Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 बाण पाजवा! ढाली धारण करा! परमेश्वराने मेद्यांच्या राजांना स्फूर्ती दिली आहे, नाश करावा अशी त्याच्याविरुद्ध त्याची योजना आहे; कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याच्या मंदिराविषयीचा सूड आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 बाण धारदार करा! ढाली घ्या. परमेश्वराने माद्य राजाचा आत्म्यास चिथावणी दिली आहे कारण बाबेलाचा नाश करावा अशी त्याची योजना होती. कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याचे मंदिर उध्वस्त केल्याबद्दलचा सूड आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “बाणांना धार लावा, ढाली उचलून घ्या! याहवेहनी मेदियाच्या राजाला प्रेरित केले आहे, कारण त्यांचा हेतू बाबेलचा नाश करण्याचा आहे. याहवेह बाबेल्यांचा सूड उगवतील, हा त्यांच्या मंदिराबद्दलचा सूड आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:11
39 Iomraidhean Croise  

परमेश्वराने अदोमी राजवंशातील अदोमी हदाद हा शत्रू शलमोनावर उठवला.


देवाने शलमोनावर दुसरा एक शत्रू उठवला, त्याचे नाव एल्यादाचा पुत्र रजोन; तो आपला धनी सोबाचा राजा हददेजर ह्याच्यापासून पळून गेला होता.


ह्यास्तव इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल आणि त्याच देशाचा राजा तिल्गथ-पिल्नेसर ह्यांना उठवले; त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशाचे लोक ह्यांना पाडाव करून हलह, हाबोर, हारा येथे व गोजान नदीपर्यंत त्यांना नेऊन ठेवले व तेथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत.


यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश ह्याच्या मनास त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने स्फूर्ती दिली. तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात ताकीद दिली व लेखी फर्मान पाठवले की,


यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने ह्या राजाच्या मनास स्फूर्ती दिली; तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात जाहीर केले व लेखी फर्मानही पाठवले, ते असे :


ओरेब खडकाजवळ मिद्यानाची कत्तल झाली तेव्हाच्याप्रमाणे सेनाधीश परमेश्वर त्यावर चाबूक चालवील; तो आपली काठी समुद्रावर लांबवील; ती तो मिसराप्रमाणे त्यावर उगारील.


मला कष्टप्रद दृष्टान्त झाला आहे; लुटारू लुटत आहे, ठक ठकबाजी करीत आहे. हे एलामा, चढाई कर; हे मादया, वेढा घाल; त्याच्यामुळे लोक टाकत असलेले सर्व उसासे मी थांबवतो.


ते मेजवानीची तयारी करतात; ते पहारेकरी ठेवतात; खातातपितात; सरदारहो, उठा, ढालीस तेल लावा.


मी उत्तरेकडून एकाची उठावणी केली आहे; तो आला आहे. जो माझे नाम घेतो त्याची मी सूर्याच्या उगवतीकडून उठावणी केली आहे; चिखल तुडवतात किंवा कुंभार मातीचा गारा तुडवतो तसा तो अधिपतीस तुडवील.


परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्‍त आहे; त्याच्यापुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे; राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो; त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो.


मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझ्यावेगळा देव नाही; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले,


उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलावतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावतो, मी बोललो तसे घडवूनही आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो.


जिम्री, एलाम व मेदी ह्यांच्या सर्व राजांना,


“ढाल व कवच सिद्ध करा, युद्धास उभे राहा;


रथांना घोडे जुंपा; घोड्यांवर स्वार व्हा; शिरस्त्राण घालून उभे राहा; भाले घासून साफ करा; चिलखत घाला.


अश्वांनो, दौड करा; रथांनो, भरधाव चाला; वीरहो, पुढे चाला; ढालाईत कूश व पूट, धनुर्धारी, धनुष्य वाकवणारे लूदी तुम्ही सर्व चालू लागा.


परमेश्वराने आपले शस्त्रागार उघडले आहे, त्यातून त्याने आपल्या क्रोधाची हत्यारे बाहेर काढली आहेत; कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याला खास्द्यांच्या देशात कार्य करायचे आहे.


कारण त्याच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र चढाई करून आले आहे; ते त्याचा देश ओसाड करील, त्यात एकही रहिवासी उरणार नाही; मनुष्यापासून पशूपर्यंत सर्व पळाले आहेत, निघून गेले आहेत.


ह्यामुळे परमेश्वराने बाबेलविरुद्ध केलेला संकल्प व खास्द्यांच्या देशाविरुद्ध केलेल्या योजना ऐकून घ्या; ते त्यांना, कळपातील लहानांनादेखील निश्‍चये ओढत नेतील; त्यांची वस्ती खातरीने त्यांच्यामुळे विस्मय पावेल.


कारण पाहा, मी उत्तर देशाहून मोठ्या राष्ट्रांचा जमाव उठवून बाबेलवर आणीन; ते त्याच्याविरुद्ध सज्ज होतील; त्याच दिशेकडून तो हस्तगत होईल; रिकामा परत येत नाही अशा चतुर वीराच्या बाणांप्रमाणे त्यांचे बाण आहेत.


बाबेलच्या कोटांसमोर ध्वज उभारा; पहारा मजबूत करा, पहारेकरी ठेवा; छापा घालण्याची तयारी करा; कारण परमेश्वर बाबेलच्या रहिवाशांविरुद्ध जे बोलला त्याची योजना करून ते त्याने सिद्धीसही नेले आहे.


बाबेल व खास्दी देशाचे सर्व रहिवासी ह्यांनी तुमच्यादेखत जो सर्व अनर्थ सीयोनेत केला आहे त्यांचे मी उसने फेडीन, असे परमेश्वर म्हणतो.


सीयोननिवासिनी म्हणो, ‘माझ्यावर व माझ्या शरीरावर केलेला जुलूम बाबेलवर उलटो;’ व यरुशलेम म्हणो, ‘माझ्या रक्तपाताचा दोष खास्दी देशाच्या रहिवाशांवर असो.’


ह्यामुळे परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, मी तुझ्या पक्षाने लढेन, तुझ्याकरता सूड उगवीन; मी त्याचा सागर आटवीन, त्याचा झरा सुकवीन.


त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला.


तुमचे फाळ ठोकून त्यांच्या तलवारी बनवा, आपल्या कोयत्यांचे भाले बनवा; “मी वीर आहे” असे अशक्तही म्हणो.


राष्ट्रांमध्ये हे जाहीर करा; यज्ञयाग करून लढाईची तयारी करा, वीरांची उठावणी करा; सर्व लढवय्यांना एकत्र होऊ द्या, आणि त्यांना चाल करू द्या.


मी तुमच्यावर तलवार आणीन, ती करार मोडल्याचा बदला घेईल; तुम्ही आपापल्या नगरात जमा व्हाल, तेव्हा मी तुमच्यावर मरी पाठवीन; मी तुम्हांला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करीन.


तेव्हा ज्या राष्ट्रांनी यरुशलेमेबरोबर लढाई चालवली त्या सर्वांचा संहार परमेश्वर ज्या मरीने करील ती ही : ते पायांवर उभे असता त्यांचे मांस कुजेल, त्यांचे डोळे जागच्या जागी सडतील, त्यांच्या मुखात त्यांची जिव्हा सडेल.


यरुशलेमेबरोबर लढण्यास चढाई करून यावे म्हणून मी सर्व राष्ट्रांना जमा करीन. ते नगर हस्तगत करतील, घरे लुटतील, स्त्रियांना भ्रष्ट करतील; अर्धे नगर बंदिवासात जाईल, तरी अवशिष्ट लोक नगरातून नाहीतसे होणार नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan