Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तो आपला शब्द उच्चारतो, तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो; तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवतो. तो पावसासाठी विजा सिद्ध करतो; व आपल्या भांडारांतून वायू बाहेर काढतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 जेव्हा तो गरजतो, तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो, कारण तो पृथ्वीच्या शेवटापासून धुके वर आणतो. तो पावसासाठी वीजा निर्माण करतो आणि आपल्या कोठारातून वारा काढून पाठवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघ गर्जना करतात; ते मेघांना पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उभारतात. ते विजा आणि पाऊस पाठवितात आणि त्यांच्या भांडारातून वारा बाहेर काढतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:16
24 Iomraidhean Croise  

मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशू आणि ग्रामपशू ह्या सर्वांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला तेव्हा पाणी ओसरू लागले;


शिक्षेसाठी असो, त्याच्या ह्या पृथ्वीच्या हितासाठी असो, किंवा दया करण्यासाठी असो, तो त्यांना पाठवतो.


तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला आहेस काय? तू गारांची भांडारे पाहिली आहेत काय?


देवाच्या भुजासारखा तुझा भुज आहे काय! त्याच्या वाणीप्रमाणे तुला गर्जना करता येते काय?


तुझ्या धमकीने ती पळाली, तुझ्या गर्जनेच्या शब्दाने ती त्वरेने ओसरली;


तो दिगंतांपासून मेघ वर चढवतो, पावसासाठी विजा उत्पन्न करतो; तो आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.


तो आपला हुकूम पाठवून ते वितळवतो; तो आपला वारा वाहवतो तेव्हा पाणी वाहू लागते.


परमेश्वराने आकाशात गर्जना केली, परात्पराची वाणी झाली, गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले.


राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली; त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली.


पुरातन आकाशांच्या आकाशावर आरूढ होऊन जो स्वारी करतो, त्याची स्तोत्रे गा; पाहा, तो आपला शब्द, सामर्थ्याचा शब्द, उच्चारतो.


त्याने पूर्वेचा वारा आकाशात वाहवला, आणि आपल्या सामर्थ्याने दक्षिणेचा वारा आणला.


मोशेने मिसर देशावर आपली काठी उगारली, तेव्हा परमेश्वराने दिवसभर व रात्रभर देशावर पूर्वेचा वारा वाहवला; आणि सकाळ झाली तेव्हा पूर्वेच्या वार्‍याबरोबर टोळ आले.


तेव्हा परमेश्वराने पश्‍चिमेचा प्रचंड वारा वाहवला; त्याने त्या टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले; मिसर देशाच्या सर्व हद्दीत एकही टोळ राहिला नाही.


मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहवून समुद्र मागे हटवला, त्यामुळे पाण्याचे दोन भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली.


करूबांच्या पंखांचा ध्वनी बाहेरच्या अंगणात ऐकू जात होता; सर्वसमर्थ देवाच्या वाणीसारखा तो होता.


“इस्राएलाच्या संतानांनो, तुम्ही मला कूशाच्या वंशजांसारखे नाहीत काय?” असे परमेश्वर म्हणतो. मी इस्राएल लोकांना मिसर देशातून, पलिष्टी लोकांना कफतोरांतून आणि अरामी लोकांना कीरातून आणले नाही काय?


तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले.


मग असे झाले की सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेचा झळईचा वारा वाहवला, तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले; त्याने तो मूर्च्छित झाला व आपणाला मृत्यू येवो, अशी विनवणी करून तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan