Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 बाबेलच्या कोटांसमोर ध्वज उभारा; पहारा मजबूत करा, पहारेकरी ठेवा; छापा घालण्याची तयारी करा; कारण परमेश्वर बाबेलच्या रहिवाशांविरुद्ध जे बोलला त्याची योजना करून ते त्याने सिद्धीसही नेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 बाबेलाच्या तटासमोर झेंडा उभारा. पहारा बळकट करा. पहारेकरी ठेवा; जे कोणी नगरातून पळून येतील त्यांना पकडण्यासाठी सैनिकांना लपवा, कारण परमेश्वराने बाबेलाच्या रहिवाश्याविरूद्ध जी योजना करून सांगितले ते त्याने केलेच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 बाबेलच्या तटबंदीविरुद्ध तुमचे झेंडे उंच करा! पहारेकऱ्यांची कुमक पाठवून मजबूत करा, पहारेकऱ्यांना स्थानबद्ध करा, दबा धरून बसण्याची तयारी करा! याहवेहनी बाबेलच्या लोकांविरुद्ध दिलेल्या फर्मानाचा हेतू ते सिद्धीस नेतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:12
18 Iomraidhean Croise  

परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.


तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील, व पृथ्वीच्या चार्‍ही दिशांकडून इस्राएलातल्या घालवून दिलेल्यांना एकत्र करील व यहूदातल्या परागंदा झालेल्यांना गोळा करील.


उघड्या डोंगरावर ध्वज उभारा, लोकांना मोठ्याने हाका मारा; हाताने खुणवा म्हणजे ते सरदारांच्या वेशीत प्रवेश करतील.


परमेश्वर आपले कार्य करीपर्यंत, आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत, त्याचा संताप मागे फिरणार नाही; पुढील काळात तुम्हांला हे चांगले समजेल.


ह्यामुळे पृथ्वी शोक करील, वर आकाश काळे होईल; कारण मी असे बोललो आहे, मी हे योजले आहे; मी अनुताप पावणार नाही; मी माघार घेणार नाही.”


“राष्ट्रांमध्ये हे विदित करा व प्रसिद्ध करा, ध्वज उभारा; प्रसिद्ध करा, लपवून ठेवू नका आणि म्हणा : ‘बाबेल घेतला आहे, बेल फजीत झाला आहे, मरोदख भग्न झाला आहे; त्याच्या मूर्तींची फजिती झाली आहे, त्याचे पुतळे भग्न झाले आहेत.’


परमेश्वराने आपले शस्त्रागार उघडले आहे, त्यातून त्याने आपल्या क्रोधाची हत्यारे बाहेर काढली आहेत; कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याला खास्द्यांच्या देशात कार्य करायचे आहे.


बाण पाजवा! ढाली धारण करा! परमेश्वराने मेद्यांच्या राजांना स्फूर्ती दिली आहे, नाश करावा अशी त्याच्याविरुद्ध त्याची योजना आहे; कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याच्या मंदिराविषयीचा सूड आहे.


पृथ्वीवर ध्वज उभारा, राष्ट्रांमध्ये रणशिंग वाजवा, त्याच्याविरुद्ध राष्ट्रे सिद्ध करा, अराराट, मिन्नी व आष्कनाज ह्या राज्यांना त्याच्यावर चढाई करण्यास बोलवा; त्याच्याविरुद्ध सेनापतींची नेमणूक करा; विक्राळ टोळांप्रमाणे घोडे येऊ द्या.


पृथ्वी कापत आहे, वेदना पावत आहे; कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे परमेश्वराचे संकेत पूर्ण होत आहेत.


परमेश्वराने योजल्याप्रमाणे केले आहे; त्याने प्राचीन काळापासून दिलेली ताकीद अंमलात आणली आहे; त्याने मोडतोड केली, गय केली नाही; त्याने शत्रूस तुझ्यावर हर्षवले आहे, त्याने तुझ्या वैर्‍यांचा उत्कर्ष केला आहे.


तेव्हा सर्व राष्ट्रे जमा करून यहोशाफाट2 ह्या नावाच्या खोर्‍यात आणीन आणि माझे लोक, माझे वतन इस्राएल, ह्यांना त्यांनी राष्ट्रांत विखरून माझा देश वाटून घेतला म्हणून तेथे त्यांच्यावर दावा मांडीन.


चुराडा करणारा तुझ्यासमोर चढाई करून आला आहे; कोटाचे संरक्षण कर, मार्गाची टेहळणी कर, आपली कंबर कसून आपल्या सगळ्या बळाने सज्ज हो.


आयच्या राजाने हे पाहिले तेव्हा तो व त्याच्या नगरातले सगळे लोक पहाटेस लवकर उठून इस्राएलाशी सामना करायला अराबासमोरील उताराकडे गेले, पण नगराच्या पिछाडीस लोक आपणांवर दबा धरून आहेत हे त्यांच्या गावीही नव्हते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan