठाने काष्ठेतरास उचलावे तसे हे आहे.


जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे त्या अश्शूरास धिक्कार असो.


ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत; परमेश्वर व त्याची क्रोधशस्त्रे देशाचा विध्वंस करण्यास येत आहेत.


तू ऐकलेस ना? मी हे फार पूर्वीच केले, अगदी प्राचीन काळी योजले असून आता असे घडवून आणले की तुझ्या हातून तटबंदीच्या नगरांचा विध्वंस व नासधूस व्हावी;


परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्‍त आहे; त्याच्यापुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे; राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो; त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो.


अहो राष्ट्रांनो, दंगल करा, पण तुमचा चुराडा होईल; पृथ्वीवरील दूरच्या देशांनो, कान देऊन ऐका; तुम्ही आपली कंबर बांधा, पण तुमचा चुराडा होईल.


हा सगळा देश वैराण आणि विस्मयाला कारण होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षे बाबेलच्या राजांचे दास्य करतील.


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


हा सर्व जगाचा हातोडा कसा मोडूनतोडून टाकला आहे! बाबेल सर्व राष्ट्रांमध्ये कसा ओसाड झाला आहे!


ती हाती धरावी म्हणून पाजवण्यास दिली आहे; तलवार वध करणार्‍याच्या हाती द्यावी म्हणून तिला पाणी दिले आहे, ती पाजवली आहे.


मी आपल्या कोपाचा वर्षाव तुझ्यावर करीन, माझ्या कोपाग्नीचा मी तुझ्यावर फुंकर घालीन आणि राक्षसी व नाश करण्यात कुशल अशा मनुष्यांच्या हाती मी तुला देईन.


पण त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत, त्याचे संकल्प ते समजत नाहीत; कारण खळ्यासाठी पेंढ्या गोळा करतात तसे त्याने त्यांना गोळा केले आहे.


सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर; मी तुझे शिंग लोखंडासारखे व तुझे खूर पितळेसारखे करतो; तू अनेक राष्ट्रांचा चुराडा करशील, त्यांची कमाई परमेश्वराला वाहशील, त्यांची संपत्ती सकल पृथ्वीच्या प्रभूला तू वाहशील.


चुराडा करणारा तुझ्यासमोर चढाई करून आला आहे; कोटाचे संरक्षण कर, मार्गाची टेहळणी कर, आपली कंबर कसून आपल्या सगळ्या बळाने सज्ज हो.


त्याच्यापासूनच कोनशिला, त्याच्यापासूनच खुंटी, त्याच्यापासूनच युद्धधनुष्य, त्याच्यापासूनच प्रत्येक अधिकारी निघतो.


तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan