Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी बाबेलवर व लेब-कामाईच्या1 रहिवाशांवर एका विध्वंसकाच्या मनास प्रवृत्त करीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी बाबेलावर आणि लेब-कामाईत जे कोणी राहतात त्यांच्याविरुद्ध विध्वंसक वाऱ्याने खळबळ उडवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेहचे म्हणणे हे असे आहे, “बाबिलोन व बाबिलोनच्या लोकांवर चाल करून जाण्यास मी एका संहारक आत्म्याला प्रेरित करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:1
23 Iomraidhean Croise  

पाहा, मी त्याच्या ठायी अशी काही प्रेरणा करीन की तो काही अफवा ऐकून आपल्या देशाला परत जाईल व त्याच्याच देशात तो तलवारीने पडेल असे मी करीन.”’


हे बाबेलच्या कन्ये, तू ओसाड पडणार आहेस; तू आमच्याशी केलेल्या वर्तनांबद्दल जो तुझे पारिपत्य करील तो धन्य!


मी आकाश कंपायमान करीन व पृथ्वी स्थानभ्रष्ट होईल; सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस ह्यांमुळे असे होईल.


मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परासमान होईन;’


समुद्रालगतच्या रानाविषयीची देव वाणी : दक्षिणेकडून जशा वावटळी झपाट्याने येतात, तसे रानातून, भयानक देशातून अरिष्ट येते.


अगे बाबेलच्या कुमारिके, खाली उतरून धुळीत बस; खास्द्यांच्या कन्ये, सिंहासन सोडून भूमीवर बस, कारण तुला ह्यापुढे नाजूक व सुकुमार म्हणणार नाहीत.


पाहा, परमेश्वरापासून त्याचे क्रोधरूप तुफान सुटले आहे; गरगर फिरणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.


एलामावर आकाशाच्या चारही भागांतून मी चार वारे सोडीन व त्यांना त्या चारही दिशांना विखरीन; ज्यात एलामाचे पांगलेले लोक गेले नाहीत असे एकही राष्ट्र सापडायचे नाही.


मराथाईम (अत्यंत बंडखोर देश) ह्यावर चढाई कर, आणि पकोडच्या (समाचार घ्यायच्या देशाच्या) रहिवाशांवर चढाई कर; त्यांची नासधूस कर, त्यांच्या पाठीस लागून त्यांचा समूळ नाश कर, असे परमेश्वर म्हणतो; मी तुला आज्ञापिल्याप्रमाणे सर्वकाही कर.


हे बाबेला, मी तुझ्यासाठी सापळा मांडला व तू सापडला आहेस, पण तुला कळले नाही; तू सापडलास व तुला पकडलेही, कारण तू परमेश्वराविरुद्ध भांडलास.


बाबेलवर तिरंदाज, सर्व धनुर्धारी ह्यांना जमवा; त्याच्या सभोवती तळ द्या; त्याचा काही निभाव लागू देऊ नका; त्याच्या कृतीप्रमाणे त्याला प्रतिफळ द्या; जे सर्व त्याने केले तसे त्याला करा; कारण त्याने परमेश्वराविरुद्ध, इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध तोरा मिरवला आहे.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्राएल लोक व यहूदा लोक ह्यांच्यावर बरोबरच जुलूम होत आहे; ज्या सर्वांनी त्यांना बंदिवान करून नेले त्यांनी त्यांना धरून ठेवले; ते त्यांना मोकळे सोडीनात.


कारण पाहा, मी उत्तर देशाहून मोठ्या राष्ट्रांचा जमाव उठवून बाबेलवर आणीन; ते त्याच्याविरुद्ध सज्ज होतील; त्याच दिशेकडून तो हस्तगत होईल; रिकामा परत येत नाही अशा चतुर वीराच्या बाणांप्रमाणे त्यांचे बाण आहेत.


बाबेल गगनापर्यंत उन्नत झाला असला, त्याने आपल्या उंच गढ्या अजिंक्य केल्या असल्या तरी माझ्याकडून त्याचा नाश करणारे येतील, असे परमेश्वर म्हणतो.


बाबेलवर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलविरुद्ध जी वचने लिहिण्यात आली होती ती यिर्मयाने एका ग्रंथात लिहून ठेवली होती.


तेव्हा तिच्यावर क्रोध होऊन तिला उपटून जमिनीवर पाडण्यात आले; पूर्वेकडील वार्‍यामुळे तिची फळे करपली; तिचे मजबूत धुमारे मोडून वाळून गेले; अग्नीने खाक केले.


तो जरी आपल्या भाऊबंदांत फलद्रूप आहे तरी पूर्वेचा वारा, रानातून परमेश्वराचा वारा येईल आणि त्याची विहीर आटेल, त्याचा झरा सुकून जाईल; तो त्याच्या निधींतील सर्व मनोरम वस्तू हरण करील.


नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरायचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय?


ज्या राष्ट्रांनी तुम्हांला लुटले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी,1 त्याने मला पाठवले आहे; जो कोणी तुम्हांला स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील; कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो :


तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, “शौला, शौला, माझा छळ का करतोस?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan